भाद्रपद शु. तृतीया

Bhadrapada shudha Tritiya


* कोटी संवत्सरव्रत:

भाद्रपद शु. तृतीयेस हे व्रत करतात. व्रतावधी-चार वर्षे. एक लक्ष तांदूळ किंवा तीळ दुधात घालून वाटतात व त्या गोळ्याची पार्वतीची मूर्ती बनवतात. त्या दिवशी उपवास करून तिची पूजा करतात.

व्रताचे फल - दारिद्र्यनाश, चांगला पती व चांगली संतती यांचा लाभ व्हावा म्हणुन स्त्रिया हे व्रत करतात. याला लक्ष्मेश्‍वरी व्रत असेही म्हणतात.

 

* गिरितनयाव्रत

भाद्रपद किंवा मार्गशीर्ष शु. तृतीयेस या व्रतास आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. हे व्रत प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी व फुलांनी गौरीची पूजा करून करतात.

 

* गोपदत्रिरात्र व्रत

व्रतारंभ भाद्रपद शु. तृतीयेस किंवा चतुर्थीस करतात. हे व्रत सूर्योदयाच्या वेळी करावयाचे असते. त्याचा विधी-गाय व लक्ष्मीनारायण यांची तीन दिवस पूजा. गाईच्या शिंगांना व शेपटीला दही व तूप लावणे व उपवास.

'माता रुद्राणाम्'

या मंत्राने गाईची पूजा करावी. भाद्रपदात व्रतारंभ न करता आल्यास तो कार्तिकात केला तरी चालतो.

N/A

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP