रक्तवहस्त्रोतस् - सिराग्रह
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
`रक्तमाश्रित्य पवन: कुर्यान्मूर्धधरा: सिरा: ।
रुक्षा: सवेदना: कृष्णा: सोऽसाध्य: स्यात्सिराग्रह: ॥
सिराग्रहमाह - रक्तमित्यादि । मूर्धघरा इति ग्रीवागता:,
तासां रुक्षत्वं वेदनावत्त्वं कृष्णत्वं च कुर्यात् ।
सोसाध्यं इति स्वरुपेणैव, काकणष्ठवत् ।
शिरोग्रह इति पाठान्तरे शिरोधारक सिरा दुष्टया
शिरोवेदनाकारित्वात् `शिरोग्रह' इति व्यपदेश: लक्षणं
तु तदेव ॥५३॥
मा. नि. वातव्याधी ५३ म. टीकेसह पान २०६
वायू रक्ताच्या आश्रयानें प्रकुपित होऊन सिरांना विशेषत: मानेंतून डोक्याकडे जाणार्या सिरांना कृष्णवर्ण रुक्ष वेदनायुक्त करतो. या व्याधीस सिराग्रह असें म्हणतात. सिराग्रहाच्या ऐवजीं शिरोग्रह असा पाठभेद कांही लोक मानतात. या व्याधीचें स्वरुप काय असावें ते निश्चित करतां आलेलें नाही. मानेपासून मागचे डोके फार दुखते. जखडल्यासारखे होते. पुढें मोहमुर्च्छा ही लक्षणें दिसतात. ज्वरहि असतो अशा स्वरुपांत जो आशुकारी विकार आढळतो तो सिराग्रह शब्दाने अभिप्रेत असावा.
चिकित्सा
चतुर्भुज, सुतशेखर, चंद्रकला, हेमगर्भ, सारिवा, धमासा, निंब, पर्पट, करता, उशीर.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020

TOP