मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
झिंपा

झिंपा

संत बहेणाबाईचे अभंग

५९२.
पियूनिया बाहे गे । नीट उभी राहे । बेडकीचे परी तोंड हालविसी काये ॥१॥
झिंपा गे झिंपा रामचरण झिंपा । विषयांचे गोडि वाया नको करू खेपा ॥धृ०॥
करूणेचे बोल माझे नको करू फोल । धरी भक्तिभाव जेणे वसे ज्ञानवोल ॥२॥
नाच संतसंगे सखये अति प्रेमरंगे । जेणे तज कृपा कीजे प्रीती पांडुरंगे ॥३॥
पंढरीचे पेठ सखये सुख आहे मोठे । धाउनीया जाय बाई सर्व पांग फिटे ॥४॥
नका करू फेरे बाई चौर्‍यांशीचे घेरे । धरा एकभाव जेणे भव सोडवी रे ॥५॥
मुखी नाम बोले बाई प्रेमभक्ति डोले । सुखानंद रसे बाई स्वानुभवे बोले ॥६॥
मध्यमेचे पारी सखये मेळवोनी पोरी । सदा अंतरंग खेळा उन्मनीच्या भरी ॥७॥
बहिणी घाली झिंपा । करूनी सद्गुरूकृपा । संतचरणी विनटली मिळुनी ज्ञानदीपा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP