खंड ९ - अध्याय २६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती शौनकाप्रत । भीमनामा वैश्य अंग देशांत । महापापी सर्वधर्मविवर्जित । दर्शनें पुण्यनाश करी ॥१॥
तो एकदां चौर्यास्तव जात । वनांत तेथ अवचित । राजर्षि विदर्भराज येत । सैन्य घेऊन आपुलें ॥२॥
त्यास पाहून शस्त्रें टाकून  भीम गेला वनांतरीं पळून । प्राणरक्षणार्थ बसला लपून । पुढें नवल एक वर्तलें ॥३॥
मेधातिथि नाम ब्राह्मण । माघशुक्लप्रतिपदेस प्रारंभ करून । मुनिसहवासांत पारायण । मौद्‍गलाचें करूं लागला ॥४॥
तेथ भीम वैश्य जात । पापरत तो त्या मुनीस पाहत । त्यांच्या जवळीं आश्रय घेत । शस्त्रवर्जित त्या वेळीं ॥५॥
राजा तेथ नंतर येत । मुनिपुंगव मेधातिथीस नमित । नंतर सर्व मुनींस भावयुत । नमून परतला स्वस्थाना ॥६॥
विदर्भपती तो भानु परतला । तो वैश्य मुनिवनांत झोपला । प्रातःकाळीं राजभयें आला । स्नान करून पुराणश्रवणा ॥७॥
अन्य मुनिसमर्वत ऐकत । तो भीमवैश्यही पुराण विनीत । पुराणश्रवणें त्या दुरात्म्यांत । बुद्धिभेद त्वरित झाला ॥८॥
तो तेथेंच राहून । विचार करी पापपरायण । म्हणे मीं वैश्य दुरात्मा अपावत । काय करावें आनंदानें ॥९॥
पापी नर जाती नरकांत । यांत संशय कांहीं नसत । नरदेह लाभतां धर्म करित । तोचि मानव धन्य होतो ॥१०॥
ऐसा विचार करून राहत । तेथेंच मौद्‍गल श्रवणीं रत । स्त्रीपुत्रांस त्यागून होत । गणेशलालस सर्वदा ॥११॥
फाल्गुन पूर्णिमेस पूर्ण वाचन । पुराणाचें होऊन । मेधातिथि घाली ब्राह्मण भोजन । प्रतिपदेस हर्षानें ॥१२॥
पारणा करून निरोप देत । सर्वांसी तो गणेशभक्त । नित्य गणेश्वरा भजत । भक्तिभावें संपूर्ण ॥१३॥
भीम स्वगृहास परतून । पापकर्म सारें सोडून । कर्मी स्वधर्मयुक्त रमून । गणपतींत मग्न झाला ॥१४॥
मौद्‍गल श्रवणानें सर्वपापवर्जित । होऊन धर्मशील तो होत । गाणपत्य महायश भक्त । मृत्यूनंतर गेला गणेशलोकीं ॥१५॥
वैश्यज तो ब्रह्मभूत । झाला विघ्नेश्वरास पाहून तेथ । ऐसे नाना जन सतत । मौद्‍गलश्रवणें उद्धरले ॥१६॥
ब्रह्मांत तन्मय झाले । पुण्याशील ते सगळे । तेथ कितीही वर्णन केलें । तरी तें अपूर्णचि वाटेल ॥१७॥
या पुराणश्रवणासम अन्य नसत । पुण्यकारी या जगांत । हें सत्य जाण महामुने सतत । पुराणश्रवण फलप्रद सदा ॥१८॥
ओमितिश्रीसदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे माघादिसार्धमासे मौद्‍गलपुराणश्रवणमाहात्म्यवर्णंनं नाम षड्‍विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP