भाद्रपद वद्य १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मंडालेच्या तुरुंगांतील संत !
शके १८३० च्या भाद्रपद व. १३ रोजीं लोकमान्य टिळक सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठीं मंडालेच्या तुरुंगांत येऊन पोंचले. प्रारंभीचें दीड-दोन महिने टिळक साबरमतीच्या तुरंगांतच होते. टिळकांना ही भयंकर शिक्षा उतार वयांत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. त्या वेळी त्यांचे फारच हाल झाले. आठदहा दिवसांतच दहा पौंड वजन कमी झालें. त्या वेळीं त्यांचे फारच हाल झाले. आठदहा दिवसांतच दहा पौंड वजन कमी झालें. १३ सप्टेंबर रोजीं त्यांना साबरमतीच्या तुरुंगांतून बाहेर काढण्यांत कमी झालें. १३ सप्टेंबर रोजीं त्यांना साबरमतीच्या तुरुंगांतून बाहेर काढण्यांत आलें. तुरंगाच्या दारांत गाडी उभी होती. दारें-खिडक्या लावून अंधारांतच प्रवास सुरु झाला. दुसर्या दिवशीं ‘हार्डिज’ बोटींत लोकमान्यांना चढविलें. तळमजल्यावरील एका खोलींत टिळकांना कोंडून ठेवण्यांत आलें. आठनऊ दिवस बोटीचा प्रवास झाल्यानंतर बोट-रंगून येथें आली शेंकडो लोक टिळकांना पाहण्यासाठी आले होते. दुसर्या दिवशीं म्हणजे भाद्रपद व. १३ या दिवशीं टिळक मंडाले येथें येऊन पोंचले. टिळकांच्या खर्या शिक्षेला प्रारंभ झाला. एखाद्या ऋषिवर्याप्रमाणें जीवनक्रम ते घालवूं लागले. सर्वांवर त्यांची छाप बसली. त्यांच्या संगतीचे वर्णन एका वृद्ध मुसलमान पहारेकर्यानें केलें आहे : "ऐसा कैदी मेरे देखनेमें इतकी उमरतक नहीं आया ! ये दररवत जो आप सामने देख रहे हैं ये सच आज मुरझाये दीखते हैं .... उनपर तजेला नहीं आता ! वे अवलिया यहाँ आनेके पेशतर भी ये झाडोंका, यही हाल था । लेकिन जब वे महात्मा यहाँ आये तो एक महिनेमें ये सब झाड ताजे ताजे दीखने लगे और फूल फलोंसे भी भर गये । ऐसा हाल जबतक वे महात्मा यहाँ थे तबतक हमेशा चल रहा था । लेकिन जब वे यहाँसे चले गये तबसे ये झाडोंको ना फूल ना फल आता है । और सबके सब जैसा कोई उनका रिस्तेदार मर गया हो ऐसे दिखांई देते है । सब बिचारे मुरझा गये है ।" या संत पुरुषाचा लोभ तेथील पशुपक्ष्यांनाहि लागून राहिला. "तेथील चिमण्या इतक्या धीट झाल्या कीं, त्या टिळकांच्या खोलींत येत; बुकांटेबलावर बसत व महाराज जेवण्यास बसले म्हणजे ताटासभोंवतीं जमत. फार काय पण चिंवचिंव करीत त्या त्यांच्या अंगावरहि चढत."
- २३ सप्टेंबर १९०८
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP