शुद्धलेखन ७ वें
लहान मुलांना खेळ फार आवडतात. या वयांत मुलांस खेळांहून प्रिय असें दुसरें कांहीं नसतें. तसेंच त्यांस गाणी, गोष्टी यांचीही आवड असते. म्हणून लहान मुलांच्या शिक्षकांना सुचवावयाचें कीं, मुलांस शिकवितांना त्यांच्या अभ्यासक्रमांत खेळ, गाणी, गोष्टी यांची योजना अवस्य करा. शिक्षकबंधूंनो, आपल्या बालपणास आठवा म्हणजे तुम्हांला माझ्या म्हणण्यांतील रहस्य आपोआप कळेल. मला तर खात्रीनें असें वाटतें कीं ज्या शिक्षकाला स्वतः खेळाची आवड नाहीं, त्याच्या हातून लहान बालकांना शिकविण्याचें कार्य नीटपणें होणार नाहें. माझ्या बालमित्रांनो, तुम्हीही एक गोष्ट लक्षांत ठेवा ती ही कीं, आपले अभ्यास आटोपून नेहमी मोकळ्य मैदानांत निरनिराळे खेळ खेळा.
या लिहिण्यांत द्वितीया, चतुर्थी, पंचमी, संबोधन या विभक्तींचें कोणते शब्द आले आहेत तें पाहूं.
पान नं. ३६. कोष्टक
यांत द्वितीया, चतुर्थी, पंचमी, संबोधन या विभक्तींच्या प्रत्ययांवर अनुस्वार नाहींत. अनेकवचनी सामान्यरूपावर ( उपांत्य अक्षरावर ) फक्त अनुस्वार आहेत. द्वितीया, चतुर्थीं यांचे एकवचनी स, ला, अनेकवचनी स, ला, ना हे सारखेच प्रत्यय आहेत. त्यासंबंधीं अधिक माहिती पुढील पाठांत दिली आहे.
शिकवितांना यांत ‘ ना ’ हें अक्षर द्वितीया अगर चतुर्थीचा प्रत्यय नाहीं. तो शब्द शिकव या धातूस ‘ तांना ’ हा प्रत्यय लागून धातुसाधित ( अव्यय ) बनलेलें आहे. जसें ऊठ - उठतांना, जा - जातांना, योजना, अभ्यास हे मूळ शब्द आहेत. विभक्तीचीं रूपें नाहींत त्यांवर अनुस्वार नाहींत.