सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ११५१ ते १२००
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
असो ऐसें किती बोलावें । धरणीही लिहितां न पुरवे ।
परी अल्प संकेतें समजावें । सर्वही गुण दोषात्मक ॥५१॥
येथें हे कल्पिसी ऐसें । गुणदोष वेदेंचि सांगितले जैसे ।
तैसेचि जीवही भावीतसे । तरी बाध तो कोणता ॥५२॥
तरी याचें उत्तर ऐकावें । जीवें आवडतें उत्तर घ्यावें ।
न आवडे तें तें अव्हेरावें । वेदवचन जरी ॥५३॥
वेदवचनें गुणदोष केले । म्हणोनि तेंचि असे स्वीकारिलें ।
तरी काय हें वचन नाहीं ऐकिलें । तें कां न व्यावें ॥५४॥
गुणदोष पाहणें तो दोष । गुणदोष न पाहणें हा गुण विशेष ।
तरी या वचनें कां निर्दोष । होऊन न परतावें ॥५५॥
येथें भाविसी अंतःकरणीं । का बहूवचनें गुणदोषालागुनी ।
ऐखादे वचन असतां निवर्तनी । प्रमाण कैसें घ्यावें ॥५६॥
तरी गोत्रज मरता सुतक धरावें । ऐसें कश्चित वचन असेल स्वभावें ।
जें जनीं बळकट धरावें । स्वप्नीं न विस्मरतां आणि ब्रह्मचि जीव
अभिन्नपाणीं । अनंत या वाक्याच्या आयणीतरी कां सहसा न
मानिती कोणी । तस्मात आवडे शास्त्र असो पदार्थमात्रासी गुणदोष ।
कल्पून घेतसें शोक हर्ष । हेचि बुद्धीची कल्पना विशेष ।
निर्मित जीवाचें ॥५९॥
पूर्वी ईशनिर्मित जितकें । भोगाचें उपेगा आणि तितुकें ।
हेंचि जीवाचें करणें असिकें । कल्पनायोगें ॥११६०॥
जैशी बापें कन्या निर्मिली । ते भर्त्यासी भोग्य जाली ।
तैशी ईश्र्वरें सर्व सृष्टि केली । ते भोगा आली जीवाचे ॥६१॥
येक स्त्री निर्मिली ईश्र्वरें । तेथें कल्पना करिती हे सारे ।
त्यांत कवणाचें मानावें खरें । हे बरें पहा ॥६२॥
बंधु म्हणे हे माझी भगिनी । पुत्र म्हणे हे माझी जननी ।
भतो म्हणे हे माझी पत्नी । भोग्य क्रीडेसी ॥६३॥
देवर म्हणे भ्रातृभार्या । पितरें म्हणताति कन्या तया ।
सासू जाली असे जांवया । विहिण व्याह्याची ॥६४॥
ऐसे कितेक कितेकापरी । बोलताती स्वजनें सारीं ।
परंतु एकचि असे जे नारी । ते भेदावली नाहीं ॥६५॥
परी हे माझी माझी म्हणून बैसले । सदृढ प्रेमाचें बंधन पडिलें ।
ते मेलिया रडती आपणही मेले । सुखदुःखें शिणोनी परी अज्ञानें वासना बेडी ।
पहिली ती न सुटे सांकडी । उगीच जन्मती मरती बापुडीं । उंच नीच योनी ॥६७॥
येथें तुझी होईल भावना । कीं जीवें उगीच केली कल्पना ।
परी दुजी कोणती केली रचना । ईशनिर्मितावरी ॥६८॥
पहिली स्त्री असतां खरी । येणें कोणती निर्मिली दुसरी ।
आणि भावनेनें सुखदुःखा माझारी । कैसा पडे ॥६९॥
तरी या आक्षेपाचे उत्तर । दिधलें पाहिजे साचार ।
आधीं जीवें निर्मिलें तो प्रकार । पुढें बंधनरूप बोलूं ॥११७०॥
ईशें निर्मिली मांसमयी । ते गोचर असे इंद्रियसमुदायीं ।
दुजी जीवें ही मनोमयी । निर्मिली अंतरीं ॥७१॥
मांसमयी सन्निध नसतां । अथवा ते मरोनिही जातां ।
परी मनोमयची वासने आंतौता । स्मरतां उभी राहे ॥७२॥
मांसमयी चक्षूनें पहावी । मनोमयी मनें आठवावी ।
ते भासतांचि तळमळी जीवीं । आहा भेटेल कधीं ॥७३॥
त्या तळमळीनें परमार्थ नातुडे । आणि येथें स्त्रीसुख न जोडे ।
परी मरतांचि पुनःपुन्हा सांकडें । जन्ममृत्यूचें ॥७४॥
मांसमयीनें येथें बांधिलें । सोडून न जाती कांही केलें ।
मनोमयीनें बंधन पडिलें । परलोकाचें ॥७५॥
तस्मात् मनोमय निर्मित जीवाचें । भिन्न निर्मिताहून ईशाचें ।
आणि याहूनही जीवसृष्टीचें । प्रत्यक्षपण असे ॥७६॥
तृण पाषाणाची घरें करावीं । मृत्तिकेच्या धातु निपजवी ।
धातूचीं पात्रें नगें घडावीं ं बहु कारागिरीनें ॥७७॥
अनेकपरीचें करणें नाना । कल्पनेनें करिती रचना ।
तितुकें बोलतां तें सरेना । कर्तव्यता जीवाची ॥७८॥
परी जितुकें स्थूलानें निर्मिलें । तेणें जीवासी नाहीं बांधिलें ।
निर्बाध असती पदार्थ जेतुले । ईश सृष्टापरी ॥७९॥
मनोमयाची जे प्रीति । हेचि जीवासी बंधनरूप असती ।
हेंचि सांगूं एका दृष्टांतीं । निर्बाध बाधक ॥११८०॥
पुत्र देशांतरा गेला । तो स्वतःसिद्ध सुखरूप असिला ।
परी कोणीं वंचकें सांगितलें कीं मेला ।
तेव्हां रडे अट्टहास्यें अथवा पुत्र मृत्यूही पावतां ।
नायकें जोंवरी त्याची वार्ता ।
तोंवरी न रडे सुखें वर्ततां । दुःख तें नव्हो ॥८२॥
पुत्राचा मृत्यू नव्हे दुःखकारी । अथवा वांचणें नव्हे सुखकारी ।
तस्मात् कल्पनाचि मात्र सारी । सुखदुःखप्रद ॥८३॥
कल्पनेंनें कांहीं एक भावावें । तेव्हांचि सुखदुःखादि व्हावें ।
ना तरी पदार्थ असतां न घडावें । सुखदुःख कदा ॥८४॥
निद्रेंत कवणाचे पुढें मांगें । स्त्री सर्प दोनी असतां प्रसंगें ।
परी ते कल्पनेवीण दंगे । सुखदुःखाचे न होती ॥८५॥
एवं जीवसृष्टि तेचि बाधक । ईशसृष्टि निर्बाधक ।
हें जाणिजे निश्चयात्मक । सत्य सत्य त्रिवाचा ॥८६॥
एतदर्थ तितीर्षु साधक जन । अनेकधा श्रवणादि अभ्यासेंकडून ।
करिती जीवद्वैताचें हनन । तेव्हांचि सुखी होती निःशेष हानि
जीवद्वैताची । हेचि पराकाष्ठा जीवन्मुक्तीची मिथ्यात्वदृष्टि
ईशसृष्टाची । निःशेष हानि नको ॥८८॥
ईशसष्टीचे पदार्थ जितुके । परी ते द्विविध असती तितुके ।
मिथ्यात्वें पाहणें तेंचि निर्बाधकें । साधकें गुरुशास्त्रें ॥८९॥
गुरु सच्छास्त्रावीण कांहीं । साधका तरणोपाय नाहीं ।
म्हणोनि साधकत्व तया पाहीं । उपयोगी परमार्था ॥९०॥
तैशीच जीवसृष्टि दोन रीती । शास्त्रीय अशास्त्रीय म्हणविती ।
शास्त्रीय अहंब्रह्मास्मि अनुभूति । आणि संपत्ति श्रवणादि हे
जीवसृष्टि परी उपयोगी । मुक्ति येणेंचि जीवालागीं ।
यावीण अशास्त्रीय जे वाउगी । त्यागावी साधकें ॥९२॥
अशास्त्रीयाचेही प्रकार द्विविध । एक मंद एक तीव्र द्वंद्व ।
तीव्र ते जाणावे कामक्रोध । मंद ते मनोराज्य ॥९३॥
मनोराज्य तें हे कल्पना । जे सांगितली उंच नीच भावना ।
तिचा परिणाम जे करी यातना । कामादि जीवासी ॥९४॥
तस्मात् कामादि आणि मनाची । कल्पनारूप सृष्टि जीवाची ।
त्यागिली पाहिजे अंतरींची । निपटूनि साधकें ॥९५॥
उंचनीच भावरूपें कल्पना । हें जागृतीचे विषयसुख नाना ।
अहंब्रह्मास्मि प्रतीति गहना । हे मोक्षप्रद सुखद ॥९६॥
एवं जागृतीपासून जीवाची । मोक्षापर्यंत रचना साची ।
त्यांत त्यागणें आग्रहणाची । वेवादणी सांगितली ॥९७॥
तैसेचि ईशसृष्ट पदार्थजात । ईक्षणापासोनि प्रवेशांत ।
रूपरसादि हे विख्यात । सांगितले स्पष्ट ॥९८॥
असो रूपरसादि या पदार्थावरी । जीव कल्पनारूप क्रिया सारी ।
हे बुद्धिगत भावना खरी । नसोनि भावी जीव ॥९९॥
ताःमतेःक्रियाःविषयैःसार्धंचितिःभासयंती ॥
त्या क्रिया ज्या बुद्धिवृत्तीच्याविषयासहित कल्पना जीवाच्या तितुक्या येकदांचि प्रकाशवीसाच्या ॥१२००॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP