सप्ताह अनुष्ठान - भ्याडपणे भरे अज्ञानाने
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
सुखाठायी दु:ख दु:खाठाय़ी सुख । अमृतासी विख जाणवीत ॥१॥
बाधा कल्पनेची तळमळवी मना । विकृत गर्जना करोनीयां ॥२॥
तेणे अज्ञ नर दुषितो देवासी । व्यर्थ संशयासी धरुं पाहे ॥३॥
परि हा सर्व आहे मायेचा बाजार । तो दयासागर कृपासिंधू ॥४॥
अहित आमुचे देव तो करिल । वांकडा होईल आम्हांसी की ॥५॥
अहित आमुचे खचित साधणार । ऐसा कां निर्धार मनामध्ये ॥६॥
हेच विलक्षण अगम्य हे सारे । भ्याडपण भरे अज्ञानाने ॥७॥
विनायक म्हणे आमुचे अज्ञान । आम्हां दयाघन सांभाळावे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP