* दशावतारव्रत
हे व्रत भाद्रपद शु. दशमीला करतात. यासाठी जलाशयावर जाऊन स्नान करून देव व पितर यांचे तर्पण करावे. नंतर आपल्या हाताचे दोन पसे कणीक घेऊन त्यापासून काही मिष्टान्न (अपूप) बनवून 'मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बौद्ध व कल्की या दशावतारांचे यथाविधी पूजन करून अपूपांपैकी १० देवतांना, १० ब्राह्मणांना व १० आपण घेऊन मग जेवावे. अशा प्रकारे दहा वर्षेपर्यंत अपूप, घीवर, कासार, मोदक, तिखटमिठाची पुरी, साखरपारे, डोवठे, गुणा, कोकर व पुष्पकर्ण या दहापैकी दरवर्षी एक पदार्थ देवांना दहाच्या संख्येत अर्पण केल्यास विष्णुलोकाची प्राप्ती होते.