मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - राजाईचा संशय फेडिला मनींच...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


राजाईचा संशय फेडिला मनींचा । कळला पूर्ण साचा पांडुरंग ॥१॥
भावें ते राजाई म्हणे नामदेवा । सज्जन हा ठावा पांडुरंग ॥२॥
विठ्ठलावांचुनी आणिक नाहीं थोर । धरिला निर्धार राजाईनें ॥३॥
विकल्प सांडुनी मन केलें शुद्धा । धरिला गोविंद मनामाजी ॥४॥
नामा ते राजाई जाहाला एकभाव । लावियेला जीव विठ्ठलपायीं ॥५॥
नारा विठा मोंदा माहादा आउबाई । त्यानीं धरिला पायीं पांडुरंग ॥६॥
नामयाची दासी नागी दुसरी जनी । त्यांनीं सेवा करुनी केला देव ॥७॥
एकभाव पहा लाविला विठ्ठला । त्यांनी जवळ केला पांडुरंग ॥८॥
विठ्ठलावांचोनी दुजें नाहीं मनीं । गेलें लोटांगणीं देवराया ॥९॥
ऐसा त्याचा भाव कळला देवासी । सकळ वैकुंठासी पाठविले ॥१०॥
अंतकाळीं नामा धरिला ह्रदयीं । ठेवियेला पायीं गोंदा म्हणे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP