खंड ९ - अध्याय ३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्गल म्हणती सांप्रत श्रवण । करी गणनाथाचें चरित महान । पूर्णं शांतिप्रद दक्षा पावन । नाना योगेश्वराचें त्या ॥१॥
अयोग मायाहीन सतत । सदा बंधविवर्जित । निमग्न ब्रह्मसुखांत । नित्य रहा विशेषें तूं ॥२॥
स्वानंदाख्य परब्रह्म । गणेशयोगे नष्ट होऊन । पुनः सृजिलें गणेशें मनोरम । पूर्णयोगस्वरूपानें ॥३॥
ऐसें जें पुनः प्रनष्ट होत । बहुत कालांतरें तयाप्रत । पुनः पुनः तो निर्मिंत । पुनरपि तें नष्ट होई ॥४॥
नित्य अयोगसंस्थ असत । ब्रह्मनायक गणेश ख्यात । तो विचार करी चित्तांत । पाहून स्वानंदज भ्रमानें ॥५॥
अहो मायाप्रभावें वर्तत । ब्रह्म स्वानंदधर सतत । नानाभावयुत होत । पुनः जन्मे पावे नाश पुनः ॥६॥
मायाविहीनभावें मीं असत । सदा मोहविवर्जित । अखंड योगसंयुक्त । राहिलों ब्रह्मपरायण ॥७॥
अविनाशिपद मजप्रत । कोणा महात्म्यानें दिलें असत । ब्रह्म नाशसंयुक्त नसत । अविनाशि तें असे ॥८॥
दक्ष म्हणे तें ऐकून । म्हणें पूर्वीं केलेंत वर्णंन । अविनाशि देहिरूप स्वतः उत्थान । निर्मिलेम तेंच निश्चित ॥९॥
स्वसंवेद्याहून परम ब्रह्म । अयोगरूप वर्णिले महान । तेंच विनाशी ऐसें वचन । आतां कैसें बोलता ? ॥१०॥
मुद्गल उत्तर तयास देती । नाश अनाशादि भेद संभवती । स्वानंदापासून जगतीं । भेदाभेदहीन तें स्वसंवेद्य ॥११॥
शिष्याच्या ज्ञानार्थ वर्णिती । योगिजन त्यांसी यथामति । परी सत्यार्थें अशक्य जगतीं । कांहींही भेदाचें वर्णन ॥१२॥
अयोग अविनाश नाम सांगेन । आतां तुजसी महान । नाशरूप स्वसंवेद्य कथन । बोधार्थ ह्यांत न संशय असे ॥१३॥
अयोग चिंतेनें ग्रस्त । जाहला बंधहानिकारणें सतत । निवृत्तिजन्य सुख मानित । तुच्छ सदा तो चित्तानें ॥१४॥
सदा मायाविहीनत्व असत । माझें असें संशयातीत । मायायुक्तविहीनत्व न असत । ब्रह्मांत तें कदापिही ॥१५॥
ऐसा विचार करून खेदसंयुक्त । तो योगमार्गपर होत । अयोग ह्रदयांत संचित । दारूण ताप भोगितसे ॥१६॥
दहा वर्षांनीं गणाध्यक्ष प्रसन्न । ह्रदयांत संस्थित होऊन । आपुला एकाक्षर मंत्र पावन । दावित झाला तयासी ॥१७॥
तो पाहून योग जपत । अति हर्षित ध्यानस्थित । उत्तम मत्रस्वरूपस्थ । गणेशास स्मरे शांतिप्रद ॥१८॥
तदनंतर स्वल्प काळानें दाखवित । गणपति शुभरूप तयाप्रत । गजवक्त्रादि चिहृयुक्त । महाप्रभु अयोगासी ॥१९॥
तननंतर अति विस्मित । विचार करी तो चित्तांत । कोण हा गजानन देव शोभत । दोन स्त्रियांसह ह्रदयांत ॥२०॥
गणेशकृपेनें ज्ञान शाश्वत । जाहलें त्यातें सर्व ज्ञात । अयोग विघ्नेश चेष्टित । जाणून अतिहर्षित झाला ॥२१॥
करी गजाननाचें ध्यान । मंत्र जपे योगज्ञ । शांतिप्राप्त्यर्थ तो महान । अल्प काळें काय घडलें ॥२२॥
पुढयांत प्रकटला गजानन । वरद भक्तवात्सल्यें पावन । महाभक्ताच्या वात्सल्यार्थ महान । दक्ष विचारी तदनंतर ॥२३॥
विप्रा तुझ्या वाक्याचें आश्चर्य वाटत । रहस्य योगग्रथिताचें न ज्ञात । आठ विनायक प्रख्यात । ते सर्वं गजमुख ॥२४॥
एकदंत चिन्हांनेम युक्त । गणेश हे समस्त । संयोगस्थ गणेशानास भजत । अनन्यमानसें सर्वदा ॥२५॥
त्यांच्या ह्रदयांत गजानन । प्रकट होई जेव्हां प्रसन्न । तेव्हां ते विस्मित होऊन । न जाणती स्वरूप ॥२६॥
प्राज्ञ ते नित्य गजानन । एकाक्षररहस्य न जाणती उन्मन । एकाक्षराच्या भावें संस्थित असून । नित्य कां तें समजेना ॥२७॥
तैसा संयोगरूपस्थ । गणेश गणनायक वर्तत । मंत्रयुक्त न जाणत । मंत्रकृतिधर कैसा ॥२८॥
अयोग गणनाथ हा घेत । गजाननाची आकृति मंत्रयुक्त । समंत्र जो न जाणत । गणेश्वरासी हें कैसें ॥२९॥
कैसा हा गणनाथ असत । पूर्णयोगप्रवाचक ज्ञात । न ओळखती विघ्नेश ज्यास भ्रान्त । तत्सम आकृती असोनी ॥३०॥
संयोगांत सिद्धिबुद्धियुक्त । अयोगांत सिद्धिबुद्धिहीन असत । पूर्ण योगांत संयोग अयोग रहित । गणेशान हा असे ॥३१॥
तैसाची उभय मायासंयुक्त । गणेश असे वर्णित । याचें रहस्य काय असत । तें सांग आम्हांप्रती ॥३२॥
मुद्गल म्हणती योग्य प्रश्न । दक्षा रहस्य हें परम अद्भुत पावन । योग्यांसी सुखद पूर्णं । शांतिप्रद भावितात्म्यांसी ॥३३॥
एकाग्रचित्ते ऐक चरित । त्याचें अन्यथा होशील भ्रांतचित्त । जैसें हें विश्व ब्रह्माकरा वर्तत । तथापि न ब्रह्मरूप ज्ञात तया ॥३४॥
जरि तें ह्रदयांत स्थित । तथापि विश्वास अज्ञात । नामरूपविहीन असत । मंत्र त्याचा नसे म्हणूनी ॥३५॥
तपानें होऊन युक्त । प्रभु प्रणवासी पाहत । सर्वाकार महाबीज प्रणवाकृतियुक्त । पाहून विस्मित विचार करी ॥३६॥
तपानें योगभावानें जाणत । चतुष्पाद जगन्मय मंत्रराज वर्तत । जगतासम नंतर योगप्रभावें युक्त । प्रणवार्थ स्वरूपी ॥३७॥
देवास सर्वात्मभावस्थास पाहत । विश्व सारें विनीत । पाहून होत अति विस्मित । मग तो चित्तीं विचार करी ॥३८॥
तपें योगभावें त्या महाप्रभूस । जाणावें ऐसा संकल्प करित । योगप्रभावें शांतिस्थ । गणनायका वक्रतुंडा पाहती ॥३९॥
वक्रतुंडाख्य स्वानंदग ब्रह्म । प्रणव देहरूप मनोरम । प्रणवार्थ गजाकृति परम । संयोगी गणेश योगरूपधारी ॥४०॥
योगाकार महद्रूप पाहून । जाहला तो विस्मितमन । भक्ति समायुक्त मन । भजनार्थं तो वळवी ॥४१॥
ऐसें सुशांतिस्थ ब्रह्म । देहधर होत कैसें परम । त्याची सेवा नितनेम । करीतसे मीं महात्म्याची ॥४२॥
त्याचा हृदयस्थ भाव जाणून । रूपधर प्रभु गजानन । ऐसा पुनरपि पाहून । जाहलें अति विस्मित विश्व ॥४३॥
कोण हा स्वरूप घेत भिन्न । जेव्हां जाणें त्याचे कृपेकरून । गणेशास मूर्तिधरास भजून । अनन्यभावें त्या वेळीं ॥४४॥
मंत्रादींच्या साहाय्यें जाण । विश्वरहस्य आदरें पूर्ण । तैसे गणेश्वर आठ पूर्ण । योगप्रवाचक ते असती ॥४५॥
त्याच्या ह्रदयांत स्थित । ब्रह्म स्वसंवेद्य संशयातीत । महैश्वर्यसंयुक्त वर्तत । परी ते न जाणती तें ॥४६॥
आम्हीं ब्रह्मस्वरूप प्रत्येक । माझ्याहून न परम अन्य भाविक । ऐसें जाणून मोहयुक्त सकलिक । विश्वात्म्यांत खेळती ॥४७॥
नानाविध खेळ करीत । नानाकल्पपरायण ज्ञात । ऐसा बहुत काळ जात । शांति शाश्वत तैं इच्छिती ॥४८॥
तदनंतर क्रीडा त्यागून । स्वमहिम्यांत निमग्न । तथापि विश्वप्रवेश निर्माण । स्वयं करिती अष्ट गणेश्वर ॥४९॥
खेदयुक्त नंतर होत । विचार करित । चित्तात । कोणाकडून झालों प्रेरित । विश्व निर्मितों हें विविध ॥५०॥
म्हणोनि स्वाधीनता नसत । आम्हीं मायामोहयृक्त । न ब्रह्मरूप वर्तत । ऐसा विचार करूनी ॥५१॥
ते तप आचरती समाधिप्रद । तपोबळें योगसंयुक्त सुखद । जाहले गणप ते अष्टबोध । पूर्णयोग स्वरूपांत ॥५२॥
लय पावले सुशांतिस्थ । शांतरूपांत प्रजापते स्वस्थ । तेथ विधि तुज सांगत । संशयनाशक ऐक तो ॥५३॥
योग अष्टधा असे ख्यात । त्याचें स्वरूप सुयोग शोभत । शम दम आसन असत । प्राणायाम चौथा असे ॥५४॥
प्रत्याहार धारणा ध्यान । समाधि आठवी पायरी शोभन । स्वधर्मयुक्त भावें मन । प्रयत्नें नियमन करावें ॥५५॥
ब्रह्मप्राप्त्यर्थ प्रयत्न । त्याचें नाव शम पावन । स्वधर्मस्थिति लाभूत । नियमादि स्वभावें ॥५६॥
सुशांत्यर्थ देहाचें दमन । ब्रह्मप्राप्त्यर्थ शम शोभन । स्वस्तिकादि आसनें करून । योगसाधना करावी ॥५७॥
प्राणायाम तदनंतर अभ्यासून । योगार्थ वायूचें नियमन । नानाविषयभोगार्थ इंद्रियें दमन । करिती सदा स्वभावें ॥५८॥
त्यांपासून त्यास परतवून । योगयुक्त तीं करून । सुशांत्यर्थ मन संयमन । इंद्रियांचें पुन पुनः ॥५९॥
प्रत्याहार तो साधावा महान । आता कथितों धारणा ज्ञान । महावाक्यादींत जें ब्रह्मवर्णन । शब्दार्थभावें तें जाणावें ॥६०॥
ब्रह्मावबोध ह्रदयांत । ऐक्यभावें उत्पन्न होत । आपुल्या त्यानें समाख्यात । घ्यान ब्रह्माचें सुखप्रद ॥६१॥
तदनंतर ब्रह्मांत लीन । तोही स्वयं होत मग्न । न ब्रह्म न स्वयं तेथ असून । तीच समाधी जाणावी ॥६२॥
ऐसें हें योगाष्टक ख्यात । योगप्राप्त्यर्थं विशेषयुक्त । अष्टांग योग हा सेवित । त्यास तो ब्रह्मद पूर्ण होय ॥६३॥
तेथ मायायुत जीव भिन्न देहधर । त्याचें हें अष्टक साधनकर । ब्रह्माकार तत्त्वें विविध कर । विश्वरूप सर्व ब्रह्मे अन्नमुख ॥६४॥
त्यांचा योग आख्यात । त्रिविध यांत संशय नसत । देहादिभावशून्यत्वें सांप्रत । ऐक ते सुखप्रद सर्वही ॥६५॥
धारणध्यानांत दक्षा ख्यात । समाधी तो पुनीत । या तीन योगें समाराधित । शांतिप्रद तीं होती ॥६६॥
स्वस्वब्रह्मांत जे भोग असत । ब्रह्मसुखात्मक अद्भुत । ते सोडून ब्रह्म धरित । तप तेच म्हणताती ॥६७॥
पूर्ण शांत्यर्थ अत्यंत । ब्रह्में जरी संभवत । भोग त्यागून तप त्यांचें ज्ञात । विबुधमते परमश्रेष्ठ ॥६८॥
मनोवाणीविहीन नसत । मनोवाणीमय न वर्तत । ब्रह्मवेदांत विख्यात । तोच हा गणनायक देव ॥६९॥
न तेथ सगुण वर्तत । दक्षा तैसें निर्गुंण नसत । गणेशांत महावेदांत उक्त । योगरूप तो स्मृत असे ॥७०॥
ब्रह्में जेव्हां खेदयुक्त । पराधीन तेणें होत । विचार करून तीं आचरित । तप ब्रह्मप्राप्तिस्तव ॥७१॥
अति तपोबळें ह्रदयांत । स्फूर्ति जी उत्प्न्न होत । योगाचा मंत्रराज तो जाण निश्चित । ब्रह्मांसी तो प्राप्त झाला ॥७२॥
त्यानें होऊन हर्षयुक्त । तो अनुभव तीं स्मरत । तेव्हां तोच जप होत । ब्रह्मांचा तैं अभिनव ॥७३॥
ह्रदयांत जो संस्थित । तो योग तेव्हां तीं पाहत । तेंच गणराजाचें रूप असत । ऐसें प्रख्यात योगशास्त्रीं ॥७४॥
तदनंतर तल्लीन भावें राहती । ब्रह्में जी ती स्थिति । गणेशाची कृपा जगतीं । म्हणती ऐसें बुध जन ॥७५॥
ऐसा योग जरी देहयुक्त । होईल तरी त्याच जगांत । भजूं नित्य ऐसें वांछित । तीं ब्रह्में सर्वदा ॥७६॥
ब्रह्मदेहधारी तो होत । त्यांच्या भक्तीनें विमोहित । आला वर देण्या तयांप्रत । त्यांच्यापुढें गजानन ॥७७॥
ब्रह्माकार चिन्हें जीं पूर्वोक्त । तीं गणेशस्वरूपांत । तीं ब्रह्में तेथ पाहत । प्रणाम करून पूजिती त्यासी ॥७८॥
अंतीं योगमय तीं होत । ऐसें हें ब्रह्मांचें चरित । तपोयोगादिक आचार सांप्रत । अन्य तुज सांगतों दक्षा ॥७९॥
वक्रतुंड गणेशान । खेदयुक्त मनीं होऊन । पराधीनतेनें दक्षा तत्क्षण । शांतियोगपर झाला ॥८०॥
तेव्हां तपोयुत तोही त्रिविध । श्रम करी आदरें योगार्थप्रद । विहार श्रम करितां सुखप्रद । ह्रदिस्थ एकदंतास पाहील ॥८१॥
देहांत ब्रह्मभावें वक्रतुंड स्थित । म्हणोनि श्रेष्ठ देहांत । निराकार तो कोर्तित । म्हणून वक्रतुंड गजानन ॥८२॥
हा वक्रतुंड न जाणत । एकदंता त्या गजाननाप्रत । तेथ भेद तुज सांगत । ऐक चित्त देऊनियां ॥८३॥
त्रिगुणाकार देह तुरीय । मस्तक तें संमत होय । वक्रतुंड त्याच्यायोगें ज्ञेय । बिंदु ब्रह्मप्रवाचक ॥८४॥
चतुर्विधदेहांत मोहयुक्त । जें तत्त्व असे ज्ञात । भेदविहीन सतत । तेंच जीवसंज्ञ जाणावें ॥८५॥
मोहहीन जेव्हां साक्षिरूप असत । परात्मधारक एकदंत । त्यांच्यायोगें सोऽहं मात्र स्मृत । मी तो ही जाण होते ॥८६॥
जीव देहस्वरूपांत । परमात्मा त्याचें शिर असत । गजाकार ऐसा एकदंत । नित्य विलसे दक्ष प्रजापते ॥८७॥
जीवात्मा भेदविवर्जित । पाहून वक्रतुंड विस्मित । ऐसा गजानन तैं विचारित । भेदहीन एकदंतासी ॥८८॥
नानाभेदसमायुक्त । वक्रतुँड तो विचार करित । ह्रदिस्थ सोऽहं आदींत । ब्रह्माकार बिंदु एकदंत ॥८९॥
तो देहादियुत नसत । वक्रतुंड जेव्हां प्रार्थित । आपुल्या ह्रदयांत संगत । तोच ब्रह्म एकदंत झाला ॥९०॥
जैसें हें सर्व जग ब्रह्माकार । तैसा एकदंत वक्रतुंड वक्रतुंड थोर । सगुण नरसंज्ञस्थ उदार । निर्गुण तोत गजवाचक ॥९१॥
त्यांच्या योगें पर ब्रह्म । गजानन हा मनोभिराम । सेवा करण्या परम । प्रार्थिता देहयुक्त झाला ॥९२॥
गणेश हा ब्रह्मरूपाख्य स्थित । नानाविध ब्रह्मांशांत । म्हणूनच गणेश्वर दक्षा न जाणत । अन्यथा गणेश्वर मोहवश ॥९३॥
भ्रांतिभावें सुशांतिद । त्यास न होत विशद । स्वतः उत्थान भावीं सुखद । देह बिंदुमय स्मरिला असे ॥९४॥
सोऽहंशिर गजाकार । त्यांच्या योगें महोदर । ऐश्या नानाभेदें होत थोर । नाना ब्रह्मपरायण ॥९५॥
गणेश्वर स्थित । त्यांच्यांत । गजाननादि चिन्हयुक्त । संयोगें गणनाथाच्या होत । स्वतः उत्थान शरीर ॥९६॥
परत उत्थान मस्तक असत । यांत संशय कांहीं नसत । अयोगांत बुद्धिहीन वर्तत । मस्तक सिद्धि वर्जित ॥९७॥
त्यांच्या असंयोगें देह ज्ञात । गणेश ऐसा जगतांत । पूर्णयोगें शरीरसंमत । संयोगवाचक तें पूर्ण ॥९८॥
अयोग वाचक त्याचें शिर । तेंच गजाकृति थोर । अविनाशार्थ संयुक्त उदार । गजशब्द प्रकीर्तित ॥९९॥
अयोग न परब्रह्म । अविनाशाख्य निरूपण । संयोग अयोग भावाख्य अभिराम । भ्रंति सर्वत्र ज्ञात असे ॥१००॥
निरोध चित्तगा ती कीर्तित । दक्षा सिद्धि नांवें योगांत । संयोगायोग भावस्थाख्यात । बुद्धि जाण भ्रांतिधरा ॥१०१॥
त्यांचा स्वामी गणाध्यक्ष असत । पूर्णयोग प्रवाचक ज्ञात । मी गणेशरूप असत । संयोग अयोग कुठले मला ॥१०२॥
जे मायाप्रभावयुक्त । ते कैसे मज असत । ऐसा विश्वास बाणत । त्यायोगें शांति लाभते नरा ॥१०३॥
सर्वत्र अभेदभावें वर्तत । संयोगात्मा गजानन संदेहातीत । संयोगमायेनें युक्त । सर्वत्र अभेद हीन तो ॥१०४॥
योगरूपी गजानन । अयोगमायायुक्त । असून । व्यतिरेक सिद्धि ही जाण । प्रजापते दक्षा तूं ॥१०५॥
जरी सर्वांत्मक योग म्हणत । गणनायकास नाना ब्रह्मादीत । तो अन्वयार्थ ज्ञात । ऐसें रहस्य जाणावें ॥१०६॥
न आगत न तैसा गत । ऐसा जर गजानन ज्ञात । नाना ब्रह्मविनिर्मुक्त । ही व्यतिरेकात्मक जाणीव ॥१०७॥
म्हणून चित्तलयेंच होत । मी गणेश ही जाणीव निश्चित । चित्तपंचक त्यागून लाभत । पूर्णयोग योगशास्त्रीं ॥१०८॥
तेथ समाधि उत्पन्न । सौख्य सांगतों युक्तिभावें प्रसन्न । गणेशांत मी तदाकार वर्तन । जरी योगप्रभावानें ॥१०९॥
तेव्हां संयोगज उक्त । अनुभव योग्यांच्या ह्रदयांत । जेव्हां परी मीच गणनाथ म्हणत । न तेथ आगत गत कांहीं ॥११०॥
तेव्हां अयोगजन्य अनुभव । शांतिदायक तो स्वभाव । म्हणून अयोगमय योगप्रभव । कैसा तेथ प्रवर्ततो ॥१११॥
चित्त नानाविध वर्तत । दक्षा संयोग अयोग युक्त । योगांत योगात्मक अहं होत । तेव्हां शांति लाभतसे ॥११२॥
शांतीची शांतिरूप असत । ती योगशांति विश्वांत । त्याहून पर न वसत । योगाहून अधिक श्रेष्ठ कांहीं नसे ॥११३॥
म्हणून हा गणनाथ । ब्रह्मणस्पति नामें ख्यात । संयोग अयोग ब्रह्मांचा पति वर्तत । म्हणोनि हा ब्रह्मणस्पति ॥११४॥
ऐसें हें सर्व परम अद्भुत । सांगितलें रहस्य तुजप्रत । दक्षा ऐक पुढील वृत्तान्त । एकाग्रचित्त होऊनियां ॥११५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमें खण्डे योगचरिते गणेशस्वरूपवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP