नामदेवाचें चरित्र - नामा आला घरा पुसत गोणाई ।...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
नामा आला घरा पुसत गोणाई । उशीर कां पाहीस लावियेला ॥१॥
ताट जो पाहिलें रिकामें देखिलें । बोणें काय केलें पुसतसे ॥२॥
नामा म्हणे बोणें देव जेवियेला । म्हणोनि लागला उशीर मज ॥३॥
बोणें कोठें देव जेवितां देखिला । त्वां दिलें पोरांला नामदेवा ॥४॥
ऐसें नित्य बोणें देशी तूं पोरासी । सोंग घेऊन येसी मजपाशीं ॥५॥
काढुनी चराट नामा टांगियेला । बहुत ताडिला गोणाईनें ॥६॥
रागें रागें त्याला अधिक अधिक मारी । निळोनी शेजारीं सोडविला ॥७॥
आण वाहे नाम म्हणे गोणाईसी । जेविले ह्रषिकेशी पांडुरंग ॥८॥
नको मारुं आई दिलें नाहीं कोणा । लागत चरणा गोंदा म्हणे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP