रक्तवहस्त्रोतस् - दारुणक
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
दारुणा कण्डुरा रूक्षा केशभूमि:प्रपाटयते
कफ़मारुतकोपेन विद्याद्दारुणकं तु तम् ॥३०॥
दारुणलक्षणमाह - दारुणेत्यादि दारुणेति कठिणा कफ-
मारुतकोपादिति यद्यप्युक्तं तथापि पित्तरक्तानुबन्धोऽ
प्यत्र द्रष्टव्य: ।
तथाहि विदेह: - `यदत्र पटलाभासं सर्जस्कं शिरस्त्वचि ।
परुषं जायते जन्तोस्तस्य रुपं विशेषत: ॥
तोदै: समन्वितं वातात् सकण्डूगौरवं कफात् ।
सपिपासं सदाहार्ति रागं पित्तास्त्रजं तथा इति ।
अत्र वचने सदाहरागं च पित्तात्, सार्ति तु रक्तात् अर्तिर्हि
रक्तजाऽपि भवति ।
यदुक्तं `रक्तं हि व्यम्लतां याति तच्चेन्नास्ति न चास्तिरुक्'
इति ।
दारुणं रक्खीति लोके ॥३०॥
प्रकुपितं झालेले वात, कफ, रक्तास दुष्ट करुन डोक्यावर केसांच्या मुळांशी रुक्षता आणून व्याधी उत्पन्न करतात. याला दारूणक असें म्हणतात. या व्याधीमध्यें कठीण, किंचित्, उत्सेधयुक्त, रुक्ष, स्त्रावहीन अशा पिडका उत्पन्न होतात. त्याने अतिशय खाज सुटते. वाताचा अनुबंध असल्यास टोंचल्यासारख्या वेदना, पित्तानुबंधामुळें दाह व वेदना हीं लक्षणें असतात तर कफानुधामुळें कंडू व गौरव हीं लक्षणें अधिक असतात पिडकावरील त्वचा खाज सुटून कोंडयासारखी निघून येते. (पटलाभास)
चिकित्सा
स्नेहन करावें. धावनासाठी निंब, शिकेकाई, लिंबू यांचा उपयोग करावा. कंडूघ्न द्रव्यांनीं सिद्ध केलेलें तेल डोक्यास लावावें.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP