मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती

सप्ताह अनुष्ठान - भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


राख लाज आतां आपुल्या भक्ताची । आपुल्या स्थानाची गुरुनाथा ॥१॥
लाज उपसनेची लाज भजनाची । लाज प्रतिज्ञेची राख आतां ॥२॥
माझा भक्त कधी नष्ट होत नाही । प्रतिज्ञाही पाही तूझी देवा ॥३॥
तरी ति राख आतां सत्यत्वासी आणी । मज चक्रपाणी सोडवावे ॥४॥
प्रसंग हा ऐसा गति मज नाही । तरी लवलाही धांव आतां ॥५॥
विनायक म्हणे पाहुं नको अंत । येई अवधूत सोडवावा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP