सप्ताह अनुष्ठान - भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
बुधवार ता. १४-५-१९३०
भक्ति मज कांही स्वामि उपजवा । भजन करवा प्रेमे येथ ॥१॥
घडवावे ध्यान घडवा पूजन । घडवा गायन निजयशाचे ॥२॥
धरीयेले मी की तुमचे चरण । दृढ अंत:करण लावोनियां ॥३॥
कृपा करा आतां मज गुरुनाथा । चरणांवरी माथा ठेवियेला ॥४॥
विनायक म्हणे भजक मी व्हावे । नाथजी करवावे भजनाते ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP