सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५०१ ते ५५०
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
अनेकधा व्यापार असतां । एकचि ज्ञान जाणे समस्तां ।
अंधार कीं प्रकाश न म्हणतां । जाणे देहक्रिया ॥१॥
ऐसें सर्व जागृतींत जाणे । स्वप्नही ओळखावें तेणें ।
तें दुजें जरी मानिजे कोणें । तरी जागरीं नाठवी ॥२॥
स्वप्नींही विषय भासती । प्रत्यक्षविण बुद्धीच कल्पिती ।
ते ते भासरूपें उमटती । परी विषय पांच ॥३॥
तेथें आपणही आहे एक । येर अन्य सुखदुःखदायक ।
त्या उभयांसीही प्रकाशक । एकलें ज्ञान ॥४॥
याचि रीतीं स्वप्नं जागर । जाणिले ज्या ज्ञानें सविस्तर ।
तेंचि ज्ञान निर्विकार । जाणें सुप्तींतें ॥५॥
सुप्तींत जाणणेंचि नाहीं । ऐसें न कल्पावें कोणीं कांहीं ।
हें बोलणें पुढें सर्वही । कळे अनुक्रमें ॥६॥
प्रस्तुत दोनी अवस्था जेणें । जाणल्या असती ज्ञानें ।
तेणेंच सुप्ती अनुभवणें । बोलली एकरूपता ॥७॥
ऐसिया नित्य अवस्था तीन । होत असती जीवालागून ।
परी तें एकलेंचि जाणे ज्ञान । आपुल्या प्रकाशें ॥८॥
नैमित्तिक मूछा समाधि । होय जरी केव्हां कधीं ।
परी तयासीही ज्ञान आधीं । जाणतचि असे ॥९॥
अमुक ज्ञाना कळल्याविण । किंचित्कार्य नव्हे आन ।
होयसें नायकों न देखों पूर्ण । तिहींही लोकीं ॥५१०॥
दिवसा ज्या ज्ञानें जाणिलें । प्रकाशामाजीं अनुभविलें ।
त्याचि ज्ञानें ओळखिलें । सूर्याभावीं ॥११॥
जेणें आजि जाणिलें सर्वें । तो उद्यां जाणेल स्वयमेवें ।
कालीचें शिळें आजीचें नवें । नव्हे सहसा ॥१२॥
रविवारी तें मंदवारीं । बीज पौर्णिमा एकसरी ।
शुक्ल कृष्ण पक्षां भेद परी । ज्ञान तें एक ॥१३॥
बारा मास वर्षें साठी । वाउगी नामाची परिपाठी ।
परंतु शत वर्षांही शेवटीं । एकलें ज्ञान जाणे ॥१४॥
एवं मरणांत एक देह जाणिला । दुजिया होतांच पाहूं लागला ।
मध्यें संधीही ओळखिला । एकलें ज्ञानें ॥१६॥
ऐसे अनंत देह होऊन गेले । बहुधा चतुर्युगही लोटले ।
ऐसें कल्पही उदंड जाले । परि तें जाणिलें ज्ञानें ॥१७॥
नित्य कल्प नित्य कल्पाचा संधी । जाणत असे ज्ञान निरवधी ।
महाकल्पाचे लयाही कधीं । जाणिल्याविण न राहे ऐसें ज्ञान जें सदोदीत ।
उपकरणाविण प्रकाशित । तिहीं काळीं जें अबाधित । चिद्रूप एक ॥१९॥
कधीहीं नाश नाहीं जयासी । तरी चिद्रूपचि कीं अविनाशी ।
तेंचि सद्रूप या दो लक्षणांसी । भेद सहसा नाहीं एवं सद्रूप तें चिद्रूप ।
तयासि अस्ति भाति हे जल्प । आतां तिसरें जें कां आनंदरूप । प्रियताही बोलिजे ॥२१॥
हेंही स्वरूपलक्षण तिसरें । जें सर्वांचें अनुभवानुकारें ।
तेंचि बोलिजे रविदत्ता अरे । अल्प संकेतें ॥२२॥
सर्वांसी सर्व प्रिय असती । ते कवणाचें निमित्त आवडती ।
ते विवेकें पाहतां कळों येती । कीं आपणाप्रीत्यर्थ ते ते जरी आवडती खरे ।
तरी क्षणाक्षणां न विटती सारे । आपणा उबग येतां येरे । भोग्यजाता उपेक्षी ॥२४॥
पति स्त्रियेची आवडी धरी । क्षणां विटून परती सारी ।
तिनें प्रार्थिताही चाड न धरी । छळितां अधिक त्रासे ॥२५॥
स्त्रियेसी भोगइच्छा नसतां । बळात्कारें भोगही घडतां ।
आवडी नुपजें कदां चित्ता । इच्छी तरी प्रिय वाटे ॥२६॥
पुत्र प्रिय मातापितरां । यास्तव चुंबिती त्या लेंकरा ।
त्यांचे प्रीतीस्तव तरी तें अवसरा । कंटाळून रडे ॥२७॥
मायबापें आपण रक्षिती । म्हणून आपणानिमित्त आवडती ।
आपणासि जे उपेक्षिती । त्यांची आवडी कोणा ऐसेंचि भ्राता मित्र स्वजन ।
पशु वृत्ति राज्यादि धन । आपणासाठी भोग संपूर्ण ।
आवडते होती ॥२९॥
दुर्बाह्मण्य आपुलें जावें । यास्तव वेदशास्त्र पढावें ।
अति प्रेमें देवासी भजावें । परी सुखी व्हावें आपण ॥५३०॥
मोक्षप्राप्ती आपणा व्हावी । यास्तव गुरुपदीं आवडी धरावी ।
श्रवणादि साधनेंही करावीं । आपुलीया हेतू ॥३१॥
ऐसे जागृती आदि मोक्षावरी आपणा निमित्त आवडी सारी ।
तस्मात् ते ते प्रियताचि नव्हे खरी ।
उगी वरी वरी धरियेली आपुलें कार्य जोंवरी होणें ।
तोंवरी अन्यासी प्रीति करणें । तूं मज आवडता जीवें प्राणें ।
परी तें उपरोधिक ॥३३॥
उपरोधिका म्हणावें खोटें । खोटें तें कधीं जाय पालटे ।
ऐशी आपुली आवडी कोठें । अन्या निमित्त ॥३४॥
निमित्तावांचून सहज आवडी । आपुली आपणा असे गाढी ।
स्फूर्तिही न होतां घडफुडी । आहे तैशी आहे ॥३५॥
स्फूर्ति म्हणजे मी किती आवडता । ऐसा भाव उत्पन्न न होतां ।
निरिच्छ आवडी असे तत्त्वतां । अकृत्रिमपणें ॥३६॥
भाव उठे जया प्रीतीसी । अकृत्रिम न म्हणावें तिशीं ।
अन्यत्वीं उमटे ते आपैसी । नाशही पावे ॥३७॥
उठे जे स्त्रियादिकांचे ठाईं । त्या प्रीतीसी राग नाम पाहीं ।
अप्राप्त वस्तूचे समुदायीं । इच्छा शब्दें बोलिजे ॥३८॥
यागादि कर्मीं ते श्रद्धा । त्या आवडीसी नांव सुबुद्धा ।
गुरुदेवाचे चरणीं जे मेधा । प्रिति ते भक्ति ॥३९॥
ऐशीं उठल्या प्रीतीसी नांवे । चारीही भिन्न भिन्न अपूर्वें ।
हीं असतीं सहेतुक सर्वें । म्हणून कुत्रिमरूप ॥५४०॥
तैशी आवडी आपुली नसे । अभावीं भावीं सारखी असे ।
तस्मात् आत्मप्रियता ते वसे । अकृत्रिमपणें ॥५४१॥
उत्पन्न होय तें नाश पावे । म्हणोनि उद्भवे तें प्रिति नव्हे ।
उत्पन्न न होतां जें स्वभावें । तेंचि प्रिय निर्हेतुक ॥
ऐशी प्रियता आत्मरूपाहुनी । दुजी नाहीं नाहीं सत्य सत्य वाणी ।
जरी देहांत वृत्तीपासोनी । आवडी परी आत्मार्थ देहादिकांचीही
जे प्रीति वाउगीच ते पुढें बोलिजेती । प्रस्तुत येथें ममत्व रीती ।
निषेधिली पुत्रादिकांची ॥४४॥
असो आपली जे आत्मप्रियता । जे निर्हेतुक अकृत्रिमता ।
हाचि आनंद असे तत्त्वतां । लक्षण तिचें ॥४५॥
आनंदलक्षणही कल्पांती । अविनाश पूर्ण सहज गती ।
तस्मात् हेंचि सद्रूप निश्चिंतीं । चिद्रूपही तेंचि ॥४६॥
एवं अस्ति भाति प्रियरूप आत्मा । हाचि सच्चिदानंद परमात्मा ।
याहून भिन्न त्या त्या रूप नामा ।
भ्रम हा बोलिजे जैसा वृक्षीं बैसला तो आहे खरा ।
तोचि पहातसे पडिलिया नीरा । तोचि आवडता सहजत्वें सारा ।
अकृत्रिमपणें पडिला तो दिसे परी नाहीं ।
पाहेसा वाटे परी व्यर्थ तेंही । भजला काढा ऐशी प्रीति कांहीं । आभासा नसे ॥४९॥
वृक्षीं बैसल्याचा आहेपणा । त्यास्तव त्यासम दिसे जाणा ।
नेत्र उघडून जाला देखणा । परी तो वृक्षास्तव ॥५५०॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP