खंड ९ - अध्याय ५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्गलासी । धन्य मीं मानीन मजसी । गणेशमाहात्म्य ऐकून चित्तासी । मोद माझ्या जाहला ॥१॥
कृतकृत्य तूं मज केलेंस । गणेश गीतसारादि कथिलेंस । ज्ञानयोगप्रद वर्णिलेंस । संक्षेपानें तूं मला ॥२॥
तें सर्व सुलभपणें मजला । पुनरपि सांग या वेळा । क्रमयुत योगबोधाला । ज्यानें योगी नर होईल ॥३॥
सूत म्हणे शौनकाप्रत । ऐसें द्क्ष विचारी मुद्गलाप्रत । तेव्हां मुद्गल जें प्रसन्नचित्त । सांगें तें तुज सांगेन ॥४॥
धन्य तूं कृतकृत्य साक्षात । गणपतीच्या विभूतिज्ञानांत । मग्न होण्यास वांछित । हेंच आश्चर्य परी उत्तम ॥५॥
तूं लोकोपकारक विचारलें । सर्वांच्या सुलभतेस्तव भलें । योग शांतिप्रद प्रश्न सगळें । सांगेन तुजला वेदरहस्य ॥६॥
एकचित्तें तूं ऐक सांप्रत । योग शांतिप्रद उदात्त । चित्त पंचविध वर्णित । त्यांत रस पंचविध असे ॥७॥
सरस चित्त त्यागून । योगी होतो मानव प्रसन्न । क्षिप्त मूढ विक्षिप्त अन्तःकरण । एकाग्र तैसें निरोधक ॥८॥
ऐसें पंचविध चित्त । जगांत ब्रह्मांत स्थित । व्यष्टिभावें जे राहत । ते जंतू विविधात्मक ॥९॥
चौर्यांशी लक्ष योनींत । ते संभवती सतत । देहभोगादि मार्गांत । कुशल होती जे प्राणी ॥१०॥
ते स्वप्रपंचांत । नानाकार्यपरायण असत । कार्यसिद्धयर्थ कार्यांत । त्यांचें चित्त क्षिप्त सर्वदा ॥११॥
त्या त्या कार्यप्रकाशें ह्रदयांत । तें तें सर्वं प्रकाशान्वित । त्यायोगें कार्यांत होत । दक्ष ते यांत संशय नसे ॥१२॥
तेंच क्षिप्तसंज्ञ चित्त । जाण मानदा तूं सतत । कांहीं स्वल्पज्ञ असत । कांहीं संमत ज्ञानाधिक ॥१३॥
कांहीं मध्यम वर्तंत । लोक नाना भेदाश्रित । त्रिविध विभागांत स्थित । नाना विभेदें ते सारे ॥१४॥
नाना ज्ञानयुतांचें रूप । कथन करणें दुराप । चौर्यांशी योनींत । विविधात्मक प्राणी फिरती ॥१५॥
व्यष्टिभावें सर्व कार्यांत । ज्ञानहीन जे असत ते मूढ म्हणोनि ज्ञात । लोकविषयीं चतुरमनानें ॥१६॥
त्यांतही नानाविध भेद । अल्पअधिक सुमध्यम विशद । त्यांचें प्रकाशक चित्त दुःखद । नानामूढस्वभावग ॥१७॥
तेंच मूढसंज्ञ चित्त । जाणावें निश्चये जगांत उपदेश करितां न जाणत । प्राणी जो बोध विचारणें ॥१८॥
कार्य नानाविध वर्तत । त्याचें चित्त मूढ कीर्तित । व्यष्टिस्थ जे नर दक्ष असत । स्वधर्मनिरत सर्वदा ॥१९॥
नाना तपें करून । मुक्ति शाश्वत इच्छिती जन । विषयांत विरक्ति पावून । सदा ब्रह्मपरायण ॥२०॥
करिती विविध कर्में अहर्निश । मुक्तिकारणें सविशेष । तथापि स्वह्रदयीं परेश । ब्रह्म त्यासी न दिसे ॥२१॥
संसारसुखांत त्यांचें चित्त । कोणत्याही न रमत । म्हणून विक्षिप्त चित्त । योगिजन ऐसें त्यांस म्हणती ॥२२॥
ते आंतर बाह्म क्रिया करित । ब्रह्मार्पणभावयुत । विशेषे संसारांत । असते ते फेकले ॥२३॥
हा मायेचा प्रभाव । विगत क्षेपण नानासाधन भाव । त्यांच्या मुक्त्यर्थ भाव । प्रकाशवी अत्यंत ॥२४॥
त्यायोगें क्रियात्मक चित्त । त्यायोगें होत विक्षिप्त । तेथ नाना क्रिया सामर्थ्यें मोहित । देवतेस तुष्ट जाणतसे ॥२५॥
कदाचित् देवप्रसादादि घेऊन । विक्षेपसंयुत होऊन । अनाधार क्रिया करून । देवाज्ञावश व्यर्थ हाही ॥२६॥
स्वप्नांत विविध भाव पाहत । जे जे वसती ह्रदयांत । सत्य माझें स्वप्न मानित । त्यानुसार वागतसे ॥२७॥
ऐशापरी विक्षिप्त भावमोहित । अनाधार तप करित । समष्टि व्यष्टि संस्थचित्त । विराट पर जें परम ॥२८॥
त्यायोगें व्यष्टीस व्यापून । विविध सुखांचें क्ररी सेवन । विराटाची क्रिया व्यापिका असून । शास्त्रसंमत ती असे ॥२९॥
तेथ व्यापक भावाचें चित्त । प्रकाशद असे ज्ञात । तत्त्वांत विविधांत । स्थूल सूक्ष्मादिकांत तें ॥३०॥
व्यापकभावकाशत्वें चित्त । त्यांत मानिती स्थित । अस्मिताख्य परब्रह्म त्यांत । चित्त प्रकीर्तित होय ॥३१॥
समष्टि व्यष्टि व्यष्टि संयोगांत । अन्न ब्रह्म स्थूलग ज्ञात । तैसें स्वप्नगत सूक्ष्म सुषुप्त । समसंस्थित ज्ञात होय ॥३२॥
चेतनाभावग पूर्ण असत । तैसेचि नादात्मक संमत । समष्टिव्यष्टिभागाचा ख्यात । प्रकाशक त्यांच्या ऐक्याचा ॥३३॥
चित्त तें एकाग्र संज्ञित । समष्टि व्यष्टि भावांत भिन्न नसत । त्यायोगें एकाग्र आख्यात । चित्त त्या ज्ञानाचें प्रकाशक ॥३४॥
देह चतुर्विध वर्तत । स्थूल सूक्ष्म समात्मक अस्मित । त्यांस देही वसति करित । देहांत मोहित जीव म्हणती ॥३५॥
मोहहीन देहीस शिव म्हणती । ऐसी विद्वानांची रीती । जीवशिवात्मक संज्ञा असती । देहीच्य भ्रममात्रें सदा ॥३६॥
सदैकात्म स्वभावें भेद न राहत । तेथे जीवशिवाकार भाव असत । त्यांचें प्रकाशकारक ज्ञात । चित्त एकाग्रसंज्ञेनें ॥३७॥
अस्मितायुक्ताहून पर । चित्त न राही एकाग्र । देह देहिमय चित्त एकाग्र । ऐसें मन योगिजनांचें ॥३८॥
चार शरीरांचा जेथ होत । ब्रह्माकारे संयोग शाश्वत । बिंदुरूप तो ज्ञात । योगांत सर्वत्र ब्रह्म ऐसें ॥३९॥
देहंचें ब्रह्म चतुष्पद । चार वर्जितही विशद । नाना देह स्वभाग सुखद । विख्यात ते जाणावें ॥४०॥
चतुष्पदाकारप्रकाशवित । या चारांनी ज्याचें वर्जित चित्त । तें राहतसे तद्गत । योगशास्त्रानुसार ॥४१॥
देहांत जें भिन्न नसत । सर्वात्मभावगत । तें निरोधपर चित्त । बिंदुधर्मप्रकाशक ॥४२॥
जीव शिवांचें ऐक्य ज्यांत । मोहहीन जें सदा आत्मगत । मीं ब्रह्म ही जाणीव असत । भ्रांतिवर्जित सर्वदा ॥४३॥
तेथ जीवशिवाकार । मोहहीन प्रकाशकर । चित्त आत्मस्वरूपस्थ अव्यग्र । निरोध तें बुध म्हणतीं ॥४४॥
देहदेहींच्या संयोगांत । स्वतः उत्थान त्यास म्हणत । बोधाख्य द्वंदभावें खेळत । ब्रह्म जाणा सर्वदा ॥४५॥
तेथ जें निरोधक चित्त । त्याचें रूप मीं सांगेन सांप्रत । संक्षेपें प्रजानाथा तुजप्रत । ऐक चित्त देऊनियां ॥४६॥
ब्राह्म तें स्थूल ज्ञात । अंतर्गत सूक्ष्म वर्तत । ब्राह्मांतर एकभावस्थित । आनंददेहग जें पर ॥४७॥
हया तिघांनीं जें हीन । बालक अस्मिताख्य़ पावन । ‘मी’ च्या अनुभवानें ज्ञान । होत त्याचें योगिह्रदयीं ॥४८॥
त्यांच्या संयोगभावांत । चार देहांच्या जें अतीत । सर्वात्मक ब्रह्म असत । पांचवें तें बिंदुरूपसंज्ञ ॥४९॥
चतुर्विध कल्पना स्थित । नित्य मानवह्रदयांत । त्याहून परांत भेद नसत । ज्याची कल्पना होईल ॥५०॥
बिंदूचा त्याग होत । तेव्हां निरालंब चित्त । तें ब्रह्म ख्यात सतत । ध्यातृविहीन सर्वदा ॥५१॥
भेदच कांहीं जेथ न उरत । म्हणोनि कांहींच न ज्ञात । मी तो परमेश्वर निश्चित । या भावें निरालंब समाधी ॥५२॥
जें चित्त अवलंबन पर । तें देहसंबद्ध समग्र । अवलंबनहीन जें थोर । तं देहस्थ चिन्मय असे ॥५३॥
निरालंबाचा त्याग होत । तैं अधिक संरोधन संरोधन घडत । देहदेहींच्या हीनत्वें सतत । चित्ताचें यांत न संशय असे ॥५४॥
मनोवाणीविहीन । ऐसें तें चित्त ज्ञातक असून । अस्तिनास्तिविहीन । आधार आधेययोगानें ॥५५॥
अवलंबन योग ना वसत । योगि जनांच्या ह्रदयांत । निरालंबनक म्हणून वर्तत । मनोवाणीविवर्जित ॥५६॥
बोधानें सर्व होत ज्ञात । निरालंब तें समाधीनें कळत । अवलंबनकांत न वर्तत । बोधाचा बोध कदापि ॥५७॥
ऐसें बोधात्मक ब्रह्म । देहदेही समाधिप्रद परम । देहदेहि समायोगप्रकाश मनोरम । चित्त ऐसें ख्यात असे ॥५८॥
देह सौख्य तें जाणत । देहिसौख्य निरंतर ज्ञात । त्यांच्या योगें जें सौख्य अनुभवत । तें जाणावें ब्रह्म बोधग ॥५९॥
पदांच्या बोधभावान्नें उत्थित । पदाचा अर्थ समजतां विशेषयुत । उत्थान त्यापासून संभवत । म्हणोनि स्वतः उत्थान म्हणती तया ॥६०॥
सुख जाणून समुत्थान । स्वयमेव जो करी महान । देहदेहीस निर्मुंन । ब्रह्म तत्पर खेळतसे ॥६१॥
तेथ उत्थान प्रकाशक । तें चित्त निरोध नामक । हें योगिह्रदयीं विलसे एक । यांत संशय कांहीं नसे ॥६२॥
बोध त्यागितां प्रख्यात । सांख्य ब्रह्म तें प्रजापते सतत । कोण त्याची गणना करित । बोधनाशप्रभावानें ॥६३॥
जें ब्रह्म उत्थानविहीन । तें सांख्य साक्षिस्वभाव असून । बोधहीनत्वें उत्थान । त्यांत कदापित न होतें ॥६४॥
प्रकृतिसंभव बोध असत । त्यांचा पुरुषसंभूत । योगसौख्य न जाणत । सांख्यबोध विहीनत्वें ॥६५॥
जैसें शारीरिक सुख लाभून । होतें नराचें उत्थान । तैसें मायासुख अनुभवून । ब्रह्माचें उत्थान होतें ॥६६॥
तें परत उत्थान । सांख्यीं नित्य प्रतिष्ठित असून । तेथ योग तुज सांगेन । तो जाणातां योगी होय नर ॥६७॥
ज्यास उत्थान अन्याकडून । तें परत उत्थान जाण उत्थानवर्जित महान । तें बीज आद्य प्रजापते ॥६८॥
उत्थानहीनभावें सदा विराजत । सांख्य तें उत्थाननिःसृत । त्याच्या स्वप्रभावें होत । ऐसें रहस्य जाणावें ॥६९॥
सांख्यतत्त्वें जें न कृत । उत्थानहीन स्वयं वर्तत । परी स्वतःपासून उत्थान होत । यांत नसे संशय कांहीं ॥७०॥
जेथ वसतसे अनृत । तेव्हां सत्य संभवत । एक्त्र ब्रह्म जेथ वर्तत । सत्य तें कोण वर्णील ॥७१॥
ज्यानें मिथ्या न पाहिलें । त्यास भेद न समजले । सदा तादृश रूपत्वें झाले । एकभावाचें प्रदर्शन ॥७२॥
म्हणून उत्थानहीनत्व धरित । विशेषें स्वतः उत्थानजात । स्वयमेव तें उपजत । ऐसें तत्त्व जाणावें ॥७३॥
सांख्यें तें विनिर्मित । उत्थान स्वतःपासून होत । म्हणून उत्थान नसत । यांत संशय कांहीं नसे ॥७४॥
संख्याहीन प्रकाशाख्य वर्तत । चित्त बोधहीन प्रकाशयुत । तें विरोधक ज्ञात । पंचविध प्रकारांत ॥७५॥
उत्थानयुक्त ब्रह्म ज्ञात । बोधमय तें असत । सांख्य उत्थानहीन वर्तत । त्यांच्या योगे निजात्मक ॥७६॥
स्वतःपासून वा परापासून । तेथ न होय उत्थान । जग ब्रह्मयांच्या योगें संपन्न । तें होतें स्वस्वरूप ॥७७॥
स्वस्वरूपाहून परम । नसतो संयोग मनोरम । तन्मयत्वें समाधिज्ञान । अन्वयब्रह्म द्वंद्वाचें ॥७८॥
स्वकीय अभेदभावाचें वर्तत । तेथ प्रकाशकारक चित्त । निरोध संज्ञा त्यास असत । यात संशय मुळी नसे ॥७९॥
संयोग पंचधा असत । त्याचे भेद तुज सांगत । लोकांच्या हितास्तव सांप्रत । योगानें भेद लय पावती ॥८०॥
स्वसंवेद्यानें संदेह निर्माण । त्यायोगें त्या भेदांचें सृजन । तोच करितो त्यांचें पालन । त्यांच्या रूपें खेळतसे ॥८१॥
स्वस्वरूप नाना लीला करित । ऐसें वेदवदी सांगत । उत्पत्ति नाश संयुक्त । भेद हे जाणती ज्ञानी जन ॥८२॥
त्यांच्या निजस्वभावें ख्यात । असत्स्वानंद नाम असत । त्यांचे जीव नित्य वर्तत । तें सत्स्वस्वरूपक ॥८३॥
तें सौर ब्रह्म ज्ञात । बोधहीन प्रभावें सतत । तेथ नित्य प्रकाशक असत । चित्तनिरोधक जाणावे ॥८४॥
असत सत्भावें द्विविध । त्यांच्या संयोगें समात्मक निर्वेध । स्वसंवेद्य परब्रह्म मानद । विष्णु संज्ञ द्वंद्वप्रवेशामुळे ॥८५॥
तेथ आनंद प्रकाशक । चित्त तें निरोधक । त्यायोगें त्याप्रत जात निःशंक । योगींद्र समाधियोगानें ॥८६॥
तीन भेदभिन्न तीन भेदयुक्त । नेतिकारक अव्यक्त । मोहहीन प्रभावें कथित । तुरीय ब्रह्म तें जाणा ॥८७॥
तेंच शिवसंज्ञाख्य जाणावें । योगसेवेनें तें बरवें । तेथ नेति प्रकाशाख्य आघवें । चित्त राहे तद्गत ॥८८॥
त्रिविध तें मोहसंयुक्त । वचथें तें मोहहीन ज्ञान । त्यांचा संयोग कीर्तित । स्वसंवेद्य सर्वदा ॥८९॥
पूर्णंसंयोगभावाख्य स्प्रुत । पांचवे ब्रह्म तें श्रेष्ठ । त्याहून परता संयोग नसत । ऐसें योगिजन सांगतो ॥९०॥
तोच गणनाथा प्रख्यात । स्वानंद नामें विलसत । तेथ स्वप्रकाशाख्य वर्तत । सर्वग चित्त जाण दक्षा ॥९१॥
याहून परतें जें असत । तें अयोग ब्रह्म मायाविवर्जित । तेंच योगिजनवर्णित । निवृत्तिसुखप्रदायक ॥९२॥
तेथ जगांचा ब्रह्माचा योग । न घडे दक्षा भावग । त्याचाही त्याच्यांत अयोग । म्हणून अयोग नांव याचें ॥९३॥
ब्रह्मांत तन्मयत्वें ज्ञात । स्वतःचा संयोग तदगत । त्यायोगें निवृत्तियुक्त । म्हणून निवृत्तिसंज्ञ तें ॥९४॥
स्वसंवेद्याच्या नाशें लाभत । समाधीही तेथ नसत । कांहीं न आगत गत । संयोग कैसा होणार ॥९५॥
तेथ अयोगप्रकाशाख्य चित्त । निरोधसंज्ञ तें सर्वगत । अपवादीं निवृत्ति सुखद होत । ऐसें चित्त पंचविध हें ॥८६॥
दक्षा तुज हें सांगितलें । जगांत ब्रह्मांत तज्ज्ञ भलें । नानाप्रकाशप्रद झालें । आतां सांगतों चित्तभूती ॥९७॥
चित्ताच्या पांच भूमि ख्यात । विविध त्यांचा जैं त्याग घडत । तें चित्त ब्रह्ममय होत । पंचविध चित्त त्याग तूं ॥९८॥
योगसेवेनें चित्तत्याग । करितां साधेल तुज योग । दक्षा चिंतामणींत संयोग । निःसंशय मग पावशील ॥९९॥
संयोग अयोग संज्ञा ज्ञात । निरोधाख्य ज्ञानीजनोक्त । याहून पुढें निरोध न उरत । सर्वांचें ज्ञान होतें नरा ॥१००॥
सर्वधर्मत्व भावें होत । मानव योगी या विश्वांत । तेथ शांति त्यास लाभत । चित्तभूमिभव भ्रमत्यागें ॥१०१॥
योगरूपें योगिह्रदयांत । जें सौख्य सदैव विराजत । ते असे वर्णनातीत । दक्षा जाण सर्वदा ॥१०२॥
मनोवाणीमय चित्त । चतुर्विध तें प्रख्यात । मनोवाणीविहीन असत । तें निरोधसंज्ञ जाण ॥१०३॥
म्हणून मनोवाणीमय नसत । योग मनोवाणीविहीन तद्वत । कैसें ब्रह्म कोणत्या योगें मी संजात । ऐसा विचार करावा ॥१०४॥
मीं ब्रह्मभूत स्वयं जात । हें ज्ञान होतां शांति लाभत । योगांत योगी जैं होत । तेथ कांहीं न ज्ञात होय ॥१०५॥
ब्रह्म वा ब्रह्माचें साधन । ब्रह्मभूतकर महान । तन्मयांत होतां ब्रह्मांत शोभन । न तें तन्मयवर्जित्त ॥१०६॥
म्हणून शांति प्राप्त करून । शांतियोगपर होऊन । पंचविध चित्तांत दर्शन । होते जगतांच्या सौख्याचें ॥१०७॥
ब्रह्माचें ऐश्वर्य सुखरस । तें न धारण करावें सुरस । जेथ लोप पावती नानारस । ऐसें चित्त करोनियां ॥१०८॥
त्या चित्ताचा त्याग करून । योगी शांतिलाभ होऊन । आनंद सागरांतून । तेव्हां वाहती अप्रेरित ॥१०९॥
प्रारब्धें काम भोगित । योगिश्रेष्ठ तैं संसारांत । नाना द्वंद्वविहारांत । समभावपरायण ॥११०॥
योगी शांतिलाभें रत । होई सदा योगसुखांत । चित्तभूमि नरोधें ज्ञात । सर्वभौम योग हा ॥१११॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंदे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन सार्वभौमयोगो नाम पंचमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP