नामदेवाचें चरित्र - भावें भक्तिवादें करावें क...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
भावें भक्तिवादें करावें कीर्सन । आशाबद्ध मन करूं नये ॥१॥
निष्कामें करावें देवाचें कीर्तन । भय हें सांहून शरीराचें ॥२॥
रणामध्यें कैसा भिडतो रणशूर । होवोनी उदार जिवावरी ॥३॥
तैसा पांडुरंगीं धरा हो निर्धार । उतरा हा पार भवसिंधू ॥४॥
सिंधू उतरोनी लाबा जगढाल । पाहा तें नवल विठ्ठलाचें ॥५॥
देव जोडियेला तया काय उणें । गोंदा म्हणे मन धीट करा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP