मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
संतमहात्म्यपर

संतमहात्म्यपर

संत बहेणाबाईचे अभंग

६९२.
संत तेचि होती खरे । विश्वंभरे आवडले जे ॥१॥
नित्य वसे शांती अंगी । प्रेमरंगी रंगले ॥२॥
कृपादृष्टी जगावरे । विषयांवरी भर नाही ॥३॥
बहिणी म्हणे तया ध्याता । आले हाता परब्रह्म ॥४॥

६९३.
संताचा तो संग जाहालियावरी । उणा केवि हरी होय तेथे ॥१॥
देवही इच्छिती संग त्यांचा घडो । देह कार्यी पडो संतांचिये ॥२॥
न वर्णवे तो संतांचा महिमा । किती ही उपमा न देता पुरे ॥३॥
बहिणी म्हणे जैसी प्रारब्धाची रेषा । तैसे जगदीशा करणे भाग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP