खंड ९ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्‍गलासी । धन्य मीं कृतकृत्य केलेंत मजसी । तुमचा आज्ञावश ग्रंथासी । गुप्तरूपें मी रक्षीन ॥१॥
आतां मज गणेशभक्ती । सांगावी हो अतिप्रीती । भजेन विशेषें चित्तीं । सदा भक्तिपरायण ॥२॥
मुद्‍गल म्हणती तयाप्रत । सांख्ययोग सांगेन तुजप्रत । त्या उभयतांच्या ज्ञानें युक्त । भक्ति करशील मोदानें ॥३॥
चित्त पंचविध ख्यात । पंच संख्या विवर्जित । तें चिंतामणींत । लीन करी तूं सुयोगबळें ॥४॥
हें सांख्य ज्ञान निर्मळ । गणेशाचें अभेदप्रद बळ । त्यायोगें योगी सर्वकाळ । शांतियुक्त सत्वर होईल ॥५॥
पंचचित्तोद्‍भब भोगांत । तूं अससी सुस्थित । बिंबरूपानें ते भोग समस्त । शांतीनें रससमन्वित हो ॥६॥
चित्तांत चित्त भूतांत । कर्म ज्ञानादिक असत । तें सर्व गणेशार्पण विनत । नित्य करी तूं आदरानें ॥७॥
स्वधर्म संस्थित देहास । करी शांतियुक्त विशेष । सतत दक्षा तयास । करी ब्रह्मभावपरायण ॥८॥
हा योग असे आख्यात । शास्त्रांत सर्व संमत । वेदांत तैंसा पुराणांत । ब्रह्मभूयप्रदायक ॥९॥
सांख्य योगांची आराधना । करून पूजी गजानना । योगाकारास लावून मना । करी तन्निष्ठ तत्परायण ॥१०॥
श्रवण गणनाथाच्या गुणांचें सतत । आदरें कीर्तंन रसयुत । करी तूं दक्षा शाश्वात । गणेशभाव विसरूं नको ॥११॥
गणेश चरणज मोह धरावा । सत्यभावें युक्त करी बरवा । गणेश्वरास पूजावा । सांगोपांग विशेषें ॥१२॥
गणेशाहून परश्रेष्ठ । कोणी अन्य नसे विश्वांत्त । म्हणून त्या गणेशाच्या एकनिष्ठ । सदा हो तूं प्रजापते ॥१३॥
गाणपत्य मार्गांचें सेवन । करीन तूं सदा एकमन । साक्षिरूप गणेशास जाणून । ह्रदयस्थास भजावें त्या ॥१४॥
गणेशाहून मी न भिन्न । ऐशा विचारें करी ध्यान । नवविधा भक्तियुक्त पूजन । करावें तूं दक्षा सदा ॥१५॥
बाह्मांतर गणेशार्थं करी । कर्म आदरें खरोखरी । नवधा खंडभावें उद्धरीं । पूर्ण भक्त तै होशील ॥१६॥
आतां चतुर्विधा भक्ति । सांगतो ऐक तुजप्रती । कायिक वाचिक पूर्णा भक्ती । तैसी मानसी सदा करी ॥१७॥
सांसर्गिकी तैसी असत । दक्षा भक्ति या मार्गांत । तिचें लक्षण सांगतो चित्त । सावधान तूं ठेवी ॥१८॥
गणेशार्थ सदा देहश्रम । करी महामते सप्रेम । गणेशभावविहीन अमनोरम । वाणी ऐसी बोलूं नको ॥१९॥
गणेशाचें करी चिंतन । तैसेंचि गणेशभाविकाचें स्मरण । गणेशभक्तियुक्तांची संगत महान । सर्वदा तूं करी दक्षा ॥२०॥
ऐंश्या परी भजशील । तरी तूं भक्तराज होशील । भक्ति द्विविध भावें भावबळ । मानवांचे दाखविते ॥२१॥
मानव जी भक्ति करित । ती दोन प्रकारची असत । पाखंडयुक्त पूर्ण वर्तत । देवप्रीत्यर्थ अथवा ती ॥२२॥
देहांत विषयभोगार्थ प्रवर्तत । भजन पाखंडयांचें सतत ।  लोकांस तें मोहवित । दक्ष प्रजापते सर्वदा ॥२३॥
पाखंड भजनाचें मुख्य़ चिन्ह । सांगतों तुज ऐक एकमन । लोकहितार्थ लोकतारण । म्हणोनि विशेष महत्व त्याचें ॥२४॥
सर्व अहंकारमुक्त । ऐस पाखंडी दिसे जनांत । ज्यामुळे जन मोहयुक्त । होती ऐसें भजन करी ॥२५॥
जेथ ज्यांची रूचि असत । तैसें तो करित । सर्वभाव दाखवित सतत । पाखंडी तो समजावा ॥२६॥
ज्यायोगें विषयांची प्राप्ति होत । तैसें भजन तो करित । अथवा एकनिष्ठ तो राहत । देवतंत्पर स्वार्थासाठीं ॥२७॥
स्वदेवाच्या भक्तांस भुलवून । गिळंकृत करी त्यांचें धन । तो दुष्ट अर्थलालसा धरून । पाखंडी पक्का तो जाण ॥२८॥
स्वदेवभजनी आसक्त । जन असती स्वल्प मत । त्यांच्या रुचिप्रमाणांत । भजन करी पाखंडी ॥२९॥
जनांस मोहप्रद जी भक्ति । ती सांगितली तुजप्रती । पाखंडी जन सदा सेविती । रुचिप्रदेस या पूर्णपणें ॥३०॥
पाखंडसंयुक्त सतत । भक्ति करिती जे शाश्वत । ते चांडाळ दुःख देत । देवांसी बहु शास्त्रमतें ॥३१॥
सत्यसंकल्प सिद्धीनें युक्त । ऐसा देव उत्तम जो असत । त्यास पकडून ते दुष्ट । भिक्षुक करिती अधोगती ॥३२॥
आतां देवप्रिय भक्ति । ऐक तिची व्याख्या प्रचीती । विचार करून चित्तीं । देवतुष्टिस्तव भक्ति करिती ॥३३॥
सदा देवपर होऊन । अनन्य मानसें करी भजन । लोकांची रुचि वा अरुचि उत्पन्न । होवो त्याची चिंता नसे ॥३४॥
वानोत वा निंदोत । जन जे येथ सुनीतिमंत । दुष्टांची निंदा स्वीकारित । उत्तमांची स्तुती तैसी ॥३५॥
परी ती उभय निंदास्तुति । त्याची ज्याला न गणती । देवाच्या प्रीतिस्तव जगती । भजती जो सर्वदा ॥३६॥
आपुल्या ह्रदयांत विचार । करी भक्त तो सदाचार । भक्ति जी ती जाणत नर । देव त्याच्या ह्रदयीं वसे ॥३७॥
जेव्हां दैवाच्या मार्गाचा । अपमान अनादर करिती याचा । त्यागून संग ऐश्या नरांचा । सर्वदा भजे स्वदेवासी ॥३८॥
लोकांस त्याचें भजन रुचिद । कधीं त्यांच्या होत विरुद्ध । भक्तीनें आपुल्या देवा तुष्टिद । ऐसेंचि जो भजन करी ॥३९॥
या विधीनें दक्षा भजावें । गणनायका तूं भक्तिभावें । गाणपत्य होशील स्वभावें । परात्पर श्रेष्ठ तूं ॥४०॥
पंच चित्तांत जें ज्ञान । तें विषयात्मक जाण । तेथ रुचिविहीन होऊन । भज गणनायका प्रेमानें ॥४१॥
ज्यासी सदा गणेश्वरांत । रसोत्पत्ति दक्षा वाटत । अन्यभावांत चित्त न रमत । तोच खरा भक्त म्हणती ॥४२॥
ऐसें हें भक्तिरहस्य सांगितलें । भक्तिदायक जें भलें । संक्षेपें तुज निवेदिलें । भज गणेशा ब्रह्मनायकासी ॥४३॥
हा जोग जो नर ऐकत । अथवा अकाम ऐकवित । योग्यास वा अन्य जीवाप्रत । त्यास ईप्सित लाभेल ॥४४॥
यासम अन्य कांहीं नसत । योगप्रद शास्त्रसंमत । याच्या श्रणमात्रें होत । नर न्रह्मीभूत सदा ॥४५॥
महापापांतून मुक्त । होईल उपपातकांतून सतत । याच्या वाचनें श्रवणें श्रवणें निश्चित । अंतीं ब्रह्म प्राप्त करील ॥४६॥
पुत्र पौत्रादि संयुक्त । धनधान्य समन्वित । आरोग्यादि लाभत । अंतीं लाभे परमपदा ॥४७॥
सकामक जो हें वाचील । त्यास भोग लाभ होईल । अंतीं ब्रह्ममयता मिळेंल । याच्या श्रवणें निःसंशय ॥४८॥
योगगीता जो वाचित । अथवा निष्काम ऐकत । त्याचें विघ्न सारें नष्ट । ब्रह्मीभूत तो होईल ॥४९॥
योगगीता जो वाचील । तो शांतियुक्त होईल । तैसाचि जो ती ऐकेल । तो होईल ब्रह्मभूत ॥५०॥
तैसाचि तो जानवंत । होईल निश्वचस्थितियुक्त । ऐसी ही योगगीता ख्यात । माहात्म्य तिचें अपूर्व असे ॥५१॥
कर्मनिष्ठांनी ही सेवावी । तपोनिष्ठांनी आदरावी । ती ती सिद्धि प्राप्त करावी । अंतीं ब्रह्मलाभ महन ॥५२॥
नित्य जो ही गीता वाचित । तो गणेशच धरातलीं होत । त्याच्या दर्शनें नर पुनीत । सर्व सिद्दिही पावती ते ॥५३॥
एकदां दोनदां व त्रिकाळ । जो ही गीता प्रतिदिनीं वाचील । तो गणेशा वश्य करील । सर्वदायक तो सदा ॥५४॥
शुक्ल कृष्ण चतुर्थी दिवसांत । जो योगगीता वाचित । तो सकल भोग इहलोकीं भोगित । अंतीं परब्रह्म लाभे ॥५५॥
अथवा भाद्रपद माद्यांत । जो वाची शुक्लचतुर्थी दिनांत । तैसाचि ज्येष्ठ माघांत । कृष्ण चतुर्थी दिनीं सदा ॥५६॥
तयास ईप्सित लाभेल । गणेश प्रसन्न होईल । गणराजाच्या तीर्थक्षेत्रांत वाचील । भावपूर्ण ही योगगीता ॥५७॥
त्यासही ईप्सित लाभेल । गणेशकृपा प्राप्त होईल । वेदशास्त्रपुराणाचें सार अमोल । सांगितलें दक्षा येथ तुला ॥५८॥
योगगीतामय साधन । सर्वंसिद्धिकर महान । दक्षा तुज उपदेशून । कृतकृत्य केलें असे ॥५९॥
ऐसी ही द्वादश अध्यायांत । योगगीता असे ज्ञात । ती वाचून गणेशभक्त । स्वानंद प्राप्त करोत सदा ॥६०॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन भक्तिरहस्यवर्णनयोगो नाम षोडशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP