मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ४५१ ते ५००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४५१ ते ५००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


वृक्षागारचिया पुरुषासी अन्य वाक्यें न येती उपयोगासी ।
एकचि वाक्य कीं प्रवाहीं न पडसी ।
अससी वृक्षीं स्वस्थ तैसें परोक्षही सच्चिदानंद ब्रह्म एक आहे विशुद्ध ।
तेणें वाक्यें नव्हे बोध । अधिकारी जरी ॥५२॥
तूंचि प्रत्यक्ष ब्रह्म अससी । वेदाचीं वाक्यें जीं ऐशीं ।
तोच गुरु बाणविती शिष्यासी । विवेचनद्वारां ॥५३॥
ऐसें हें जें वाक्य अपरोक्ष । तेणेंचि ज्ञान होय प्रत्यक्ष ।
तेव्हांचि अधिकारिया होय मोक्ष । अज्ञान नासे नी ॥५४॥
ऐसेंही वाक्य जरी बोधिलें । आणि शिष्याप्रतिही विश्र्वासलें ।
परी विवेचन न होतां व्यर्थ गेलें ।
जाले पाषांढी गुरूनेंचि ब्रह्म म्हणतां ।
देहादिकांसी मानिली आत्मता । तस्मात् पाखांडी ययापरता ।
दुजा कोण असे ॥५६॥
हें ज्ञान नव्हें अधिक अज्ञान । वाढलें दृढ जालें बंधन ।
 ऐसा पाखांडी कोटि कल्पेंकरून । न सुटे कदां ॥५७॥
तस्मात् खरें जयासी तरणें । तेणें विवेचन सांग करणें ।
सर्व आभासाहून ओळखणें । यथार्थ आत्मत्व ॥५८॥
आतां तेंचि विवेचन कैसें । बोलिजे तें सावधान मानसें ।
अगा हे रविदत्ता ग्रहण करी तैसें । विवेचून यत्नें ॥५९॥
बोधाभ्ज्ञासाच्छुद्धबोधो विविच्येदतियत्नतः ॥
बोधासाभाहून शुद्ध बोध । विवेचून घेइजे प्रसिद्ध ।
तोचि आत्मा ब्रह्म आत्मा ब्रह्म विशुद्ध । बोधाभास अनात्मा ॥४६०॥
एकदां विवेचनें नाहीं कळलें । परी वारंवार पाहिजे विवेचिलें ।
यास्तव अति प्रयत्नें म्हणितलें । सत्य सत्य त्रिवाचा वृक्षीं बैसला तो मुख्य बिंब ।
प्रवाहीं दिसे तो प्रतिबिंब । हे दोन परी असती स्वयंभू । एक सत्य एक मिथ्या ॥६२॥
जें दिसे तें सत्य नाहीं । उगेंच पडिलें वाटे प्रवाहीं ।
न दिसे पाहें सर्वांही । तें प्रवाहा वेगळें ॥६३॥
तेंवीच स्फूर्तीपासून देहांत । जितुकीं तत्त्वें हीं समस्त ।
तितुकींही जाणतिया दिसत । परी तीं असत्य सर्व ॥६४॥
जो सर्वत्रांसी स्वप्रकाशें । साधनेंविण जाणतसे ।
परी तो कळेना अल्पसें । आणि आपणा न देखे ॥६५॥
तोचि आत्मा ब्रह्म निश्चयेंसी । विलक्षण असे या सर्वांसी ।
जन्ममरणा पापपुण्यासी । देहकृता नातळे ॥६६॥
जो प्रतिबिंबरूप आभास । जो मागें बोलिला बहुवस ।
आणि पुढेंही बोलिजे तयास । तोचि कर्ता भोक्ता ॥६७॥
ऐसा आभास जो मिथ्या दिसे । तो तिहीं काळींही सत्य नसे ।
जो देखणा तो तिहीं काळीं असे ।
तोचि आत्मा आपण आत्मा म्हणिजे आपणा म्हणावें ।
येर सर्व तें आपण नव्हे । ऐसे जाणोन अंगें व्हावें ।
देह असतां ब्रह्मरूप ॥६९॥
आत्माचि कैसा ब्रह्मरूप । ऐसा असे जरी आक्षेप ।
तरी सावधान असावें साक्षेप । उभयांचीं लक्षणें बालूं ॥४७०॥
जग उत्पत्ति-स्थिति-लय । मायेस्तव होत जाय ।
परि तिहीं काळीं जे अद्वय । अबाधित तें सद्रूप ॥७१॥
सृष्टीपूर्वीं सद्रूप होतें । यास्तव अधिष्ठान या भ्रमातें ।
सत्यावीण अन्यथा भासातें । दिसणें न घडे ॥७२॥
एवं सृष्टिपूर्वी आहेच आहे । सृष्टि होतां माजीं राहे ।
म्हणोनि सर्वां आहेपणा लाहे । घटीं मृत्तिका जेवीं ॥७३॥
पुढें नासूनी जाता सर्व । उरे तें सद्रूप स्वयमेव ।
जेवीं घट भंगतां रूप नांव । मृत्तिका उरे ॥७४॥
एवं सृष्टीच्या आदि अंतीं उरें । मध्येंही असे निर्विकारें ।
तेंचि सद्रूप ब्रह्म साचारें । अविनाश सदां ॥७५॥
जेवीं तिहीं काळी सत् न नासे । तेवीं सदोदित ज्ञानही असे ।
तेंचि चिद्रूप निर्विशेषें । शून्य देखणें ॥७६॥
माया असतां प्रकाशावीं । माया निमतां अवलोकावी ।
तया नाहींपणाची प्रतीति घ्यावी । तेचि ज्ञप्ति चिद्रूप ॥७७॥
एवं सत्चित्लक्षणें दोन । तेवींच तिसरें आंनदघन ।
सर्वथा सुखःदुःखविहीन । आनंदरूप ॥७८॥
स्फुरणापासून अलीकडे । दिसती सुखदुःखाचें सांकडें ।
यास्तव आनंदरूपता न जोडे । सुखदुःखाभावीं सिद्ध ॥७९॥
ऐसें सच्चिदानंद ब्रह्म । तिहीं लक्षणीं सर्वदां सम ।
तोचि हा कूटस्थ आत्माराम । निर्विकाररूप ॥४८०॥
तेंचि लक्षणें आत्मत्वीं असतीं । यास्तव ब्रह्मिच आत्मा चिन्मूर्ति ।
श्रुति युक्ति आणि अनुभूति । तिहीं प्रतीतीं सिद्ध हेंचि लक्षण आत्मत्वीं कैसें ।
प्रस्तुत बोलिजे असे तैसें ।
तें लक्षण ऐकतां विश्र्वासें । मन हें साधकाचें ॥८२॥
सच्चिदानंद ब्रह्म बोलिलें । तेंचि आत्मत्वीं असे पहिलें ।
जें का अस्ति भाति प्रिय म्हणितलें । अपर पर्यायें ॥८३॥
अस्ति म्हणजे आहेपणा । तेंचि सद्रूप पूर्णपणा ।
भाति म्हणजे चिद्रूप देखणा । प्रिय रूप आनंद ॥८४॥
एवं आस्ति भाति प्रियरूप आत्मा । तोचि सच्चिदानंद परमात्मा ।
येथें भेद नाहीं एक नामा । वाचून कांहीं ॥८५॥
सूर्य भानु नामें दोन । परि द्विधा नव्हे सहस्त्रकिरण ।
तैसाचि आत्मा ब्रह्म पूर्ण । नामभेदें एकरूप ॥८६॥
असो अस्ति भाति आणि प्रिय । याचा पिंडीं कैसा प्रत्यय ।
तेंचि बोलिजे यथान्वय । दृष्टांतासहित ॥८७॥
मी आहे जों सर्व जनांसी । आहेच आहे दिवा कीं निशीं ।
मी नाहीं हा संशय कोणासी । कधींही नव्हे ॥८८॥
सर्वत्रांसी पुसोनि पहावें । कीं सखया अससी कीं नव्हे ।
तरी तो म्हणे हें काय बोलावें । नलगे असतां ॥८९॥
जरी मी नाहीं उगेंच बोलतां । लाज वाटे तयाचे चित्ता ।
आणि अहाचि वाटे समस्तां । हंसून भाविती भ्रम ॥४९०॥
ऐसा आहेपणा जो आपुला । सर्वत्रीं असे संचला ।
येथें संशय नाहीं कोणाला । हा अस्तित्त्वें आत्मा ॥९१॥
आहेपणा जागृतींत असे । स्वप्नींही भास देहीं वसे ।
बहु बोलणें कासया अपैसें । आहे झोंपेमाजी ॥९२॥
झोपी गेला परी मी नाहीं । ऐसा प्रत्यय नसे कवणाही ।
मी निजलों होतों निःसंदेहीं । या रीती आहे हा प्रत्यय ॥९३॥
एवं आहेपणा सांगितला ऐसा । आतां चिद्रूप भातित्वें असे कैसा ।
तोही बोलिजे सावध असा । निरूपणासी ॥९४॥
कर्णीं शब्द हा जाणतसे । त्वचीं स्पर्शातें ओळखीतसे ।
शब्द स्पर्श हे दोन्ही भिन्नसे । परी ज्ञान दोहींचें एक ॥९५॥
शब्द स्पर्श जाणिले जया ज्ञानें । तेणेंचि रूपातें अनुभवणें ।
रस गंधातेंही ओळखणें । ज्ञानें ययाची ॥९६॥
श्रोत्र ऐके परि देखेना । डोळा देख परि ऐकेना ।
एवं इंद्रियांचे धर्म घेववतीना । एकाचे एकासी ॥९७॥
परि पांचांतें जाण एकलें । तें कधींही न जाय लोपलें ।
जरी ते विषय वेगळाले । परि ज्ञान एक ॥९८॥
हे असो कर्मेंद्रियांची क्रिया । जाणणेंचि होय ज्ञाना यया ।
अथवा जडत्वें पंचविषयां । जाणें तेंचि ज्ञान ॥९९॥
एवं जागृतीचे जितुके व्यापार । बहुधा परी पांचची प्रकार ।
तितुकेही जाणे सविस्तर । स्वप्रभें ज्ञान ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP