सवाई जानराव धुळपांचा पोवाडा - सवाई जानराव धुळप मोहरा वि...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
सवाई जानराव धुळप मोहरा विजयदुर्गाला जी ॥ नित्य वाजतो चौघडा खाशा वाडयाला जी ॥धृ.॥ या तळे कोंकणामधि राव आंगरा होता जी ॥ त्याणें विजयदुर्गाचा पाया घातला जी ॥ ह्या कणक्या गोव्या पति सारंग दुर्गाला जी ॥ दुरुन कोट हा दिसतो जंजिरा जी ॥१॥
ह्या किल्याची सांगतो मात घ्या ऐकून जी ॥ हा विजयदुर्ग पिंजरा दिसे त्रिभुवनी शोभिवंत जी ॥ ऐक अख्या केली रुद्राजीराव धुळपाने जी ॥ चोही बंदरी धाक लाविला भल्या मर्दाने जी ॥२॥
रामलिंगाची दया धुळपरायाला जी ॥ त्याने आरमाराचा सुभा दिला तयाला जी ॥ पुढे चालती बैरगी जरीपटका आघाडीला जी ॥ दोन ढाला शिरी बांधिला मंदिल जरी पटका जी ॥ डोईवर छत्र दिसे राज मोहरा जी ॥ असा रामलक्ष्मणाचा जोडा दोघांचा जी ॥३॥
हरबाजीरावाचे कुळीं दीप लागला असे जी । जसे काशीमध्यें सुर्यबिंब उगवला जी ॥ त्याने आरमाराचे तोफेचा भडिमार केला जी ॥ लोकाला साखर वाटली आनंदानें जी ॥ बापू गीरकर शेवक गातो सभेला जी ॥ डफावर लाविला कलगी भगवा फरारा जी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP