नामदेवाचें चरित्र - ऐसा नामा भक्त पूर्ण केली ...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
ऐसा नामा भक्त पूर्ण केली सेवा । उद्धरिलें जीवां संयतीच्या ॥१॥
आवडला नामा देवा विठ्ठलासी । ठेवी चरणापासीं अखंडीत ॥२॥
नामयाची कुडी घातली पायरी । येतां जातां हरी पाय देती ॥३॥
आणिकहि पाय देती साधुसंत । ऐसा पूर्ण भक्त उद्धरिला ॥४॥
न सोडी चिठ्ठल नामयासी घडी । बहु त्याची गोडी विठ्ठलासी ॥५॥
गोडी हे म्हणोनि ठेविलें चरणीं । आहे तो भजनीं नामदेव ॥६॥
ऐसा पांडुरंग भक्तांची माउली । करितो साड्ली मायबाप ॥७॥
नरदेहा आलिया भजावा हा देव । मनीं दुजाभाव धरूम नये ॥८॥
भजाचें भजन नामयाचे परी । होय साहाकारी गोंदा म्हणे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP