* सूर्यषष्ठी
सप्तमीयुक्त भाद्रपद शु. षष्ठी दिवशी स्नान, दान, जप करून व्रत केल्याने त्याचे अक्षय्य फल मिळते. विशेषत: सूर्याचे पूजन गंगादर्शन आणि पंचगव्य प्राशन याचे अश्वमेधासमान फळ सांगितले आहे. पूजा गंध, फूले, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी करावी.
* बलदेवपूजन
या दिवशी बलरामाचा जन्म झाला म्हणून त्याचा उत्सव करतात.
* चंपाषष्ठी
जर भाद्रपद शु. षष्ठी दिवशी मंगळवार, विशाखा नक्षत्र आणि 'वैधृत्य' योग असेल तर 'चंपाषष्ठी' होते, यासाठी पंचमीचे दिवशी रात्रौ मनाशी संकल्प करून षष्ठी दिवशी पहाटॆ पांढरे तीळ आणि मृत्तिकामिश्रणाने स्नान करावे, कलश स्थापन करून त्यावर कुंकवाने बारा आरे काढावेत. त्यात रथ, अरुण व सूर्य याचे बारा सूर्य नावाने पूजन करावे व ब्राह्मणभोजन घालून मग स्वत: जेवावे.