रक्तवहस्त्रोतस् - व्यंग
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
क्रोधायासप्रकुपितो वायु: पित्तेन संयुत: ।
मुखमागत्य सहसा मण्डलं विसृज्यत: ॥३९॥
निरुजं तनुकं श्यावं मुखे व्यड्गं तमादिशेत् ।
मा. नि. क्षुद्ररोग ३९ पा. ३७३ म. टीकेसह
व्यड्गलिड्गमाह -
क्रोधायासेत्यादि । श्यावमिति शुक्लानुविद्ध कृष्णवर्णम् ।
अस्य `छयावक' इति `मेछेता' इति च लोके ख्याति: ॥३९॥
म. टीका -
क्रोध व श्रम यांनीं प्रकुपित झालेला वायु पित्ताशीं युक्त होऊन मुखावरील त्वचेमध्यें वेदनारहित, काळे, आकारानें अगदीं लहान, बारीक असे डाग उत्पन्न करतो. त्यास व्यंग असें म्हणतात. वांग या नांवानें हा विकार ओळखला जातो. हा विकार पित्तप्रवृत्ती, गौरवर्ण व्यक्तीमध्यें विशेषकरुन आढळतो. याची उत्पत्ति तरुण व प्रौढ वयामध्यें विशेषत: होते.
शोकक्रोधादि कुपिताद्वातपित्तान्मुखें तनु ।
श्यामलं मण्डलं व्यड्गं, वक्रादन्यत्र नीलिका ॥२८॥
परुषं परुषस्पर्शं व्यड्गं श्यावं च मारुतात् ।
पित्तात्ताम्रान्तमानीलं, श्वेतान्तं कण्डुमत्कफात् ॥२९॥
रक्ताद्रक्तान्तमाताम्रं सौषं चिमिचिमायते ।
वा. उ. ३१/२८-२९ पा. ८८९-९०
वाग्भटानें व्यंग व नीलिका यांच्यामध्यें मुख व इतर शरीर असा स्थानभेद सांगितला आहे. त्यानें व्यंगाचे वातज, पित्तज, कफज, रक्तज, असे प्रकारही मानले आहेत. वातज व्यंग कठिण, खरखरीत व श्याववर्ण असतें. पित्तज व्यंगाच्या कडा किंचित् तांबुस असतात व त्याचा वर्ण निळस असतो. कफज व्यंगामध्यें व्यंगाच्या कडा पांढर्या असून त्या ठिकाणीं थोडीशी आग व चुणचुण असते. व्यंगामध्यें वाग्भटाप्रमाणें दोषविशेषानें होणारे वर्णभेद आढळतात परंतु वेदना विशेष मात्र बहुधा आढळत नाहींत. माधवनिदानकारानें केलेलें नीरुज हे वर्णनच योग्य आहे.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP