सप्ताह अनुष्ठान - जिव्हाळ्याचा देव
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
शुक्रवार ता.९-५-१९३०
तुजविण माझी कोणालागी चिंता । दत्त भगवंता सांग मज ॥१॥
कोण अभिमानी सांग माझा जगी । प्रेम अंतरंगी कवणाच्या ॥२॥
कोण माझ्यासाठी नाथ कळवळे । मेघ तैसा वळे कोण बरे ॥३।
कोणाचे ह्रदय, प्रभुजी, द्र्वत । कोण धांव घेत संकटांत ॥४॥
तुजवीण नाही कोणी जिव्हाळ्याचा । माझा देव साचा जगत्रयी ॥५॥
वारंवार तूज हांका मी मारितो । तूजला प्रार्थितो परोपरी ॥६॥
परी त्याचा त्रास तूझ्या नये मना । गुरु दयाघना दत्तात्रेया ॥७॥
कौतुक करिसी प्रेमाच धरिसी । मज सोडविसी वेळोवेळी ॥८॥
म्हणोनियां दोन्ही हात मी जोडुनि । चरण ठेवुनि शिर नाथा ॥९॥
क्षमेते याचितो मागतो दयेते । तुम्ही भगवन्ते कृपा कीजे ॥१०॥
विनायक म्हणे दास हा घाबरा । तुज अत्रिकुमरा विनवीतो ॥११॥
धांवा
तूजवांचोनियां मज गति नाही । धांव लवलाही कृपावंता ॥१॥
अभिमान माझा तूज भगवंता । त्वरितची आतां धांव घेई ॥२॥
उडी घाल नाथा माझीये सखया । धीर माझ्या ह्र्दया उरला न ॥३॥
लाज राख माझी यदुकुलवरा । झालो मी घाबरा अत्रिसुता ॥४॥
आलो काकुळती प्रगट तूं देवा । आतां रमाधवा द्त्तनाथा ॥५॥
विनायक म्हणे धरवेना धीर । कांपते अंतर पाव आतां ॥६॥
धांवा
कैसे कठिण ह्र्दय केले दयावन्ता । आजि भगवंता काय सांग ॥१॥
नाही कधी ऐसे सत्व त्वां पाहिले । माझे पुरविले अर्थ तुवां ॥२॥
रात्रंदिन लाज आजवरि नाथा । कृपेने समर्था राखीयेली ॥३॥
आतांच कैसे केले निष्ठुर ते मन । तुवां दयाघन कळेना की ॥४॥
अपराध माझे नको मनी आणूं । मी तरी अज्ञानू ज्ञानवंता ॥५॥
आपुला तूं मज आहे म्हणतिले । पाहिजे त्वां केले धावणे आतां ॥६॥
विनायक म्हणे करी सोडवण । प्रसंग जाणून काठिण्याचा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP