नामदेवाचें चरित्र - आलिंगिला नामा हृदयीं विठ्...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
आलिंगिला नामा हृदयीं विठ्ठलें । ताट विस्तारिलें रुक्माईनें ॥१॥
विठ्ठल रुक्माई तिसरा नामदेव । जेवियेले भावें तिघेजण ॥२॥
जेवूनियां त्यांनीं विडा तो घेतला । नामा सुखी केला पांडुरंगें ॥३॥
देव त्यास म्हणे जहालों समाधान । घाली लोटांगण नामदेव ॥४॥
नामोरथ माझा पुरविला देवा । नित्य ऐसी सेवा घडवावी ॥५॥
ऐसी मज भाक देईं नारायणा । करावी वासना तृप्त माझी ॥६॥
विठ्ठलानें भाक दिली नामयासी । नित्य सेवा ऐसी दिधली तुज ॥७॥
ऐसें भाष्यवचन करोनी देवासी । लागला चरणांसी नामदेव ॥८॥
आज्ञा घेऊनियां नामा तो चालिला । मांदिरासी आला गोंदा म्हणे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP