मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २२०१ ते २२५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २२०१ ते २२५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


परी जागृतीसी सत्वगुण । स्वप्नअवस्थेचा रजोगुण ।
श्रुति बोलिली हें वचन । म्हणोनि बोलिलें ॥१॥
असो मिथ्यासी कोणतेंही बोलतां । विरोध न कल्पावा चित्ता ।
ज्या समयीं जो प्रसंग अपेक्षितां । मृगजलवत् बोलावें ॥२॥
सुप्ति अवस्था कारणशरीरा । येथें तमोगुणचि असे सारा ।
एवं सत्व रज तमाचे उद्गारा । जागर स्वप्न सुषुप्ति ॥३॥
दृश्य साकार असे जितुकें । ते द्रव्यशक्तीचे पदार्थ तितुके ।
म्हणून स्थूलासी बोलिलें निकें । द्रव्यशक्ति सर्व ॥४॥
सत्रा तत्त्वें क्रिया करिती । म्हणोनि सूक्ष्मासी क्रियाशक्ति ।
कारणीं गुप्त वासनेसी वस्ती । इच्छाशक्ति यास्तव ॥५॥
स्थूल व्यापार नव्हे बोलिल्याविण । म्हणून वैखरी जागृतीलागून ।
स्वप्नीं ध्यासरूप घडे मनन ।
यास्तव मध्यमा वाचा सुप्तिकाळीं वाचा पश्यंती ।
तेवींच परसेही तेथेंचि वस्ती । कारण कं वेदांत संमती ।
चवथा देह नाहीं ॥७॥
चार पाच नवं तेरा । देह बोलती मतवादी गिरा ।
तो वाउगाचि देहलोभ खरा । धरोनी स्थापिती ॥८॥
विचारें पहातां अंतःकरणस्फूर्ति । तेचि मायादेवी मूळ प्रकृति ।
त्याचें अधिष्ठान तो सच्चिन्मूर्ति । ब्रह्मप्रत्यगात्मा ॥९॥
तयासी देह म्हणूनि कल्पितां । लाज न वाटे तयाच्या चित्ता ।
परी ते अल्पज्ञ स्वरूप न जाणतां । बोलती तें काय खरें ॥
स्थूल सूक्ष्म देह दोन खरे । येथें आढळेचि ना तिसरें ।
दोन्हीहून न कळणें जें निर्धारें । तें कारणशरीर बोलिजे ॥११॥
याहून महाकारण देह एक । ज्ञानासी बोलती मंद तर्क ।
तरी तें ज्ञान असे कौतुक । सामान्य कीं विशेष ॥१२॥
विशेष जरी ज्ञान कल्पिलें । तरी तें सूक्ष्म देहाकडे आलें ।
अथवा सामान्य म्हणतां तं संचलें । चिद्रूप निर्विकार ॥१३॥
तयासी देह ऐसें म्हणतां । त्याची जीभ कां न झडे तत्त्वतां ।
त्या देहाची तूर्या अवस्था असतां । तरी प्रत्यया येती ॥१४॥
जैशी जागृति स्वप्न सुषुप्ति । एका नसतां एकीची प्रतीति ।
तैशी तूर्यावस्था तिहीं परती । कोठें कोणीं देखिली ॥१५॥
जागृती माजीं विवेकसहित ।जाणीवदशा असे स्फुरत ।
तैशीच स्वप्नीं किंवा सुषुप्तींत । लोप नसे तयेचा ॥१६॥
जें तिहींमाजी सदा असे । तयेसी अवस्था म्हणून बोलणें कैसें ।
जें तिहीं अवस्थांहून नसे ।
भिन्न प्रतीति योग्य समाधिकालीं जरी कोणी ।
तूर्या अनुभविली ऐशी मानी । तरी तया पुसावें कर्णीं ।
सविकल्प कीं निर्विकल्प ॥१८॥
सविकल्प म्हणतां तेचि वृत्ति । सूक्ष्माकडे येत निश्चिती ।
निर्विकल्प म्हणतां ते निवृत्ति । अंतःकरणाची ॥१९॥
तें अंतःकरण विद्याअविद्यात्मक । तेंचि कारण शरीर आवश्यक ।
आतां तूर्या म्हणुनियां तर्क । कवणासी करिसी ॥२०॥
तथापि तेचि तूर्या मानिसी । तरी ब्रह्मानुभव कैंचा तुजसी ।
केव्हां वृत्तीसवें भरंगळसी । केव्हां पडसी शून्यीं ॥२१॥
उगें चाटपणें बडबडितां । तूर्या उन्मनी आल्लेख उल्लेखता ।
हें सर्वहि वृत्तिसापेक्षता । तया चिद्रूपज्ञान कैचें ॥२२॥
असो तया मंदासी काय काज । परी ते धन्य साधक सिद्ध महाराज ।
जे वृत्तीनें अनुभविती कीं निजीं निज अंगें ब्रह्म जाहले ॥२३॥
त्रिपुटीसहित ब्रह्मानुभव । तयासी सविकल्प हें नांव ।
तें कर्तृतंत्रलक्षण स्वयमेव । पुढें कळे निरूपणीं ॥२४॥
जो त्रिपुटी त्यागें निजांगें जाहला । तो वस्तुतंत्र सिद्धत्वें संचला ।
हाही निरूपणें जाय कळला । प्रसंगानुसार ॥२५॥
सूक्ष्म देहाचाचि तळवट । निःशेष अज्ञानाचा भरोनि घोट ।
जाहला आत्मा ब्रह्म निघोट । निजांगें तोचि धन्य ॥२६॥
येर हे मतवादी सेवकासी । राजा कल्पूनिया निश्चयेंसी ।
वाउग्या कल्पना करून देहासी । वाढविती आवडी ॥२७॥
प्रत्यगात्मया म्हणती अभिमानी । तूर्या अवस्था ते मूर्घ्नि स्थानीं ।
निरानंद भोगया महाकारणीं ।
आणि अर्धमात्रा प्रत्यगात्मा मी ब्रह्मस्फूर्ति ।
ऐशी जी अभिमानात्मक वृत्ति । हे तों सूक्ष्मदेहाची जाति ।
चिदाभास जीवाची ॥२९॥
तो अभिमान मुख्य आत्मया । होईल कैसा ब्रह्म अद्वया ।
तस्मात् यथार्थ स्वरूप मतवादिया । कळलेंचि नाहीं ॥३०॥
अर्धमात्रा कीं निरानंदभोग । स्थान मान कैचें पूर्ण जें असंग ।
अद्वय ब्रह्म निर्विकार अभंग ।
तो विकारी जीव कैसा तस्मात् साधकेंएक करावें ।
मतवाद्याचे कुतर्क त्यागावे । देहत्रय पंचकोश निरसावे ।
चवथा प्रत्यगात्मा ब्रह्म ॥३२॥
आणीकही चार चार जितुके । वेद मुक्ति शून्यादि तितुके ।
हे वादी चहूंवरी कौतुकें । स्थापिती प्रमाणादि ॥३३॥
ते ते सर्वही विसर्जुनी । देहत्रय पहावें विचारूनी ।
अवस्था स्थान अभिमानी । त्यागून ब्रह्म व्हावें ॥३४॥
देहत्रय हे मुख्य अनात्मा । चवथा निर्विकार ब्रह्म आत्मा ।
हें यथार्थ जाणेल तो महात्मा । साधक धन्य धन्य ॥३५॥
येथें कोणी म्हणेल मंदमति । कीं चार देह बोले मांडुक्यश्रुति ।
तरी ते अवधारा एकाग्र चित्तीं ।
देहत्रयचि बोले चतुर्थ पाद म्हणून सांगत ।
परी तो देह म्हणून न बोलत । जरी देहच तरी कासया शाश्र्वत ।
म्हणती श्रुति ॥३७॥
तो अंतःप्रज्ञ। ना नव्हे उभयात्मक प्रज्ञ । अदृश्य अग्राह्य असंज्ञ ।
अलक्षण आत्मा ॥३८॥
एक आत्माचि प्रत्यय सार । सर्व प्रपंचाचा उपसंहार ।
तयासी या तिहींस्तव उच्चार । चौथा ऐसा केला ॥३९॥
परी तो चौथा नव्हे निश्चयात्मक । जेथें एकपणाचा नसे संपर्क ।
तोचि शिव शाश्र्वत साधक ।
देहत्रयत्यागें जाणती तस्मात् रविदत्ता पाहे पुरता ।
तोचि तूं आत्मा ब्रह्म तत्त्वतां ।
हे सत्यप्रतीति त्रिविधता । अन्यथा नव्हे नव्हे ॥
हा देह साकार पंचभूतांचा । जड दुःखरूप अस्थिमांसाचा ।
तुज निर्विकारा विकार कैंचा । आहे तैसा अससी ॥४२॥
तया देहाचे व्यापारा । जागृति अवस्था बोलिजें गिरा ।
तुज ब्रह्मात्मया निर्विकारा अवस्था कैंची ॥४३॥
तया जागृतीसी नेत्रस्थान । कल्पिलेंसे सर्वांग जागरण ।
तूज ब्रह्मात्मया स्थान मान । कवण बोले ॥४४॥
हे आकारमात्रा प्रणवाची । तुज अनिर्वचनीया साकारता कैंची ।
याचा अभिमान घेणें ही करणी जीवाची । तूं निरभिमान साक्षी ॥४५॥
सत्वगुण कीं द्रव्यशक्ति । वाचा वैखरी तुज न स्पर्शती ।
या रूपगुणदोषांहून केवळ चित्ती ।
तो तूं अससी ब्रह्मात्मा सत्रा तत्त्वात्मक देह सूक्ष्म ।
हे क्रीडती देहाचें करूनि धाम । या तिहीं कोशां तूं अधिष्ठान परम ।
सर्वातीत आत्मा सत्रांची क्रीडा जे जे होणें ।
तया स्वप्नावस्था अभिधान । तूं तो ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अवस्थातीत ॥४८॥
स्वप्नावस्थेचें स्थान कंठीं । तुज निर्देश न करी कोणी बोटीं ।
उकार मात्रा भासकता गोमटी ॥४९॥
तूं ब्रह्मात्मा भासातीत वाउगा देहाध्यास घेउनी ।
कर्तेपणें जो तैजस अभिमानी । हे तुझिये प्रतिबिंबाची करणी ॥२२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP