नामदेवाचें चरित्र - नामयाची माता काय म्हणे दे...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
नामयाची माता काय म्हणे देवा । मज तूं केशवा कोपूं नको ॥१॥
मज कोपूं नको देवा पांडुरंगा । गोणाई गोविंदा विनवीतसे ॥२॥
न कळतां देवा मारिला मी नामा । मज करीं क्षमा मायबापा ॥३॥
सर्वस्वीमी अपराधी पंढरीच्या राया । नाम्याविषयीं दया असों द्यावी ॥४॥
घातलें तयासी तिणें लोटांगण । केलें समाधान विठ्ठलानें ॥५॥
नामा आलिंगिला ह्रदयीं मातेनें । जोडला सजन देव तुज ॥६॥
तुज हा जोडला पंढरीचा राव । जाहला बरचा ठाव नामदेवा ॥७॥
बहुत पूर्वपुण्य होतें तुझे गांठीं । पडली हे मिठी विठ्ठलासी ॥८॥
नामा विठ्ठलासी नाहीं दैतपण । धरीत चरण गोंदा म्हणे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP