सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६५१ ते ७००
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
तेवीं सामान्य साक्षीं बोधात्मा । स्वप्रकाश चिदात्मा ।
त्याचा आभास हा जीवात्मा । तद्भासें तद्वत् ॥५१॥
एवं या रीतीं हा जीव खरा । चिद्रूप नव्हे हा भास सारा ।
तसेंचि प्रियत्वही विचारा । यया नसे ॥५२॥
पूर्वी प्रियत्व सर्वांचें । निषेधिलें स्त्रीपुत्रादिकांचें ।
कीं आत्मार्थ प्रिय असती साचे । तेव्हां प्रियतर स्वयें ॥५३॥
येथें कोणी मंदमती । मानील कीं आपुली देहाकृति ।
सर्व आभासाही शास्त्रें म्हणती । आत्मा म्हणोनि ॥५४॥
तस्मात् अनात्मिया आत्मा म्हणणें । हीं चार्वाकाचीं लक्षणें ।
देहात्म वादादि निरसणें । युक्ति स्वानुभवें ॥५५॥
देह जरी हा सर्व आवडे । तरी यांतही तारतम्य निवडे ।
नखें केश वाढतां कोंडें । छेदिती स्वयें ॥५६॥
अंगुलीस्तव सडे जरी हात । तरी अंगुली छेदिती त्वरित ।
तस्मात् अंगुलीवरील प्रीत । व्यर्थ म्हणावी ॥५७॥
हस्त तोडितां नेत्र येती । ऐसें कोणी वैद्य सांगती ।
तरी तत्क्षणीं हस्त तोडिती । तेव्हां डोळा आवडे ॥५८॥
कांही अपराधें चक्रवर्ती । शिरच्छेदाची आज्ञा करिती ।
तेव्हां कोणी वांचवी तयाप्रति । नेत्र कर्ण काढोनी ॥५९॥
नेत्र कर्ण जरी गेले । परीं प्राण वांचतां भलें जालें ।
सुखी होय म्हणे निरसलें । अरिष्ट मोठें ॥६६०॥
ऐखादे अपकीर्तीस्तव । विष भक्षून देती जीव ।
कीं मरणाहून अधिक स्वभाव । अपकीर्तीचा ॥६१॥
अपकीर्ति कल्पना मनाची । म्हणजे अंतःकरणचतुष्टयाची ।
तस्मात् अधिक प्रियता साची । मनाची प्राणाहून ॥६२॥
झोंप किंवा समाधी घेतां । तेथें मन वाउगें चिंतितां ।
विक्षेप वाटे आपणा तत्त्वता । म्हणे मज हें सुख नेदी ॥६३॥
तस्मात् अंतःकरणाची प्रीति । आपुल्या प्रियत्वापुढें बिटती ।
येथें खरी आवडी निश्चितीं । कोणाची तें पाहा ॥६४॥
वृत्ताचीची अनावडी होतां । या प्रतिबिंब पडे जें ती अतौता ।
तयाची प्रीति असे केउता । जे नासे वृत्तीसवें ॥६५॥
सर्व स्फूर्तीपासून तृणांत । जितुकें उत्पन्न ईशानिर्मित ।
यावरी जीवाचें असे कल्पित । त्रिप्रकारेंचि ॥६६॥
उपेक्ष्य द्धेष्य आणि प्रिय । जीव कल्पित प्रकार त्रय ।
एक मणीच त्रिधा होय । हेतु तिघांचे ॥६७॥
लाभे तया हर्ष उपजे । तयासी प्रिय होय सहजें ।
अलाभें कोणती दुजे । तयां होय द्वेष्य ॥६८॥
तिसरा उदास जरी देखतां । सहजत्वें होय उपेक्षिता ।
एवं तीन प्रकार मण्यावरुता । तिघीं केला ॥६९॥
तस्मात् एक वस्तु त्रिप्रकारें । कल्पित असे व्यभिचारें ।
यांत कोणतें एक मानावें खरें । प्रिय कीं द्वेष्य उपेक्ष्य ॥६७०॥
प्रिय द्वेष्य नसावें उपेक्ष्यासी । प्रिय उपेक्ष्य नुठावें द्वेष्यासी ।
उपेक्ष्य द्वेष्य न व्हावें प्रियासी । होतां व्यभिचार ॥७१॥
जेथें हा व्यभिचार होय । तेथें एकही त्या मानूं नये ।
ऐसा हा व्यभिचाररूप न्याय । असे युक्तीचा ॥७२॥
येथें म्हणसी मण्यावरी । तिघांची कल्पना ते नव्हे खरी ।
तरी बोलिजेत असे निर्धारी । एक होती त्रिविध ॥७३॥
व्याघ्रादि द्वेष्य असतां । उपेक्ष्य होती दुरोन जातां ।
तेचि कुर्वाळिती पाळितां । तस्मात् द्वेष्य ते न होती ॥७४॥
तृण पाषाण उपेक्ष्य सहज । परी प्रिय होय पडतां काज ।
रुपतां लागतां द्वेष्यरूप सहज । तेव्हां ते उपेक्ष्य न होती पुत्रादि सहज प्रिय असती ।
परी अनकूल नसतां द्वेष्य होती ।
न मानितां तयां उपेक्षिती ।
तस्मात् पुत्र प्रिय नव्हे हाचि न्याय स्थूलापासून ।
वृत्तीपावेतों संपूर्ण । व्यभिचार होतां निश्चयें कडून ।
प्रियता त्या नसे ॥७७॥
मुख्यात्मा जो वृत्ति अधिष्ठान । तोचि प्रियतर सर्वांहून ।
तेथें व्यभिचाराचें दूषण । किमपि नुठे ॥७८॥
प्रियत्वाचीही वृत्ति नुठे । मा द्वेष्य उपेक्ष्य कोठें ।
निर्वृत्तिक सुख गोमटें । संचले असे ॥७९॥
म्हणसी आत्मा जना जाणवेना । तेव्हां उपेक्षा येतसे अनुमाना ।
आणि विष भक्षून देती प्राणा । तेव्हां द्वेष्य होय तरी अवधारीं
बोलिजे । जगीं आत्मा उपेक्षिजे । परी सुख व्हावें वाटें जें ।
ते आत्मयास्तव ॥८१॥
जैसा वृक्षस्थचि जळीं पडला । वाटे तोचि वांचला ।
त्याहून भास जरी समजला । तरी तो मरो कीं वांचो तैसें आपण हेंच वाटे मनीं ।
म्हणोनि दुजा आत्मा नसे जनीं ।
इकडील आपली प्रियता धरोनी ।
तया उपेक्षिले तो म्हणजे आपणाहून वेगळा ।
मानूनि उपेक्षितसे हेळा । आपुले प्रियत्वाचा सोहळा ।
असे तो कवणा ॥८४॥
तैसेंचि विष भक्षून प्राण देती । धिक्कार असो मज म्हणती ।
परी जनीं न व्हावी अपकीर्ति । हे आवडी अकृत्रिम तुम्ही असा फार चांगुले ।
मी हीन निकृष्ट ऐसा बोले ।
तें उपरोधिक जाण वहिलें । परी अंतर्हेतु भिन्न ॥८६॥
हें मुमुक्षूनें पुरतें विचारावें । आत्मा प्रिय द्वेष्य कधीं नव्हे ।
तस्मात् प्रियतमत्व जाणावें । मुख्य आत्मयाचें ॥८७॥
इतुकीयाही निरूपणावरी । जो मूढ न समजे अंतरीं ।
तया पाषाणा शास्त्रें सारीं । आणि गुरुही करी काय ॥८८॥
असो रविदत्ता अव्यभिचार । आत्मा पूर्ण प्रियतर ।
तोचि चिद्रूपही साचार । आणि अस्तित्वें तोचि ॥८९॥
येर हा अवघा आभास । देहादि जीवांत फोस ।
येथें अस्तित्व ना नसे सुरस । प्रिय न चिद्रूप ॥६९०॥
हेंचि आहे आवडे जाणतें । ऐसें अज्ञाना व्यर्थ वाटतें ।
परि हेंचि विडंबन बोलिजेतें । यथार्थ विचारें पहा ॥९१॥
तथापि ऐशिया निरूपणें । संशय न त्यागिजे मनें ।
तरी सावधान अंतःकरणें । दुजा न्याय बोलूं ॥९२॥
जागृतीमाजीं प्रत्यक्ष देहाचें । अस्ति भाति प्रियत्व रुचे ।
तें स्वप्नामाजीं उरे कैचें । विचारें पहा ॥९३॥
स्वप्नामाजींही भास दुसरा । या ऐसाचि कल्पी अंतरा ।
हाचि मी या भास विषयमात्रा । भोगी सुखदुःखा ॥९४॥
मुख्य देह अस्तरणीं पडिला । तया न स्मरे आहे कीं मेला ।
आभास स्वप्नींचा आहेसा केला । तेव्हां निस्तत्त्व प्रत्यक्ष जो भास देहची भास विषयांसी ।
देखत असे त्या समयासी ।
इकडे पडे जो त्याचे त्वचेसी । मृदु कठिणही कळेना ॥९६॥
प्रत्यक्षा सर्पें जरी वेष्टिलें । तयाचें भयही नाहीं वाटलें ।
स्वप्नीं व्याघ्रे जें आभास धरिलें । तेणें आक्रंदोनि रडे ॥९७॥
स्थूलाचें प्रियत्त्वचि असतें । तरी सर्पें धरितां कां उपेक्षितें ।
आणि हें चिद्रुपचि जरी होतें । तरी जाणतें निजलिया ॥९८॥
तेथें आहेपणा जरी असतां । तरी स्वप्नदेहांत कासया येता ।
असो अस्तिभाति तिजी प्रियता । स्वप्नीचिया भासा आली अस्तित्व
तिकडे गेलें । इकडे निस्तत्वें मढें पडियलें ।
जाणतेपण स्वप्नांत आलें । इकडे उरे जडत्व ॥७००॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP