मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - जाच केला म्हणोनि चालिला श...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


जाच केला म्हणोनि चालिला श्रीहरी । भक्तांचा कैवारी पांडुरंग ॥१॥
पंढरीचा वाणी झाला केशवशेट । लावियेला मूठ ढवळानंदी ॥२॥
वराईची गोणी घालून त्यावरी । आणून नाम्याघरी उतरली ॥३॥
पुसता तो नामा गेला अंघोळीसी । सांगे राजाईसी केशवशेट ॥४॥
धनाची हे गोणी वेंचा तुम्ही घरीं । सांगा वहुतापरी नामयासी ॥५॥
नामदेव माझा मित्र आहे सगा । केशवशेटीं सांगा दिल्ही गोणी ॥६॥
वचन सांगोनी केशवशेट  गेला । नामदेव आला मंदिरासी ॥७॥
येउनी पुसत कवणाची गोणी । तुमचा मित्र वाणी केशवशेट ॥८॥
नामा पाहे तंव वराईची गोणी । दु:खी जाहला मनीं गोंदा म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP