मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति

सप्ताह अनुष्ठान - श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शनिवार ता.८-१०-१९३०

नमूं श्रीपादांसी नमूं नरहरीसी । नमूं दत्तात्रेयासी कुलेशासी ॥१॥
नमूं वासुदेवा नमूं गुरुदेवा । नमूं त्या माधवा कृपावंता ॥२॥
हरिहर विरिंचीचा अवतार । तया नमस्कार करुं आतां ॥३॥
तोचि पूर्णानंद तोचि वासुदेव । ब्रह्माण्डांत भाव सर्व ज्याचा ॥४॥
तयासि नमितां सकलां नमन । होतसे पावन निश्चयेसी ॥५॥
म्हणोनियां त्यासी नमितो मी प्रेमे । अभ्युदय कामे विश्वंभरा ॥६॥
अभ्युदय माझा त्यांनी साधवावा । माझा पुरवावा हेतू त्यांनी ॥७॥
ब्रत अनुष्ठान चालविले असे । त्यांनी भरंवसे पूर्ण कीजे ॥८॥
मागे आशिर्वाद आज्ञेत मागत । होवोनी विनत चरणांसी ॥९॥
आरंभ करितो मंगलाचरणे । सिद्ध हे करणे कार्य त्यांनी ॥१०॥
पुण्यदिन आज श्रीपादरायांचा । केला स्वरुपाचा अंगिकार ॥११॥
निजरुपी झाले लीन मुनिवर । तोच दिनकर आजिचा की ॥१२॥
अश्विन मासाची कृष्ण जे द्वादशी । सूर्य मध्यान्हासी येतां जाणा ॥१३॥
श्रीपादमुनीश निजरुपी मग्न । स्वरुपी संलग्न झाले जाणा ॥१४॥
तोचि पुण्यदिन आज हा पातला । पाहिजे स्मरला कृतज्ञ ते ॥१५॥
करुनियां ऐशी पुण्यदिन स्मृती । करितो प्रणती श्रीपादांसी ॥१६॥
आरंभिले कार्य सिद्ध करवावे । आशीर्वाद द्यावे मजलागी ॥१७॥
सप्ताह समाप्ति आजचीये दिनी । मज वरदानी सिद्ध करा ॥१८॥
कार्यसिद्ध व्हावे फ़लाते पावावे । मनोगत साधावे माझे दत्ता ॥१९॥
पूर्ण काम व्हावे तुमच्या प्रसादे । ऐसे त्वां वरदे करणे की ॥२०॥
विनायक मागे विजयाचा वर । तरी श्री गुरुवर द्यावा मज ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP