शुद्धलेखन - जोडाक्षरें
व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
जोडाक्षरें लिहितांना कोणत्या अक्षराचा उच्चार अर्धा होतो, कोणत्या अक्षराचा उच्चार सबंध होतो, कोणत्या अक्षराचा उच्चार आधी होतो, कोणत्या अक्षराचा उच्चार नंतर होतो हें काळजीपूर्वक पहावें.
जोडाक्षरें लिहितांना सामान्य चुका कोणत्या होतात तें पहा.
पान नं. ५० कोष्टक.
-------------------------------
राजा - मनुष्य. राज्य - प्रांत. राजानें स्वारी करून पुष्कळ प्रांत आपल्या राज्यांत सामील केला. आपल्या राज्याचें सुख तेंच आपलें सुख असें प्रत्येक राजाला वाटलें पाहिजे. यांत ‘ ज ’ ला ‘ या ’ केव्हा जोडावा व केव्हा जोडू नये हें विचारांत घ्यावें.
आचार व विचार शुद्ध ठेवणें हें प्रत्येक मनुष्याचें कर्तव्य आहे. विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरें नेहमीं विचारपूर्वक द्यावीं. सदुपदेश करणें तो करावा, परंतु त्याप्रमाणें वागणें हें ज्याच्या त्याच्या मर्जींवर ठेवावें; कारण कोणास कोणती परिस्थिति लाभेल हें कोणीं सांगावें ?
यात ‘ च ’ ला ‘ या ’ केव्हा जोडावा व केव्हा जोडू नये हें विचार करून ठरवा.
शाळेंत एक फळा आहे. दोन खुर्च्या आहेत. एक टेबल आहे. व दोन बांकें आहेत. यंदा आमच्या शाळेत रंग दिला नाही व छपराचीं कौलेंही चाळलीं नाहीत.
आहे, नाही हीं क्रियापदें अनेकवचनी आलीं असतां त्यांना ‘ त ’ हा अनेकवचनाचा प्रत्यय लावावा. उदा. मुलगा आहे, मुलगे आहेत. मुलगी नाही, मुली नाहीत. फूल आहे - नाही. फुलें आहेत - नाहींत.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP