रक्तवहस्त्रोतस् - रक्ताचें स्वरुप

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


तपनीयेन्द्रगोपाभं पद्मालक्तकसन्निभम् ।
गुंजाफलसवर्णं च विशुद्धं विद्धि शोणितम् ॥
च. सू. २४-२२ पान २६२

इंद्रगोपकप्रतीकाशमसंहतमविवर्णं च प्रकृतिस्थं जानीयात् ।
रक्तविकृतिरभिधाय प्रकृतिं वक्तुमाह-इन्द्रगोपकप्रतीकाशामि-
त्यादि । इन्द्रगोपक: प्रावृट्‍कालजोद्भिज्ज: `इन्द्रवधू:'
इति लोके, स चानेकप्रकारवर्ण:, अत्र तु रक्त एव गृह्यते ।
असंहतं नात्यच्छं नातिधनं, न स्त्यायतीन्यन्ये । अविवर्ण-
मिति इन्द्रगोपकवर्णमपीषद्विविधवर्णम्, एतेन पद्मालक्तक-
गुंजाफलवर्णमित्युक्तम् अथवा वस्त्रादिलग्नं सत् प्रक्षाल्य-
मानमपि न विवर्णतां यातीत्यविवर्णम् ।
सटीक सु.सू. १४-२२ पान ६४

प्रकृत रक्त हें तप्तसुवर्णाप्रमाणें इंद्रगोप कीटकाप्रमाणें कमल आळता वा गुंज यांच्या वर्णनाप्रमाणें लालरंगाचें असतें. फार घट्ट वा फार पातळ असत नाहीं. तसेंच वस्त्रावरील त्याचा डाग पाण्यानें धुतल्यानंतर राहात नाहीं.

उत्पत्ति: -

स खल्वाप्यो रसो यकृत्प्लीहानौ प्राप्य रागमुपैति ।
सु. सू. १४-४ - पान ५९

रंजितास्तेजसा त्वाप: शरीरस्थेन देहिनाम् ।
अव्यापन्ना: प्रसन्नेन रक्तमित्यभिधीयते ॥
तमेवार्थ श्लोकेन स्पष्टीकुर्वन्नाह भवगश्चात्रेत्यादि ।
शरीरस्थेन यकृप्लीहास्थेन, प्रसन्नेन प्रकृतिस्थेन,
इत्थंभूतेन तेजसा रंजकनाम्ना, अव्यापन्ना
एवंगुणविशिष्टा आपो रंजिता लोहितीकृता: सत्यो
रक्तमित्युच्यते । आपोऽत्र रस: ।
यत्तु यकृत्प्लीह्नो: पित्तं तस्मिन् रंजकोऽग्निरिति संज्ञा,
स रसस्य रागकृदुक्त:
सु. सू. २१-१० पान १०१

विधिना शोणितं जातं शुद्धं भवति देहिनाम् ।
देशकालौकसात्म्यानां विधिर्य: संप्रकाशित: ॥
च. सु. २४-३ पान २६०

देशकाल आणि प्रकृति या तिघांच्या स्वरुपाचा विचार करुन सम्यक् असा आहारविहार करणार्‍या व्यक्तीमध्यें उत्तम प्रकारचा आहाररस उत्पन्न होतो. आणि या आहाररसामुळें पुढें उत्पन्न होणारे धातूही उत्तम प्रकारचे होतात. उत्पन्न झालेल्या आहाररसावर आमाशय यकृत् प्लीहा यांच्या आश्रयानें असणार्‍या रंजक पित्ताचे संस्कार होऊन रसांचें रक्तांत रुपान्तर होतें. या रुपांतरास लागणारा काल सामान्यपणें ५ दिवसांचा असतो. (सु. सू. १४-१५ डल्हणटीका) रक्ताचें प्रमाण [अष्टौ शोणितस्य ) अंजलस्य) च. शा. ७१५] आठ अंजली असतें.

गुण व कार्य:--

अनुष्णशीतं मधुरं स्निग्धं रक्तं च वर्णत: ।
शोणितं गुरु विस्त्रं स्याद्विदाहश्चास्य पित्तवत् ॥
शोणितस्य निदानलिड्गचिकित्साज्ञानार्थे स्वलक्षणं दर्शय-
न्नाह-अनुष्णेत्यादि । अनुष्ण्शीतमिति साधारणमित्यर्थ: ।
विस्त्रम् आमगन्धि । विदाहश्चस्य पित्त्त्तवदिति पित्तस्येच;
पित्तस्य येन वस्तुना यथा च विदाहस्तेन वस्तुना तथा च
विदाह: शोणितस्यापीत्युक्तम् ।

सटीक सु. सू. २१-१७ पान १०३

पाञ्चभौतिकं त्वपरे जीवरक्तमाहुराचार्या: ।
शोणितस्वभावे मतान्तरमाह-पाञ्चभौतिकमित्यादि । जीव-
रक्तमिति जीवतुल्यं रक्तम् । कुत:? जीवच्छरीरे रक्त-
दर्शनात्, मृतशरीरे चादर्शनात्; न तु जीवरक्तमोज इति;
एवं प्रस्तुतस्यैव रक्तस्य लक्षणमनुक्तं स्यात् ।

सटीक सु. सू. १४-८ पान ६०

विस्त्रता द्रवता राग: स्पदनं लघुता तथा ।
भूम्यादीनां गुणा ह्येते द्दश्यन्ते चात्र शोणिते ॥
तदेव पाञ्चभौतिकत्वं सुखबोधार्थ स्पष्टयितुमाह विस्त्रते-
त्यादि । विस्त्रता आमगन्धता, भूमिगुण:, द्रवता द्रवभाव:,
अयमम्बुगुण:, रागो रक्तता, तेजोगुण:, स्पन्दनं किंचिच्च-
लनं, वातगुण: ; भूम्यादीनामित्यत्रादिशब्देनाप्तेजोवाय्वा-
काशा गृह्यन्ते । हि यस्मादर्थे, यस्मादेते विस्त्रतादय:
पृथिव्यादीनां गुणा अत्र शोणिते द्दश्यते, तस्माद्रक्तं पाञ्च-
भौतिकमिति ।

सटीक सु. सू. १४-९ पान ६०

देहस्य रुधिरं मूलं रुधिरेणैव धार्यते ।
तस्माद्यत्नेन संरक्ष्यं रक्तं जीव इति स्थिति: ॥

सु. सू. १४-४४ पान १६६

तत्राम्बु शारीरमाहारसारभूतं रसाख्यमविकृतमविकृतेन
तेजसा रंजितमिन्द्रगोपाकारं च शशशोणितगुंजाफ़लालक्तक-
पद्मसुवर्णवर्णधौतं च विरज्यमानं मधुरमीषल्लवणं
स्निग्धमसंहतमशीतोष्णं गुरु पित्तैकचयप्रकोपोपशमं
सौम्याग्नेयं प्रकृत्या रक्तमाहु: । तथा दोषम् । दुष्यमिति
केचित् । उभयात्मकमन्ये ।

अ. सं. सू. ३६ पान२५१

रक्त हे पांचभौतिक असून त्यामध्यें पृथ्वीचा उग्रगंध, जलाची द्रवता, तेजाचा रक्तवर्ण, वायूचे स्पंदन आणि आकाशाचे लघुत्व हे गुण रहातात. रक्त हे किंचित् उष्ण किंचित् लवण, मधुर, स्निग्ध गुरु विस्त्रगंधी असें आहे. रक्ताचें वहन करणार्‍या निरनिरळ्या स्वरुपाच्या वाहिन्या अष्टांगसंग्रहानें वर्णन केल्या आहेत.

तत्र श्यावारुणा: प्रस्पंन्दिन्य: सूक्ष्मा: क्षणपूर्णरिक्ता वातरक्तं
वहन्ति । नीलपीतासिता: स्पर्शोष्णा: क्षिप्रस्त्राविण्य:
पित्तरक्तम् । गौर्य: स्निग्धा: स्थिरा: शीता: कण्डूमत्य:
कफ़रक्तम् । समा गूढा स्निग्धा रोहिण्य: शुद्धरक्तमिति ।

अ. सं. शा. ६- पान ३२९

या वर्णनांतील नेमकेपणा केवळ वचनांनीं स्पष्ट होत नाहीं. श्यावारुण व रोहिणी या वाहिन्या एका प्रकारच्या असून त्यांतून प्रस्पंदमान असें शुद्ध रक्त वाहातें. तें प्राणवायूचा संस्कार झालेलें असें असतें. नील असित गौरी या वाहिन्या एका प्रकारच्या असून त्यांतून कफ़पित्तांचा परिणाम झालेलें (अशुद्ध) रक्त वहातें. रक्ताचे पांच भौतिक गुण सांगत असतांना लघु गुणाचा उल्लेख आहे. आणि सामान्य वर्णनामध्यें गुरुगुणाचा उल्लेख आहे. त्यावरुन नीला, गौरी या वाहिनींतून वहाणारें रक्त गुरुगुणात्मक असावें असें आम्हांस वाटतें. अष्टांगसंग्रहकाराचे रोहिणी, अरुणा, गौरी व नीला हें सिराविभक्ति विषयक प्रकरण केवळ रक्तवाहिन्यांना उद्देशून असून सुश्रुताचें हेंच वर्णन अधिक व्यापक अशा स्वरुपाचें आहे. सुश्रुतानें वर्णन केलेल्या सिरा या केवळ रक्तवाहिन्या नसून त्यांतून इतर भावांचेंहि वहन होतें असें सुश्रुताच्या वर्णनावरुन दिसतें.

तद्विशुद्धं हि रुधिरं बलवर्णसुखायुषा ।
युनक्ति प्राणिनं प्राणा: शोणितं ह्यनुवर्तते॥
च.सू. २४-४-पान २६०

विशुद्धं शोणितं किं करोतीत्याह-तद्विशुद्धमित्यादि । तेन=
विधिना विशुद्धं=तद्विशुद्धम्, किं वा तदिति=शोणितम् ।
प्राण: शोणितं ह्यनुवर्तत इति=शोणितान्वयव्यतिरेकमनु-
विधियते। यदुक्तम्-दशैवायतनान्याहु: प्राणा येषु प्रति-
ष्ठिता: । शंखौ मर्मत्रयं कण्ठो रक्तं शुक्लौजसी गुदम्
(सू.अ.२९) इति ।
टीका च.सू. २४-४ पान २६०

धातूनां पूरणं वर्णे स्पर्शज्ञानमसंशयम् ।
स्वा: सिरा: संचरद्‍द्रक्तं कुर्याच्चान्यान् गुणानपि॥
सु.शा. ७-१४ पान ३७७

रक्तं वर्णप्रसादं मांसपुष्टिं जीवयति च ।
सु. सू.१५-५ पान ६७

रक्त हें शरीरामध्यें जीवनाचें कार्य करतें. प्रत्येक अणुपरमाणूला जीवन देणें हें कार्य प्राणानुग रक्तामुळें शरीरांत होत असतें. या व्यतिरिक्त सर्व धातूंना बल देणें (सु. सू. १४--२१) धातूचें पूरण करणें, त्वचेचा वर्ण प्रकृत ठेवणें, स्पर्शज्ञानांत नेमकेपणा आणणें, मांस उत्पन्न करणें ही रक्ताची कार्ये आहेत. स्त्रियांमधील गर्मधारणपोषणाशीं संबद्ध असे रज व शोणित हे जे भाव ते रक्तोत्पन्नच आहेत. या व्यतिरिक्त गर्भाची वृद्धी होत असतांना गर्भ शरीरांत उत्पन्न होणार्‍या अनेक प्रकारच्या अवयवांना रक्त हें उत्पादन कारणरूपानें उपयोगी पडत असतें. यकृत्, प्लीहा, फुफ्फुस, उडुंक, आंत्र, गुद, बस्ति, जिव्हा, वृक्क, वृषण, हृदय, कंडरा, सिरा पित्त, सर्व इंद्रियें हे सर्व अवयवविशेष रक्तामुळेंच उत्पन्न होतात. (सु. शा. ४-२५ ते ३१) च. चि. १५-१५) गर्भिणीमध्यें पांडुत्व हें लक्षण बहुतेक वेळीं आढळतें. त्याचें कारण गर्भिणीच्या शरीरांतील रक्त इतक्या अनेक प्रकारांनीं खर्ची पडून कमी होत असतें हेंच आहे. रक्तास चौथा दोष मानणारी एक मतप्रणाली आहे. या विचारसरणीचा उल्लेख सुश्रुतामध्यें आढळतो. व्यावहारिक भूमिकेवरुन विशिष्ट हेतूनें रक्ताचें महत्त्व दुर्लक्षित होऊं नये यासाठीं जरी सुश्रुतानें कोठेंकोठें रक्तास दोष म्हटलें असलें तरी त्यानेंही सर्व ठिकाणी त्यास दोष म्हणून वात, पित्त, कफाचाच उल्लेख केलेला आहे. आणि त्या संदर्भामध्यें सुश्रुतानें स्पष्टपणें सांगितलें आहे कीं, ``दोष दूषितेषु अत्यर्थ धातुषु संज्ञा रसज्ञोऽयं शोणितजोऽयम् व्याधिरिति । (सु. सू. २४-८)'' दोषांनीं धातू अत्यंत दूषित होऊन जे विकार उत्पन्न होतात त्यांना लक्षणेनें रसजव्याधी, रक्तजव्याधी असें म्हटलें आहे. रक्ताकडे विकाराचा आरंभ करण्याचा दोषांमध्यें असलेला महत्त्वाचा गुणधर्म नाहीं, हें यावरुन स्पष्ट होतें म्हणून रक्ताला चौथा दोष मानण्याचें कारण नाहीं.

रक्तसारता :-

कर्णाक्षिमुखजिह्वानासौष्ठपाणिपादतलनखललाटमेहनं च
स्निग्धरक्तं श्रीमद्‍भ्राजिष्णु रक्तसाराणाम् । सा सारता
सुखमुद्धतां मेघां मनस्वित्वं सौकुमार्यमनतिबलमक्लेश-
सहिष्णुत्वंमुष्णासहिष्णुत्वं चाचष्टे ।
च. वि. ८-१०६ पान ५८४

स्निग्धताम्रनखनयनतालुजिह्वोष्टपाणिपादतलं रक्तेन ।
सु. सू. ३५-१६ पान १५२

रक्तसार मनुष्याचे कान, डोळे, मुख, जिह्वा, टाळु, नाक, ओठ, हाताचे आणि पायाचे तळवे, नखें, कपाळ आणि शिस्नावरील मणि हे अवयव स्निग्ध, आरक्तवर्ण, शोभिवंत आणि तेजस्वी असे असतात. रक्तसार व्यक्ती सुख, पराक्रम, बुद्धिमत्ता, स्वाभिमान, सुकुमारता, मध्यमबलत्व, फारसे क्लेश सहन न होणें, उष्णता न सोसणें या गुणांनीं युक्त असतात.

रक्तवहस्त्रोतस् :

शोणितवहानां स्त्रोतसां यकृत् प्लीहाच । च.वि. ५/१२
रक्तवहे द्वे तयोर्मूलं यकृत् प्लीहानौ रक्तवाहिन्यश धमन्य:
तत्रविद्धस्य श्यावांगता ज्वरो दाह: पांडुता शोणितागमनं
रक्तनेत्रता च । सु. शा. ९-१२ पान ३८६

यकृत्, प्लीहा व रक्तवाहिन्या या रक्तवहस्त्रोतसाचें मूल आहेत. वाहिन्यांपुरता विचार करितां रस व रक्त हे दोन्हीही द्रव धातू एकाच वाहिनींतून वहातात. हृदयांतून निघणार्‍या ज्या रसवाहिन्या त्याच रक्तवाहिन्याही आहेत. चक्रदत्तानें रसविक्षेपणाचें स्वरुप सांगत असतांना [रसति इति रस: द्रवधातु: उच्यते । तेन रुधिरादीनां अपि द्रवाणां ग्रहणं भवति ।
च. चि. १५-१६ टीका] रसविक्षेपणाबरोबर रक्ताचेंही विक्षेपण होतें असें म्हटलें आहे.

रक्तवहस्त्रोतसाच्या दुष्टीचीं कारणें : -

विदाहीन्यन्नपानानि स्निग्धोष्णानि द्रवाणि च ।
रक्तवाहीनि दुष्यन्ति भजतां चातपानलौ ॥
च. वि. ५-२२ पान ५२८

जळजळ उत्पन्न करणारीं अम्ल, लवण कतुरसात्मक द्रव्यें तसेंच स्निग्ध, उष्ण, द्रव अशा गुणांचे पदार्थ अधिक प्रमाणांत सेवन केल्यास, ऊन व अग्नि यांच्यामुळें अधिक तापलें जाणें यामुळें रक्तवहस्त्रोतसाची दुष्टी होते.

रक्तक्षयाचीं लक्षणें :-
परुषा स्फुरिता म्लाना त्वग्रूक्षा रक्तसंक्षये ।
च. सू. १७-६५ पान २१७

शोणितक्षये त्वक्पारुष्यमम्लशीतप्रार्थना सिराशैथिल्यं च ।
सु. सू. १५-९ पान ६९

क्षीणरक्तस्य हि वायुर्मर्माण्युपसंगृह्य मूर्च्छासंज्ञानाशशिर:
कम्पभ्रममन्यास्तम्भापतानकहनुभ्रंशहिध्मापाण्डुत्वबाधिर्य-
धातुक्षयाक्षेपकादीन् करोति मरणं वा ।
प्राण: प्राणभृतां रक्तं तत्क्षयात् क्षीयतेऽनल: ।
अ. सं. सु. ३६ पान २५५

रक्त क्षीण झालें असतां अम्लरसाची अभिलाषा उत्पन्न होते. गार हवेसें वाटतें. सिरा शिथील होतात. त्वचा रुक्ष, खरखरीत, फुटलेली, निस्तेज, सुरकुतलेली (म्लान) अशी होते. पांडुता, अग्निमांद्य, संज्ञानाश, मूर्च्छा, शिर:कंप, भ्रम, मन्यास्तंभ, अपतानक हनुभ्रंश, हिक्का, बाधिर्य, आक्षेपक, पुढील धातूचा क्षय, हीं लक्षणें उत्पन्न होतात. गार हवेंसें वाटणें (शीतेच्छा) हीं लक्षणें आगंतुक कारणांनीं वा फार थोडया वेळांत अधिक प्रमाणांत रक्तस्त्राव झाला असतां आढळून येतात. रक्तक्षय क्रमाक्रमानें झाल्यास पांडुरोगांत सांगितल्याप्रमाणें उलट गार नकोसें वाटतें.

रक्तक्षये क्षय: पांडुर्मदचेष्टो भवेन्नर: ।
श्वासो निष्ठीवनं शोषो मन्दाग्नित्वं च जायते ॥
हारित तृतीय ९ पान २६७

हारीतानें रक्तक्षयामध्यें धातुक्षय, पांडुता, मंदचेष्टता, श्वास, कफनिष्ठीवन, शोष, अग्निमांद्य अशीं लक्षणें होतात असें म्हटलें आहे.

विद्ध लक्षणें "-

तत्र विद्धस्य श्यावांगता ज्वरो दाह: पांडुता शोणितागमनं
रक्तनेत्रता च ।
सु. शा. ९-१२ पान ३८६

रक्तवहस्त्रोतसाचा वेध झाला असतां अवयव काळवंडणें, ज्वर, दाह, पांडुता, रक्तस्त्राव व डोळे रक्ताळणें अशीं लक्षणें होतात.

रक्तवृद्धीचीं लक्षणें :-

रक्तं रक्तांगाक्षिता सिरापूर्णत्वं च ।

सु. सू. १५-२४

वृद्धे रक्ताड्गनेत्रत्वं सिराणां पूरणं तथा ।
गात्राणां गौरवं निद्रा मदो दाहश्च जायते ॥
शा. उत्तरतंत्र १२-६ पान ३७४

रक्तवृद्धीमुळें शरीराचे ते ते अवयव रक्तवर्ण होतात. डोळे लाल होतात. सिरा भरलेल्या दिसतात आणि स्पर्शालाही तशाच भरलेल्या लागतात. अंग जड होतें. निद्रा, मद, दाह हीं लक्षणें असतात. वाग्भटानें रक्तवृद्धीचीं म्हणून जीं लक्षणें दिलीं आहेत, तीं रक्तदुष्टीची आहेत.

रक्तदुष्टीचीं लक्षणें:-

वक्ष्यन्ते रक्तदोषजा: ।
कुष्ठविसर्पपिडिका रक्तपित्तमसृग्दर: ॥
गुदमेढ्रास्यपाकश्च प्लीहा गुल्मोऽथ विद्रधी ।
नीलिका कामला व्यड्गं पिप्प्लवस्तिलकालका: ॥
दद्रुश्चर्मदलं श्वित्रं पामा कोठोऽस्त्रमण्डलम् ।
रक्तप्रदोषाज्जायन्ते ॥
च. सु. २८-२५-२६ पान ३७८

कुष्ठविसर्पपिडकामशकनीलिकातिलकालकम्यच्छव्यंगेन्द्रलुप्त-
प्लीहविद्रधिगुल्मवातशोणितार्शोऽर्वुदाड्गमर्दासृग्दररक्त-
पित्तप्रभृतयो रक्तदोषजा:, गुदमुखमेढ्रपाकाश्च; ।
सु. सू. २५-३ पान ११६

तत: शोणितजा रोग: प्रजायन्ते पृथग्विधा: ।
मुखपाकोऽक्षिरागश्च पूतिघ्राणास्यगन्धिता ॥
गुल्मोपकुशवीसर्परक्तपित्तप्रमीलका: ।
विद्रधी रक्तमेहश्च प्रदरो वातशोणितम् ॥
वैवर्ण्यमग्निसादश्च पिपासा गुरुगात्रता ।
सन्तापश्चातिदौर्बल्यमरुचि: शिरसश्च रुक् ॥
विदाहश्चान्नपानस्य तिक्ताम्लोद्गिरणं क्लम: ।
क्रोधप्रचुरता बुद्धे: संमोहो लवणास्यता ॥
स्वेद: शरीरदौर्गन्ध्यं मद: कम्प: स्वरक्षय: ।
तन्द्रानिद्रातियोगश्च तमसश्चातिदर्शनम् ॥
कण्ड्‍वरु:कोठपिडकाकुष्ठचर्मदलादय: ।
विकारा: सर्व एवैते विज्ञेया: शोणिताश्रया: ॥
च. सु. २४-११ ते १६ पान २६१

रक्ते दुष्टे वेदना स्यात्पको दाहश्च जायते ।
रक्तमण्डलता कण्डू; शोधश्च पिटिकोद्गम: ॥
शा. उत्तर तंत्र १२-५ पान ३७४

रक्तदुष्टीमुळें कुष्ठ, विसर्प, पिडिका, रक्तपित्त, प्रदर, गुदपाक, शिस्नपाक, मुखपाक, प्लीहा (यकृत्) गुल्म, विद्रधी, नीलिका, कामला, व्यंग (वांग) पिप्लु (पिंपळाच्या पानाच्या आकाराचा काळा डाग) मशक, (मस) तिलकालक, (तीळ) श्वित्र, कोठ, शोष, रक्तमंडल, इंद्रलुप्त, वातरक्त, अंगमर्द, रक्तार्श, डोळे लाल होणें, नाका तोंडाला घाण येणें, उपकुश, दन्तरोग, प्रमीलक (झापड) विवर्णता, अग्निमांद्य, तृष्णा अंग जड होणें, संताप, दौर्बल्य, अरुचि, शिर:शूल, अन्नाचा विदाह होणें, आंबट कडू घशाशीं येणें व उलटून पडणें, थकवा वाटणें, स्वभाव संतापी होणें, बुद्धीचें ज्ञानग्रहण सामर्थ्य कमी होणें, तोंड खारट पडणें, घाम फार येणें, कंडू व्रण हे विकार उत्पन्न होतात. शूल होणें, वेदना होणें, यालाहि रक्तदुष्टी हें महत्त्वाचें कारण असतें. रक्तवहस्त्रोतसाची परीक्षा करितांना बळ, नेत्र, त्वचा, तळवे, जीभ, ताळू, यकृत्, प्लीहा, हृदय, सिरा, अग्नि, कान्ति व ओज यांची परीक्षा करुन निर्णय घ्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP