मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| परशुराम अवतारचरित्र चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० परशुराम अवतारचरित्र तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत परशुराम अवतारचरित्र Translation - भाषांतर ॥७९९४॥भारावली मही दाटली असुरीं । आकांतली हरी शरण गेली ॥१॥गाईब्राह्मणांचें झालेंसें हनन । पिडावले जन दु:खी सदा ॥२॥तेव्हां दयासिंधू मातेचें वचन । धेनूचें गार्हाणे सत्य करी ॥३॥धांवोनी फरशपाणी हृषीकेशी । सहस्त्रबाहूसी मारियलें ॥४॥नि:क्षत्री हे धरा केली एकवेळा । एकवीस वेळा पांडुरंगा ॥५॥मारियले दुष्ट रक्षियले भक्त । तारीले पतीत कृपादृष्टी ॥६॥तुका ह्मणे तुझे पवाडे असंख्य । तेथें मी मश्यक काय वानूं ॥७॥॥७९९५॥दयासिंधुपणें उदारांचा राणा । धरा दिली दाना ब्राह्मणांसी ॥१॥तिहीं त्रिभुवनीं हिंडोनी पाहतां । नाहीं पै मागता ऐसें केलें ॥२॥दु:ख पीडा रोग व्याधि क्लेश चिंता । स्वप्नीं तेही वार्ता नायकती ॥३॥हारपला द्वेष पळालें दरिद्र । आनंद समुद्र वोळलासे ॥४॥तुका ह्मणे तेथें होतो मी मागुता । थोडेंसें संचित आलें मज ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP