भाद्रपद शुद्ध ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"खांदेरी असें नांव ठेविले !"
शके १६०० च्या भाद्रपद शु. ७ रोजीं श्रीशिवरायांनीं खांदेरी किल्ला बांधून पूर्ण केला ! नवीनच स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्य़ाच्या बाबतींत शिवाजीनें घेतलेली खबरदारी अपूर्व अशीच होती. ‘संपूर्ण राज्याचें सार जें दुर्ग’ त्यांच्या बाबतींत तर् शिवाजीचें विशेष लक्ष असे. महाराष्ट्रांत, समुद्रकाठीं, देशावर व इतर ठिकाणी आज भग्नावस्थेत दिसणार्या किल्ल्यांशी शिवरायांचा संबंध खचित्र आला होता. राज्यास बळकटी यावी म्हणून शिवाजीनें कांही किल्ले नवीन बांधले, कांहीं दुरुस्त केले. शिवाजीची बहुतेक अचाट कृत्यें या किल्ल्यांच्या योगाने तडीस गेलीं. नाना ठिकाणची लूट सुरक्षितपणें किल्ल्यांवर आणून ठेवतां आली .... अनेक आणीबाणीचे प्रसंग शिवाजीवर आले, त्यांतून निभावून जाण्यास हेच किल्ले यांस उपयोगी पडले. अर्थातच शिवाजीला या किल्ल्यांचे फारच महत्त्व वाटे. "किल्ले बहुत झाले, विनाकारण पैका खर्च होतो." अशी तक्रार करणार्यांना शिवाजीनें उत्तर केलें, " जैसा कुळंबी शेतास मळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवास खिळे मारून बळकट करितात, तशी राज्यास रक्षण आहेत. तारवास खिळे मारुन बळकट करितात, तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगानें औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाईल. - " समुद्रकांठीं असणार्या किल्ल्यांकडे तर शिवाजीचें फारच लक्ष असे. कारण जंजिर्याचा सिद्दी मराठी राज्य उंदराप्रमाणें पोखरीत असे. नाना प्रकारचा धार्मिक छळ करीत असे. या सिद्दीला तोंड देण्यासाठीं शिवाजीला आपलें आरमार समृद्ध ठाणें होतें. कुलाबा व मुंबई यांच्या दरम्यान दोन अवघड बेटें आहेत, त्यांना खांदेरी व उंदेरी अशीं नांवे आहेत. यांची मालकी शिवाजीकडे असे. "फिरंगी फर प्रबल झाले असें पाहून छत्रपतींनीं समुद्रांतील चांगलीशी खडकाळ जागा पाहून तेथें किल्ला बांधावयास आरंभ केला. शके १६०० च्या भाद्रपद मासीं गौराचे मुळावर किल्ला बांधून तो लढाईचे उपयोगी असल्याकारणानें खांदेरी असें नांव ठेविलें."
- १४ आँगस्ट १६७८
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP