मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
जास्त आढळले सबब त्या दोघा...

खडकी व अष्टीची लढाई - जास्त आढळले सबब त्या दोघा...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


जास्त आढळले सबब त्या दोघांची एक प्रत करून येथे छापली आहे.
शके सत्राशें एकुणचाळसा मधीं ॥ ईश्वरे नाम हा बरवा संवत्सर होता तधीं । झाली प्रथम लढाई द्पवाळीचे आधीं ॥ वेळ कठीण मोठी तेव्हांची कैकांच्या हरल्या शुधी । मी सांगत होतें घरीं स्वस्थ राहावें चार दी ॥ ऐकिलें नाहीं गडे माझे, चाकरीस गेले गुणनिधी ॥ चाल ॥ टाकूनी पती मजला गेले ते परतून येतील कधीं । आजवर सोडून सखयाला राहिलेच नव्हतें जुदी ॥ आठवण तयाची होती मजला क्षणोक्षणी पदोपदी । फलटणचा मार मोठा लागले परक्याचे बुधी ॥ बंदुकी तोफेचे गोळे येतातं लष्करामधी । रक्ताचे पूर वाहताती जशी भरून चालली नदी ॥ हा पण लढाईचा भारी, श्रीहरीच नेयील सिद्धी । या उपरांति ललाटीं नकळे काय लिहिलें सिद्धी ॥ वर्तलें जगीं बडें न लागतां नखी । ईश्वरी सूत्र घर ज्याचें त्याला पारखें ॥ पती नाहींत घरींग बाई तीळ गालूं कोणाचे मुखीं । आला संक्रांतीचा सण जीव हा दुःखी ॥धृ०॥ ॥१॥

पहिल्यापासून श्रीमंताचें लष्कर । माहुलीवर जमाव झाला पुण्यानजीक गारपिर ॥ होते पंतप्रतिनिधी, सचिव, स्वारीबरोबर । काळे गोविंदराव बापू, नानाजी माणकेश्वर ॥ होते अबा पुरंदरे आणिक विंचूरकर । राजे बाहादर आणि रास्ते, पटवर्धन मिरजकर ॥ मोरू दीक्षित पडले प्रथम लढाईवर । ते आघाडीवरती बापू गोखले रणी रणशूर ॥ चाल ॥ पत्र धाडून निपाणीतून आणिले निपाणकर । आले अक्क्लकोटचे राजे, ढमढेरे, निंबाळकर ॥ घाटगे जगताप दरेकर होळकर । ते दौलतराव शिंदे त्या हिंदुस्थानामधीं दूर ॥ भोंसले व गायकवाड अशी नांवें सांगू कोठवर । किती वर्णूं श्रीमंतसरदार हे आणखी ॥पती०॥ ॥२॥

इंग्रेजें घेऊन टेंकडी बांधलें बळा । मोचें साधून त्यावेळीं किंचित न मागें ढळ ॥ होते गोसावी अरब सिंदे पायदळ । एलवडयावर पहिल्याने जाउनियां केली कळ ॥ त्यामागें उभे राहिले घोडे दळ । महाकाळीच्या गोळ्यानें इंग्रेजे सोडिला तळ ॥ भाले बरच्या लखलखती, सुरईचे मोकळष सळ ॥ चाल ॥ पुढें इंग्रेज चालून येतां साफ झाले रणमंडळ ॥ त्यावेळी आकाशी पाहातां चंद्राने केलें खळ । बळ आणखी पाहून ते दिवशीं श्रीमंत मिळावी दळ ॥ सरली फौज अवघी मागें शहरांत सुटला पळा । सावकार वाणी अदमी बैसलें होऊनी निर्मळ ॥ द्र्व्याच्या शोकें करून कितीकाला भरला चळ । सोडून पुजारी गेले त्या देवाचें देउळ ॥ कैकांचे कुटुंबें चुकले रानांत करी तळमळ । ईश्वरि सुत्र घर ज्याचे त्याला पारकी ॥पती०॥ ॥३॥

फलटणें कोरेगांवीं जाऊन घातलें कडें । उभयतांची पाहून लढाई कैकासि घासत पडे ॥ वीरश्री शूराचे आंगी सागरीं बाई भरतील हुडे । दरमजल लढाई होती दोहीकडून किंन्हा जडे ॥ सोडचे मारती हात शिर जैसें चेंडू उडे । अशी बातमी ऐकतां काळिज माझे धडधडे ॥ रात्र दिवस माझा जीव गे माझ्या पतीराजाकडे । सांगती भट ब्राह्मण मया यशवंत तुझे चुडे ॥ म्हणे होनाजी बाळा अवघे श्रीहरी निरसिल सांकडें । गाईकांसी ऐकतात जन हे सुखी ॥पती०॥ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP