मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान| अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना सप्ताह-अनुष्ठान विषय जिव्हाळ्याचा देव भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात" सप्ताहसिध्यर्थ याचना भक्तकीर्तिसाठी याचना भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार देव मज करा अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना देव मज करा संकटाचे नाशासाठी प्रार्थना विनायकाठायी दत्तसंचार धर्मग्लानि धर्मविस्तारार्थ प्रार्थना व्हावे रामराज्य भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना निराशेचे बोल दत्ताधीनता कृतज्ञतावचन प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना क्षमायाचना पूर्वचरितकथन व क्षमायाचना अहंताविष अहित दलनासाठी प्रार्थना अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना देवावीण गति । नाही आम्हां प्रति ईश्वराच्या अर्तक्य लीला सुदामकथा भ्याडपणे भरे अज्ञानाने अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’ नाममंत्र व त्याचा प्रभाव वाल्मीकि चरित चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति सप्ताह अनुष्ठान - अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना Translation - भाषांतर भजनाचा दावी माझे ठायी प्रभाव । धरुनियां भाव प्रगटतेचा ॥१॥माझे ठायी होई प्रगट दत्तनाथा । श्रीगुरुसमर्था पूर्णत्वाने ॥२॥माझे ठायी होवो संचार आपुला । प्रगटी चैतन्याला माझे ठायी ॥३॥माझे ठाय़ी प्रेम वाढो अलौकिक । जेणे जनलोक विश्वासती ॥४॥तूझीया नामाचा प्रताप दिसावा । माझा देह व्हावा तेजोमय ॥५॥लोकांचीये दृष्टी दत्त मी दिसावे । अनुभवा यावे दत्ता परि ॥६॥माझी वाणी व्हावी सत्य वासुदेवा । भजन वैभव वाढवाया ॥७॥अतुल्य सामर्थ्य मज प्राप्त व्हावे । योगारुढ दिसावे सकळांसी ॥८॥जैसा त्यागि योगी भोगी दत्त देव । तैसेच वैभव दिसो माझे ॥९॥माझ्या ठायी नाथा तूझा साक्षात्कार । दाखवी उदार जनलोकी ॥१०॥भक्ती भावनेने धरिले भजन । तरी दयाघन घडवी ऐसे ॥११॥विनायक म्हणे माझीया बोलांसी । आणि सत्यत्वासी कार्यास्तव ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP