मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| ३३ स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - ३३ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - ३३ Translation - भाषांतर ३३नमस्कार आतां देवा गणनाथा । चरणकमळीं माथा ठेउनीयां ॥१॥शारदा सुंदरी ते ब्रह्मकुमरी । राजहंसावरी शोभतसे ॥२॥उभ्या महेश्वर शंभूचें शिखर । येती निरंतर विश्वजन ॥३॥विश्वासी आधार सुर्यनारायण । तया पंचप्राण ओवाळीन ॥४॥स्तंभ फोडुनीयां आला गडगडीत । भक्तांसी रक्षीत नरहरी ॥५॥नाना पूजा नाना नैवेद्य विळास । नांदे त्रिमलेश वेंकटेश ॥६॥कटावरी कर उभा निरंतर । भक्तांसी आधार पांडुरंग ॥७॥तुळजापुरीं माझें कुळीचें दैवत । तुळजा विख्यात भूमंडळीं ॥८॥काशीपुरीमध्यें विश्वनाथ राजा । अंतकाळीं वोजा रक्षितसे ॥९॥न करी अव्हेरू कृपेचा सागरू । जानकीचा वरू रामराजा ॥१०॥द्वारकेचा कृष्ण पांडवांचा सखा । बंधु पाठीराखा द्रौपदीचा ॥११॥उधळलें भंडार पाली पेंबरीस । नित्य मल्हारीस । हळदी लागे ॥१२॥साटी पत्रशाखा होय शाखांबरी । ते बनशंकरी भक्तमाता ॥१३॥आउदीये माई मातापुरी गेली । चंडिका देखिली सप्तशृंगीं ॥१४॥रासीनीरासाई आंबा जोगेश्वरी । नांदे कोल्हापुरीं महालक्ष्मी ॥१५॥स्वामीयाचे यात्रे विश्वजन जाती । सप्त जन्म होती भाग्यवंत ॥१६॥पंचवटीकेसी रामसीतापती । देव हा मारूती जेथें तेथें ॥१७॥कावेरीचें तीरीं नांदे रंगनाथ । वोड्य़ा जगन्नाथ पूर्वभागीं ॥१८॥उडुपेचा कृष्ण बद्रीनारायण । भगवंत आपण बारसीचा ॥१९॥वैकुंठीचा विष्णू कैलासी शंकर । मुख्य निराकार परब्रह्म ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP