मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
श्रीगुरुदत्तचरणीं आत्मनिवेदन

करुणासागर - श्रीगुरुदत्तचरणीं आत्मनिवेदन

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


दत्त नमितों त्राहि त्राहि । तवास्मि शरण्या पाहि पाहि । भेट वेगीं नेई नेई । अभीष्ट देई अभयदा ॥
सर्व सोडोनि दयाळो । रानोवनीं मे हिंडलों । कासयासाठीं तूतेंच विकलों । सर्वज्ञा हें तुज ठावें ॥
जनीं ग्रामीं संचार केला । प्रतिष्ठा गौरव मान जाला । संस्कार सोहळा भोगिला । कैसा तोही तुज ठावा ॥
सर्वज्ञ दत्ता सद्गुरु देवा । नरनारींची कैसी सेवा । घेतली याच्या अंतरभावा । तूंच सारें जाणशी ॥
जे जे कांहीं व्यवहारिक । द्रव्यादि सोपस्करादि देख । कैसें गमलें शरीर सुख । तेंही सारें जाणशी ॥
आयुष्य कैसें सारिलें । कैसे कष्टी दिवस गेले । करुणासागरीं आळविलें । कैसें तेंही तुज थावें ॥
किमर्थ करुणा भाकितों । कासयासाठीं कष्टी होतों । कासयासाठीं तळमळतों । तेही सारे तुज ठावें ॥
कासयानें समाधान । होईल कैसें पडेल चैन । दत्त माझी अंतरखुण । हेंही सारें तुज ठावें ॥
कैसे तुझे धरिले चरण । कैसा तूझ्याच आधीन । कैसा तूतें आहे शरण । सत्य मिथ्या तुज ठावें ॥
कैसा तूतें प्रणाम । किमर्थ करितों हेंही वर्म । जाणशी तूं आत्माराम । सर्वसाक्षी हृदयस्थ ॥
तूंच जीवन माझी गती । तुझे ठायीं निष्ठा मती । कैशी हेही करुणामूर्ती । तूंच बरवें जाणशी ॥
संग संग्रह कैसा घडला । कैसा मातें सुखरूप गमला । कैसें माझें दयाळा । हृदय तेंही तुज ठावें ॥
कुसंस्कारी दुर्भोग । दुष्काम दुर्व्यसनादि योग । कैसा भोगिला गमला रोग । कैसा हेंही तुज ठावें ॥
कैसे किती यत्न केले । कैसें माझे बळ ना चाले । कैसा दुर्बळ तुज प्रार्थिलें । काय कैसें तुज ठावें ॥
अद्यापि कैसा त्वदेकगती । आहें कैशी माझी स्थिती । रिती कैसी माझी मती । हेही सारी तुज ठावी ॥
आलों गेलों येतों जातों । कैसे दुःखें दिन सारितों । कैशी तुझी पाहतों । वाट हेंही तुज ठावे ॥
खोटा कृत्रिमी किंवा खरा । तुझा कैसा श्रीगुरुवरा । आहें माझ्या अंतरा । तूंच बरवें जाणशीं ॥
इतके प्रकारीं सद्गुरु आई । पडावा तैसा तुहेच पायीं । पडिलों यात कृत्रिम नाहीं । आण तुझ्या चरणाची ॥
इतक्यावरी मज उपेक्षिशी । अभीष्ट दर्शन मातें न देशी । विलंब करशी जरी दूर धरिशी । क्षुद्रें लक्षिशी तरि हा हा ! ॥
यांत तुझें महिमान कळे । धांव माझें आयुष्य गेलें । नमितों क्षमेशा पाउलें । वेगीं दावीं त्राहि ने ॥
ज्या सद्गुरूतें नमिताहें । तवास्मि याचितों वाट पाहें । तो गुरु सर्वज्ञ माझी बाहे । धरो वेगीं मज भेटो ॥
करुणासागर - उद्धरार्ध, ओ. ७४१६-३६ ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP