गाजबीज
भाद्रपद शु. द्वितीयेचे नाव. एक व्रत. उत्तरप्रदेशात पुत्रवती स्त्रिया संततीचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हे व्रत करतात. त्यासाठी भिंतीवर एक चित्र काढतात. त्या चित्रात एका झाडाखाली एक मुलगा उभा असतो व जवळच्या एका खोपटात एक मुलगा मरून पडलेला असतो. चित्रावर आकाशातून वीज उतरलेली असते. व्रतीनी स्त्रिया या चित्राची पूजा करतात.