भाद्रपद शु. द्वादशी

Bhadrapada shudha Dvadashi


* अवियोग द्वादशी

या दिवशी शिव, गौरी, ब्रह्मा, सावित्री, विष्णू, लक्ष्मी, सूर्य, नि क्षुभा यांची पूजा करावी, असे सांगितले आहे.

 

*ओघद्वादशी

भाद्रपद शु. द्वादशीला ओघद्वादशी असे दुसरे नाव आहे.

 

* कल्कीद्वादशी

भाद्र. शु. द्वादशीचे कल्कीद्वादशी असे दुसरे नाव आहे. या दिवशी कल्की या अवताराची पूजा करावी, असे सांगितले आहे.

 

* महाद्वादशी

भाद्रपद शु. द्वादशीला श्रवण नक्षत्र असेल तर तिला महाद्वादशी असे म्हणतात. या दिवशी उपवास आणि विष्णूची पूजा या गोष्टी करावयाच्या असतात. याच तिथीला बुधवार व श्रवण नक्षत्र असेल तर तिचे माहात्म्य अधिक आहे. हे व्रत केल्याने महाफल मिळते.

* वामनद्वादशी

या दिवशी श्रीवामनाचा अवतार झाला. या दिवशी वामनपूजा करून पांढरी वस्तू दान द्यावी. याने मोक्ष मिळतो.

या दिवशी बळी राजाला पाताळात घालून वामनाने देवांन स्वर्गलोक परत मिळवून दिला व आपण पाताळात द्वाररक्षक म्हणून राहिला.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP