मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
सवाई माधवराव पेशवे सवाई च...

सवाई माधवरावाचा जन्म - सवाई माधवराव पेशवे सवाई च...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सवाई माधवराव पेशवे सवाई चढती राज्याला । परशुराम अवतार पुरंदरी ज्यांचा जन्म झाला ॥ध्रुपद॥
सप्तदीप नवखंड पृथ्वी दहावा खंडा ऐका काशी । भरतखंडामधिं एक जंबुद्वीप आहे दक्षिणदेशीं ॥ साडेसहा सुभे राज्य दक्षणचें आहे शाहुमहाराजाशीं । देशोदेशिंच्या खंडण्या धाडुनि देती पुंडमवासी ॥ केवढा दर्प थरथर कांपे धासत वैर्‍याला । देशोदेशिंचे वकिल हमेशा पडले शहरपुण्याला ॥सवाई०॥ ॥१॥

मध्यान्हीं इंदुवार सप्तमी सोळाच घटका समयाला ॥ देशोदेशीं साखरा वांटीच्या आनंद झाला सृष्टीला ॥ सुटती तोफा एक कडाका गणीत नाहीं वाद्यांला । सडे घालती उत्तम आंगणिं सर्व मिळुनि त्या समयाला ॥सवाई०॥ ॥२॥

मौंजीबंधन लग्न रायाचें खूप रायाचें झालें घणघोरा । आरशाचे मंडप रेखिले चित्रशाळा अपार ॥ जरी बादले खांब चांदवे सोगा झाला चौफेर । तक्त रायाचें पुढें चालतें रथ हत्तींचा बिनीवर ॥ दोही रस्त्यानें चिराकदानी इंद्रसभेचा दाखला । चतुराई नानाची कुठवर उपमा द्यावी तयाला ॥सवाई०॥ ॥३॥

आणले भोंसले, मोगल, महाराज छत्रपती । शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ॥ महादेव बोलला सवाई शास्त्र चढले वेदाला । खंडू संतू म्हणे पुण्यामधिं पोवाडा हा त्यानें केला ॥सवाई०॥ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP