मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

चोखामेळ्याचें चरित्र दुसरें

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२१३॥
चोख्यामेळीयानें पाजियेलें दहीं । पडूं दिलें नाहीं उणें त्यासी ॥१॥
साधन द्वादशी आली एके वेळीं । उठोनि प्रात:काळीं काय बोले ॥१॥
उठी ये ये कांते स्वयंपाक करी । आतां येईल हरी पारण्यासी ॥३॥
तंव एका ब्राह्मणें ऐकियेली मात । तेणें दिवाणांत श्रुत केलें ॥४॥
दिवाणांनी दूत पाठविले तेथें । ह्मणति त्या चोख्यातें धरुनी आणा ॥५॥
येवोनियां दूर कर आसडीला । ह्मणे चोखामेळा काय झालें ॥६॥
सभेचे पुसती रडतो हा कांरे । तो ह्मणे विचार ऐका माझा ॥७॥
विठोबासी दहीं भात जेववितां । येणें माझ्या हाता आंसडीलें ॥८॥
ह्मणती या महारानें देव बाटविला । जिवें मारा याला बैल जुंपा ॥९॥
बांधोनियां पाय हांकिती बईल । धरोनि शेऊळ विठू उभा ॥१०॥
तयाचि ये कांता उभी राहोनियां । ह्मणे देवराया हात काढी ॥११॥
खादिलें जेवीले त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारुं पाहासी ॥१२॥
सभेचे पुसती बोलति कवणासी । ती ह्मणे तुह्मांसी नकळे कांहीं ॥१३॥
अनंत ब्रह्मांडें जयाचे उदरीं । तेणे चहूं करीं धरियेलें ॥१४॥
सकळांसी तिनें केलें दरुशन । झालें समाधान चोखियाचें ॥१५॥
तुका ह्मणे देव भक्तांचा कोंवसा । पावतो भरंवसा निश्चयेंसी ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP