मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १६०१ ते १६५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १६०१ ते १६५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


परी पाहणें धर्म तिचा विद्यावृत्तींत जें बिंबलें ।
ईश हें नाम तया आलें । सर्वज्ञ सर्वशक्तिमान उमटले ।
धर्मही तेथें ॥१॥
उगीच प्रेरणा करावी । कर्मसुत्रें स्फूर्ति द्यावी ।
हाचि धर्म असे स्वभावीं । नियंतृत्वें ईशाचा ॥२॥
येथें कोणी आशंका करिती । कीं ईश प्रेरिता जीवाप्रति ।
तरी होणार तें न चुके कल्पांतीं । मग जीवाचा यत्न व्यर्थ तरी अवधारा याचें उत्तर ।
होणार तें न चुके अनुमात्र ।
परी प्रयत्न करिती जे नर । हाही भोग सुखदुःखाचा ॥४॥
मग पुरुषप्रयत्न काय राहिला । म्हणसी तरी ऐके या बोला ।
प्रवृत्तिरूप भोग जीवाला । येविषयीं प्रयत्न नको ॥५॥
होणार ते अन्यथा न घडे । न होणार तें नव्हे कोडें ।
हा नेमचि असे प्रवृत्तीकडे । तो न करो करो प्रयत्न ॥६॥
तस्मात् प्रयत्न प्रवृत्तीचा न करावा । घडणार तें घडेल स्वभावा । परंतु निवृत्तिरूप मोक्ष स्वभावा ।
प्रयत्नेंवीण नव्हे प्रारब्धाधीन मोक्ष नाहीं । कारण कीं अभोक्ता आत्मा विदेही ।
तो कळावा विचारें निःसंदेहीं । तेथें सुखदुःखें आटतीं सुखदुःख होणें तें प्रारब्धें घडे ।
कर्महानि प्रारब्धें केवीं जोडे । तस्मात् परमार्थप्राप्ति घडे ।
श्रवणादि प्रयत्नें ॥९॥
अमुक करीन जीवा उद्भवे । तेंचि ईश्र्वरें यया साह्य व्हावें ।
तरी मग अपौरुषत्व संभवे । जीवासी कैसें ॥१६१०॥
असो धर्मधर्मी सांगत असतां । मध्यें आलें तें बोलिलें तत्त्वतां ।
जीवाचा धर्म ऐके आतां । ईश प्रेरिता सहज ॥११॥
अविद्येमाजीं बिंबला असे । तया नेणिवेसीही स्फुरवीतसे ।
पुढें बुद्धि प्रगटतां अपैसें । तेही भासवी विषयांत ॥१२॥
हें पुढें बहुधा निरूपण । जीवाचें रूप स्पष्टतर होणें ।
परंतु जीवाचा धर्म स्फुरवणें । बुद्धींत बिंबून बुद्धीसी ॥१३॥
एवं सहजत्वें वृत्ति जे निर्विकारी । उठली जळीं जेवीं लहरी ।
तयेचे प्रकार बोलिजे चारी । जीव ईश विद्या अविद्या तया वृत्तीचा जो
परिणाम । संकल्परूप मनोधर्म । होय नव्हे संशय परम ।
हेचि मनाचे स्वभाव ॥१५॥
संशय न फिटतां ध्यास लागे । वारंवार स्मरतें वाउगे ।
तेंचि चित्त भिन्न दिसे प्रसंगें । परी तें मनचि ॥१६॥
अमुक होय अथवा नव्हे अमुक । निश्चय करी धर्म हा एक ।
तेचि बुद्धि निश्चयात्मक । धर्माधर्मीं भेद नाहीं ॥१७॥
दुसरा धर्म एक बुद्धीचा । करणें न करणें अभिमान साचा ।
तो अहंकार नामें वेगळा कैंचा । बुद्धीहूनी ॥१८॥
एवं अंतःकरणचतुष्टय । नामें परी असती द्वय ।
मनोमय विज्ञानमय । कोश दोन्हीं ॥१९॥
कोश म्हणजे आहे जें रूप । तें आच्छादून भावावें दुजें अल्प ।
तयाचि नांवें जाणिजे विक्षेप । जग उद्भवासी ॥२०॥
तेचि अंतःकरणवृत्ति उद्भवे । इंद्रियद्वारा विषयीं धांवे ।
ते पांच प्रकार तया म्हणावें । ज्ञानेंद्रिय ऐसें ॥२१॥
श्रोत्रें बरा अथवा वाईट । शब्द ऐकावा हा धर्म स्पष्ट ।
मृदु कठिण ओळखणें अविट । हा धर्म त्वचेचा ॥२२॥
चांगलें ओंगळ रूप पहावें । हा चक्षूचा धर्म स्वभावें ।
तीक्ष्णादि सर्व रस घ्यावे । हा धर्म जिव्हेचा ॥२३॥
सुगंध दुर्गंध घ्यावा । निवडून । यया धर्मासीच नाम हें घ्राण ।
एवं ज्ञानेंद्रियपंचकै कडून । पंच विषय घ्यावे ॥२४॥
उगेचि कांही कळणे नसतां । जडत्वें वावरती देहा आंतौता ।
अन्नरसा पचवून । समस्तां । देहा पुष्टी द्यावी ॥२५॥
क्षुधा तृषा जयाच्या विहरणें । मना इंद्रियां जयांत राहाणें ।
देहालागींही होय जिणें । हे धर्म प्राणाचे ॥२६॥
या प्राणयोगें कर्मेंद्रियासी । वर्तणें असे स्वस्वक्रियांसी ।
प्राण कर्मेंद्रिय प्राणमय कोशीं । असती दहा ॥२७॥
वाचेंनीं वर्णोच्चार करावा । शब्द तितुका मुखीं बोलावा ।
हा धर्मचि वाणीचा जाणावा । जेणें प्रवृत्ति निवृत्ति चाले घ्यावें द्यावें पदार्थांसी ।
हा धर्म असे पाणींद्रियांसी ।
गमन करवावें स्थूलदेहासी । हा धर्म पादांचा ॥२९॥
मैथुनानंद प्रजोत्पादन । हा उपस्थेंद्रियाचा धर्म होणें ।
मलोत्सर्ग सर्वही करणें । गुदाचा धर्म हा ॥१६३०॥
एवं स्फुरणादि कर्मेंद्रियांत । जितुकीं चंचंल तत्त्वें समस्त ।
तितुकींही धर्मधर्मीसहित । जलापरी सांगितलीं ॥३१॥
उगेंचि जडपणें असावें । दृश्यत्वें वाईट बरें दिसावें ।
विकारें वाढावें मरावें । हा धर्म देहाचा ॥३२॥
घटापरी उत्पत्ति नाश । जड पराधीन दृश्य ।
हा स्वभावचि विशेष । साकारमात्राचा ॥३३॥
असो स्थूळ घट सूक्ष्म जल । त्यांत प्रतिबिंब तो जीव केवळ ।
ऐसेचि जाणावे पिंड सकळ । ब्रह्मादि कीटकांत ॥३४॥
सर्वांमाजीं तत्त्वें इतुकीं । धर्मधर्मीसहित निकीं ।
असतीं न होतीं न्यूनाधिकीं । स्थूल सान थोर जरी ॥३५॥
जैसे धातु खापरें शेणाचे घट । सान किंवा असोत मोठे ।
परी जल आणि प्रतिबिंब गोमटें । सर्वांमाजीं सारिखें ॥३६॥
तैसे देव मानव कीटकांचे । साकार सान थोर सर्वांचें ।
परी सूक्ष्म तत्त्वेंसहित जीवाचें । एकरूप सर्वों ॥३७॥
ऐशीं नाना पिंडें जंगमाचीं । आणि साकारता सर्व स्थावराची ।
जया ब्रह्मांडीं वस्ती इतुक्यांची ं तीं पंचमहाभूतें जड सर्व घटासहित
सप्राकार मठ । इतुकियांतही एक आकाश दाट ।
पातळ व्यापलें अविट । एक रेणु रिता नाहीं ॥३९॥
घट जल प्रतिबिंबासहित । सर्वही मुख्य आकाशें व्याप्त ।
परंतु सर्वही विकारासहित । संचलेपणें असे ॥१६४०॥
तैसें ब्रह्मात्मत्व सघन । सच्चिदानंद परिपूर्ण ।
मायादि तृणांत जें निर्माण । व्यापून असे ॥४१॥
पंचमहाभूतें व्यापिलें । सर्व ब्रह्मांड जें दृश्यत्वें रचिलें ।
त्यांतील सान थोर देह दाटले । ब्रह्मात्मयानें ॥४२॥
सूक्ष्म तत्त्व तें जितुकें सांगितलें । त्यांत जीवेशही प्रतिबिंबले ।
हें इतुकेंही व्यापून ठेलें । निश्चल पूर्ण ॥४३॥
ऐसें सच्चिदानंद व्यापक । अन्वयें अनुस्यूत एक ।
हें निरूपण निश्चयात्मक । पुढील पदीं असे ॥४४॥
येथें रूप नाम जें जें उद्भवलें । अथवा रूपरसादि दृश्य जेतुलें ।
इतुक्यांचे धर्माहून भिन्न संचलें । हें निरूपण या पदीं ॥४५॥
सर्व धर्मधर्मी कळल्याविण । स्वस्वरूप केवीं कळे विलक्षण ।
यास्तव सदृष्टांत केलें निरूपण । जें जें रूप जयाचें ॥४६॥
आतां रविदत्ता जें स्वस्वरूप । कवणाऐसें असे पाहे साक्षेप ।
तोही संवाद कीजेल अल्प । सावधान असावें ॥४७॥
जैसें आकाश काय मठासम । कीं घट जला ऐसा नेम ।
किंवा प्रतिभास गगनाचा । भ्रम ।
तयासारखें तरी असे तैसें परब्रह्म सच्चिदघन ।
जें व्यापक रितें नव्हे तृण ।
तें कवणाऐसें पाहे विचारून । पिंडब्रह्मांडीं ॥४९॥
आधीं पिंडींचा शोध घ्यावा । मग ब्रह्मगोळ त्या रीतीं जाणावा ।
ब्रह्मसाम्यता यया सर्वां । कवणिया असे ॥१६५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP