खडर्याची लढाई - १०
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
शिपाई मारी तलवारा वाटावें पान राखावें शुरा । शिपाई मारी तलवारा ॥ध्रुपद॥
गोविंदराव बापुंनीं जाऊनि जाबसाल लाविला । बाकीचा पैसा द्यावा म्हणून कज्या केला ॥ माश्रुलमुलुख म्हणे धाडीन काशीला ॥(चाल)॥ वकिलास क्रोध आला । त्याने पत्र पाठविलें धन्याला ॥ खबर पाठविली पुण्याला ॥(चाल)॥ तेव्हां नाना पत्र वाची लवकर । श्रीमंतास राग आला थोर ॥ बोलाविले पाटणकर आगीचे धारा । शिंद्याशीं पत्र पाठविले नर्मदापारा ॥शिपाई०॥ ॥१॥
पाटीलबोवाची तयारी झाली आले राव दख्खनवर । नर्मदा उतरून पोचले आले राव घाटावर ॥ श्रीमंतांची भेट घेतली जिलीब चाले मोहरें । धन्याशी नालकी दिली पत्र धाडलें नबाबावर ॥ राव एकदांची घ्यावी टक्कर ॥ आम्ही पांहू म्हणतों बेदर ॥(चाल)॥ त्या पाटीलबोबाची आस्ता नाहीं पुरली । इतक्यात भगवंताची आज्ञा झाली ॥ त्या दवलतराव शिंद्यानें वस्त्रें केलीं । सारे सेनेमध्यें द्वाही त्याची फिरली ॥ बिजाचे धर्म असती अंकुरा ॥शिपाई०॥ ॥२॥
नबाब साहेब आले कचेरीस बोलाविले हंबीर । अस्तानजी खानाशीं आज्ञा चला अघाडीवर ॥ रुस्तुमकान भले पठाण डावे बाजूवर ॥(चाल)॥ मश्रुल आघाडिला । भला अमल पिछाडीला ॥ सेनेचा झोंक चालला ॥(चाल)॥ पोलादजंग बहादर घेऊन बरोबर । रावंभा लिंबाळकर केवळ रणशूर ॥ खडर्यांशी जाऊन पोचले नाही उशीर । मिळाले दळ तीन लाख झुरा ॥शिपाई०॥ ॥३॥
श्रीमंत महाराज निघाले पुण्यांतून बाहेर । दाजीबा फडक्याला नेऊन सांगितले बाजूवर ॥(चाल)॥ लष्करची तयारी झाली । हुजरांत फौज चांगली ॥ मानकर्यानें कोर धरली ॥(चाल)॥ भिरभिर उडति तलवारा निसंग होतात । त्यास नाही पर्वा ते का भितात ॥ रणशूर शिपाई रणी उभे राहतात । तीन कोस हटविल्या फौजा उभ्या पळतात ॥ जाहला मोड जरा दम धरा ॥शिपाई०॥ ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP