खंड ९ - अध्याय ४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ गणेशाय नमः ॥ तपःप्रभावें भक्तिभावें प्रकट । गजानन जेव्हां पुढयांत । त्यास पाहून अयोग हर्षित । उठून प्रणास करी तयासी ॥१॥
तदनंतर गणेशासी पूजून । नाना उपचारें भक्तिबावपूर्ण । पुनरपि त्यास वंदून । विघ्नेशास स्तवी कर जोडूनी ॥२॥
शांतिस्वरूपासी सुशांतिदासी । वाणीमनहीन । तयासी । ढुंढे वाणीमनयुक्तविचारीसी । योगासी योगाधिपते नमन तुला ॥३॥
वाणी मनोयुक्तच नससी । गणेशा विश्वरूपा कैसें स्तवूं तुजसी । नित्यासी गणेशाची । योगासी योगाधिपते नमन तुला ॥४॥
वाणीमनोहीन तुज म्हणत । संयोग मय कदा नसत । योगरूपा परी तुज नमित । योगा योगाधिपते नमन तुला ॥५॥
तुझ्यापासून प्रसूत । महानुभावा ब्रह्में विश्वें सतत । तुझ्यांतच लीन अभिन्न होत । योगासी योगाधिपते नमन तुला ॥६॥
नित्य अयोगासी निवृत्तिदासी । मायाविहीना गणाधिपासी । वाणीमनोहीनत्वें सुलभ्यासी । योगास योगाधिपते नमन तुला ॥७॥
स्वानंदरूपासी सुशांतिदासी । सिद्धिबुद्धिसाहाय्यें खेळकरासी । वाणीमनोहीन निजात्मलभ्यासी । योगासी योगाधिपते नमन तुला ॥८॥
अव्यक्तासी साहजासी । मोह्हीनासी सदाशिवासी । त्रैविध्यनाथासी नेतिकर्त्यासी । योगासी योगरूपा नमन तुला ॥९॥
सामान्यरूपासी त्रयीमयासी । द्वंद्वप्रकाशासी विष्णूसी । आनंदनाथासी सुखेळकासी । योगासी योगाधिपते नमन तुला ॥१०॥
आत्मस्वरूपासी भानूसी । अमृतस्थयोगें लभ्यासी । भेदविहीनांसी जीवासी । योगासी योगाधिपते नमन योगाधिपते नमन तुला ॥११॥
नाना प्रभेदांत तन्मयासी । सर्वस्वरूपासी शक्तीसी । आनंत्यभावें सुमोहदासी । योगासी योगाधिपते तुज नमन ॥१२॥
साक्षिस्वरूपासी । सांख्ययोगलभ्यरूपासी । सदात्मसंस्थासी बोधहीनासी । योगासी योगाधिपतीसी नमन ॥१३॥
परात्परासी बोधस्वरूपासी । संस्थाविहारकर्त्यासी । सदापालकभावधरा त्रैधिध्यनाथासी । योगासी योगाधिपते नमन ॥१४॥
महोदरासी सोहंस्वरूपासी । चिन्मयासी मोहयुक्तासी । मोह्हीनासी देहिस्वरूपासी । योगासी योगाधिपते नमन ॥१५॥
विहारकर्त्यासी बिंदुप्रचुरासी । चतुष्पदासी चतुर्विध प्रभावासी । आनंत्यतत्वासी देहभोक्त्यासी । योगासी योगाधिपते नमन ॥१६॥
तुर्यात्महेहासी लयात्मकासी । कालस्वरूपासी गणेश्वरासी । नादात्मकासी त्रिदेहगासी । योगासी योगाधिपते तुज नमन ॥१७॥
आनंदकोशात्मकस्थितासी । प्राज्ञासी सौषुप्तमयासी । नित्येश्वरासी प्रचारीसी । योगासी योगाधिपते तुज नमन ॥१८॥
सर्वांतरस्थासी सूक्ष्मकासी । स्वप्नप्रचुरासी तैजसासी । हिरग्यगर्भासी प्रचारीसी । योगासी योगाधिपते । नमन ॥१९॥
स्थितासी अन्नमयासी । विश्ववैश्वानरासी । त्यांच्या प्रचारीसी स्थूलस्वरूपासी । योगासी योगाधिपते नमन ॥२०॥
जागृद्स्थासी विश्वद्वैविध्यमयासी । नानांडरूपासी खेळकासी । शक्तीसी धात्यास हरीसी । योगासी योगाधिपते नमन ॥२१॥
हे गणेशाधिपतीचे कलांश । विघ्नेश्वर ते गणेश । तूं न यांच्या सहितईश । योगासी योगाधिपते तुज नमन ॥२२॥
कैसें नाथा स्तवावें तुजसी । गणेशरूपा संयोगहीनासी । अयोगहीना मी तुजसी । तादात्म्यरूपा तुष्ट होई ॥२३॥
योगासी योगाधिपतीसी । नमन गणेशा तुजसी । मुद्गल म्हणे दक्षासी । अयोग ऐसी स्तुती करी ॥२४॥
गणेशासी प्रणाम करित । कर जोडूनी उभा राहत । गणाधीश घनगंभीर म्हणत । वर माग तूं महाभागा ॥२५॥
जें जें तुझें मनोवांछित । तें मी देईन भक्तितुष्ट । या स्तोत्रानें मीं प्रसन्नचित्त । योग शांतिप्रद हा असे ॥२६॥
जो हें वाचित अथवा ऐकत । त्यास नानासिद्धि लाभत । जें जें इच्छित तें तें देत । मी या स्तोत्राच्या पाठकासी ॥२७॥
मजला हें प्रीतिकर होईल । भक्तिभावप्रद अमल । एकवीस दिवस एकवीस वेळ । वाचील त्यासी दुर्लभ सुलभ ॥२८॥
ऐसें बोलून गणेशान । देई त्या गणाधिपास आलिंगन । अयोगरूपा हर्षसंपन्न । केलें त्यानें त्यावेळीं ॥२९॥
तदनंतर अयोग वंदित । गणाध्यक्षा होऊन विनीत । भक्तिसंयुक्त म्हणत । रोमांचिततनू आनंदानें ॥३०॥
जर तूं ढुंढे भक्तिमोहित । वर देण्या तरी भक्ति दे मजप्रत । तुझ्या पादयुगाची अविरत । पूर्णयोगस्थ मज करी ॥३१॥
सुखयुक्त स्वरूपस्थ द्यावें । नाथा मजसी उद्धरावें । आनंदाच्या अनुभवें । धन्य मजला करावें ॥३२॥
अयोगगणराजाचें ऐकून वचन । गणेश म्हणे तथाऽस्तु वरदान । तदनंतर अंतर्हित गजानन । अयोग अनन्यमानस ॥३३॥
ह्रदयांत स्थापून गजानन । अंतीं योगमय होऊन । मोक्षनायका करी प्रसन्न । ऐसें हें अयोगवृत्त असे ॥३४॥
ऐसें हें सर्वं चरित । सांगितलें संक्षेपें तुजप्रत । म्हणून तूं भक्तिसंयुत । भज तूं त्या गणराजासी ॥३५॥
ऐसें मुद्गल त्या दक्षास सांगत । जेणें यज्ञ पूर्ण होईल त्वरित । अंतीं होशील योगयुत । ब्रह्मभूत तूं होशील ॥३६॥
आज्ञा देई मी जाईन । तुझ्या आतिथ्यें प्रसन्न । रहस्य गणनाथाचें पावन । सकल तुजला सांगितलें ॥३७॥
याहून अन्य न कांहीं असत । परम वेदादि संमत । जो हें वाचीत अथवा ऐकत । त्यास शुभ प्राप्त होई ॥३८॥
अंतीं योगमय होऊन । गणपात्मक भावें प्रसन्न । राहील तो आनंदमग्न । गजाननाच्या कृपेनें ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे योगचरिते नवमे खंडे पूर्णयोगचरितवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP