महद्वा यदि वा चाल्पं श्यावं वा यदि वाऽसितम् ।
नीरुजं मण्डलं गात्रे न्यच्छमित्यभिधीयते ॥
न्यच्छलिंगमाह - महद्वेत्यादि । असितं कृष्णम् । नीरुजं
मण्डलं' इत्यस्य स्थाने `सहजं मण्डलं' इति केचित् पठन्ति
तेन जन्मकालप्रवृत्तं न्यच्छमिच्छन्ति, अत एव न्यच्छस्य
पर्याये लाञ्छनमिति तै: पठयते । यथा, - न्यच्छं
लाञ्छनमुच्यते' इति । लाञ्छनं लक्षणम् । अत्र भोजवचनात् ।
पित्तरक्तान्वितो वायु: कारणम् ।
यदाह-`रक्तपित्तान्वितो वायुस्त्वक्प्रदेशाश्रितो यदा ।
जनयेन्मण्डलं कृष्णं श्यावं वा न्यच्छमादिशेत्'' इति ।
अत्र श्यावत्वपक्षे मुखेतरदेश एव संभवेन बहुलत्वेन
व्यड्गाद्भेदोऽषगंतव्य:
मा. नि. क्षुद्ररोग ३८ म. टीकेसह पान ३७२
तिलकालकाच्या संप्राप्तीप्रमाणेंच श्याव वा कृष्णवर्णांचीं वेदनारहित मंडळें त्वचेवर उत्पन्न होतात. त्यांचा आकार मात्र तिळापेक्षां पुष्कळच मोठा असतो. आकृतीप्रमाणें व्यवहारामध्यें त्याला बेलाचे पान, तुळशीचे पान, पिंपळपान असे म्हणतात. प्रत्यक्ष पानाएवढी त्यांची लांबीरुंदी नसली तरी आकारसाद्दश्यावरुन त्यांचा उल्लेख वरीलप्रमाणें केला जातो. ही मंडळें ज्या वेळी जन्मजात असतात त्या वेळी त्यांस 'लांछन' असें म्हणतात. चरकानें या न्यच्छ वा लांछनासच पिप्लव म्हटलें असावें. हें न्यच्छ संख्येने फ़ारच अल्प म्हणजे एखाद दुसरें असतें. टीकाकारानें यांतील संख्येच्या अत्यल्पत्वामुळेंच तें व्यंगापेक्षा निराळे ओळखावें असें सांगितले आहे. यांतील संख्याल्पत्व व मोठा आकार एवढेंच लक्षांत ठेवण्यासारखें आहे.
हे सर्व डाग प्राय: कष्टसाध्य वा असाध्य असतात. मात्र त्यांचे स्वरुप वेदनारहित व निरुपद्रवी असल्यानें विकार म्हणून त्यांस फ़ारसें महत्त्व नाही. साद्यविघातक असल्यामुळें त्यावर उपचार केले जावे अशी रुग्णाची इच्छा असते.
चिकित्सा
मसूर, शाल्मलीकंटक, यव, लोघ्र, वाळा, चंदन, कुष्ठ, जांभूळ, वड, आंबा, यांची पानें, हरिद्रा, शेळीचें दूध, गोमूत्र, हरीतकी, मंजिष्ठा, गव्हलाकचोरा या द्रव्यांचा लेप, व्यंग, नीलिका, न्यच्छ, तिलकालक यांच्या डागांस नाहींसा करतो.