मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
देव मज करा

सप्ताह अनुष्ठान - देव मज करा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


पहातां पहातां देव मज करा । मजला उद्धरा जनां समक्ष ॥१॥
माझीये पापाचे घडतां दहन । त्वदीय भजन-महत्वाने ॥२॥
उदाहरण होतां उघड दिसतां । विश्वास तत्वतां उपजेल ॥३॥
पापी मुक्त झाला तव नाम घेता । ऐशी जनवार्ता परसेल ॥४॥
तया योगे होय विश्वास बहुतां । तेणे तुज दत्ता सेविती जन ॥५॥
संकल्प त्वदीय भजन प्रसाराचा । धर्मसंस्थापनेचा सिद्ध होय ॥६॥
म्हणोनियां आधी मज देव घडवी । दगड बनवी दिव्य नाथा ॥७॥
विनायक म्हणे धर्म स्थापनेसी । याच उपायासी अंगिकारी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP