फाल्गुन शुद्ध १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


हरिभाऊ आपटे यांचें निधन !

शके १८४० च्या फाल्गुन शु. १ या दिवशीं मराठींतील सर्वश्रेष्ठ ध्येयवादी कादंबरीकार हरि नारायण आपटे यांचें निधन झालें. हरिभाऊंचे पालनपोषण त्यांचे चुलते महादेव चिमणाजी आपटे यांच्याकडून झालें. यांचें सुरुवातीचें शिक्षण मुंबईस झाल्यानंतर हे पुणें येथें आले व मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाले. कॉलेजमध्यें चारपांच वर्षे काढूनहि परीक्षा पास होणें कांही त्यांना जमलें नाहीं. परंतु याच वेळीं ज्ञानार्जनाचा मोठा हव्यास हरिभाऊंना लागला. इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच व जर्मन या भाषांतील उत्तमोत्तम वाड्मयप्रकृतींचा आस्वाद त्यांनीं घेतला. हरिभाऊंची पहिली कादंबरी ‘पुणें वैभव’ या पत्रांत सन १८५५ मध्यें ‘आजकालच्या गोष्टीं-मधली स्थिति’ या नांवानें प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘गणपतराव’ प्रसिद्ध होऊं लागली. हरिभाऊंचे निर्माण झालें होतें. यानंतर यांच्या कादंबर्‍यांना भरीव स्वरुप प्राप्त झालें. लोकशिक्षणाचें व बहुजनसमाजांत विचारजागृति करण्याचें कार्य करण्यासाठीं सन १८९० मध्यें यांनी आपलें स्वत:चे ‘करमणूक’ पत्र काढले. ‘पण लक्षांत कोण घेतो ?’ ही ‘करमणूकीं’ त प्रारंभी प्रसिद्ध झालेली कादंबरी होय. याच पत्रांत त्यांनीं एकूण आठ सामाजिक व दहा ऐतिहासिक कादंबर्‍या, आणि शेंकडों उत्कृष्ट गोष्टी लिहिल्या. मी, यशवंतराव खरे, भयंकर दिव्य, मायेचा बाजार, उष:काल, सूर्योदय, सूर्यग्रहण, चंद्रगुप्त, वज्राघात, इत्यादि यांच्या कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. या कादंबर्‍या त्यांनीं जनमनरंजनार्थ लिहिल्या नाहींत. त्या पतितांच्या उद्धारासाठीं, दीनांच्या दु:खविमोचनासाठीं, मार्गभ्रष्टांना सन्मार्गदर्शनासाठीं, हताश झालेल्या हृदयांत नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठीं, समाजशुद्धीसाठीं, राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठीं लिहिल्या नाहींत. त्या पतितांच्या उद्धारासाठीं, दीनांच्या दु:खविमोचनासाठीं, मार्गभ्रष्टांना सन्मार्गदर्शनासाठीं, हताश झालेल्या हृदयांत नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठीं, समाजशुद्धीसाठीं, राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठीं लिहिल्या. ‘संत सखूबाई’ व ‘सती पिंगला’ हीं दोन नाटकेहि यांनीं लिहिलेलीं प्रसिद्ध आहेत. यांनीं आपल्या अंगच्या गुणांवर व बुद्धिकौशल्यावर लौकिक मिळविला. स्वत: पदवीधर नसतांहि हे विद्यापीठांत उच्च परीक्षेंत परीक्षक म्हणून असत.

-३ मार्च १९१९

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP